logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राज्य उत्पादन शुल्क विभाग, श्रीरामपूर यांच्या पथकाने २६ मे रोजी सायंकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी व्यवसायावर धडक कारवाई केली. या कारवाईची माहिती मिळताच अनेक अवैध धंदे करणाऱ्यांनी आपापल्या घरांना कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. या पथकाने परिसरात छापेमारी करत असताना काही ठिकाणी देशी दारूच्या बाटल्या तसेच हातभट्टीचे साहित्य आढळून आले. यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आली. कारवाईदरम्यान संगीता जगताप यांच्या राहत्या घरात हातभट्टी व देशी दारूचा साठा सापडला. हे संबंधित साहित्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून नष्ट केले. तसेच, या प्रकरणात संगीता जगताप आणि संगीता पवार या दोघी घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते. या कारवाईत कमी प्रमाणात देशी दारूच्या बाटल्या व हातभट्टी साहित्य मिळून आले असले तरी, प्रशासनाने अवैध दारू व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. प्रसाद नगरमधील रजाबाई कांबळे, कविता साळवे, लैला शेख, सुवर्णा मोकळ, स्वार्थाबाई जाधव, आलका पठारे, माया साठे, लता जगताप, शरद साळवे, रमेश जाधव, तुषार मोकळ, हर्ष कांबळे या स्थानिक महिला व नागरिकांनी या पथकास सहकार्य केले.

3 hrs ago
user_पत्रकार जालिंदर आल्हाट
पत्रकार जालिंदर आल्हाट
Rahuri, Ahmednagar•
3 hrs ago

राज्य उत्पादन शुल्क विभाग, श्रीरामपूर यांच्या पथकाने २६ मे रोजी सायंकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी व्यवसायावर धडक कारवाई केली. या कारवाईची माहिती मिळताच अनेक अवैध धंदे करणाऱ्यांनी आपापल्या घरांना कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. या पथकाने परिसरात छापेमारी करत असताना काही ठिकाणी देशी दारूच्या बाटल्या तसेच हातभट्टीचे साहित्य आढळून आले. यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आली. कारवाईदरम्यान संगीता जगताप यांच्या राहत्या घरात हातभट्टी व देशी दारूचा साठा सापडला. हे संबंधित साहित्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून नष्ट केले. तसेच, या प्रकरणात संगीता जगताप आणि संगीता पवार या दोघी घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते. या कारवाईत कमी प्रमाणात देशी दारूच्या बाटल्या व हातभट्टी साहित्य मिळून आले असले तरी, प्रशासनाने अवैध दारू व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. प्रसाद नगरमधील रजाबाई कांबळे, कविता साळवे, लैला शेख, सुवर्णा मोकळ, स्वार्थाबाई जाधव, आलका पठारे, माया साठे, लता जगताप, शरद साळवे, रमेश जाधव, तुषार मोकळ, हर्ष कांबळे या स्थानिक महिला व नागरिकांनी या पथकास सहकार्य केले.

More news from Pune and nearby areas
  • शिरूर शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने एक विशेष मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान दुकानांबाहेरील पत्र्याचे शेड, सिमेंटचे ओटे आणि अन्य अतिक्रमणे हटवण्यात आली. मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी, ट्रॅक्टर, स्वच्छता विभागातील कर्मचारी, पालिकेचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळाला.
    1
    शिरूर शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने एक विशेष मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान दुकानांबाहेरील पत्र्याचे शेड, सिमेंटचे ओटे आणि अन्य अतिक्रमणे हटवण्यात आली. मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी, ट्रॅक्टर, स्वच्छता विभागातील कर्मचारी, पालिकेचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळाला.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    20 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील येवल्या तालुक्यात असलेल्या सावरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध प्रलंबित मुद्द्यांवरून कमालीची वादळी ठरली. महसूल अधिकारी राहुल पगारे यांच्या अध्यक्षतेखाली कडक पोलीस संरक्षणात ही सभा पार पडली, जिथे जागरूक ग्रामस्थांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करत उपस्थित अधिकाऱ्यांची दमछाक केली. या सभेला विस्तार अधिकारी चांगदेव मुंढे, श्रीपाद दहिफळे, सरपंच तथा प्रशासक कल्पना भुरूक, उपसरपंच संतोष पवार आणि पोलीस पाटील विशाल काटे उपस्थित होते. मात्र, कामगार तलाठी, सोसायटी सचिव यांसह अनेक महत्त्वाचे खातेप्रमुख अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. या गैरहजर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत, "खासदार व आमदार निधी गेला कुठे?" असा थेट सवाल करत विविध विकासकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली. काम न करताच बिले उचललेल्या कामांचीही चौकशी व्हावी, असा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. याव्यतिरिक्त, गावात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे, तंटामुक्तीच्या सभा नियमित घेणे, अकार्यक्षम समित्या तत्काळ बरखास्त करणे आणि विधवा व निराधार महिलांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देणे, यांसारखे महत्त्वाचे निर्णय या सभेत घेण्यात आले. या वादळी ग्रामसभेमुळे सध्या सावरगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील येवल्या तालुक्यात असलेल्या सावरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध प्रलंबित मुद्द्यांवरून कमालीची वादळी ठरली. महसूल अधिकारी राहुल पगारे यांच्या अध्यक्षतेखाली कडक पोलीस संरक्षणात ही सभा पार पडली, जिथे जागरूक ग्रामस्थांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करत उपस्थित अधिकाऱ्यांची दमछाक केली.

या सभेला विस्तार अधिकारी चांगदेव मुंढे, श्रीपाद दहिफळे, सरपंच तथा प्रशासक कल्पना भुरूक, उपसरपंच संतोष पवार आणि पोलीस पाटील विशाल काटे उपस्थित होते. मात्र, कामगार तलाठी, सोसायटी सचिव यांसह अनेक महत्त्वाचे खातेप्रमुख अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. या गैरहजर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत, "खासदार व आमदार निधी गेला कुठे?" असा थेट सवाल करत विविध विकासकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली. काम न करताच बिले उचललेल्या कामांचीही चौकशी व्हावी, असा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. याव्यतिरिक्त, गावात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे, तंटामुक्तीच्या सभा नियमित घेणे, अकार्यक्षम समित्या तत्काळ बरखास्त करणे आणि विधवा व निराधार महिलांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देणे, यांसारखे महत्त्वाचे निर्णय या सभेत घेण्यात आले.

या वादळी ग्रामसभेमुळे सध्या सावरगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • आजाद समाज पार्टीने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर आंदोलन केले. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांचा मोर्चा रस्त्यातच अडवला आणि त्यांना ताब्यात घेतले.
    1
    आजाद समाज पार्टीने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर आंदोलन केले. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांचा मोर्चा रस्त्यातच अडवला आणि त्यांना ताब्यात घेतले.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 min ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टोळक्याने फिरणारी माकडे शेतात घुसून उभी पिके फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय, ही माकडे गावातील घरांमध्ये शिरून अन्नधान्य आणि इतर वस्तूंचेही नुकसान करत आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने लक्ष घालून माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
    2
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टोळक्याने फिरणारी माकडे शेतात घुसून उभी पिके फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय, ही माकडे गावातील घरांमध्ये शिरून अन्नधान्य आणि इतर वस्तूंचेही नुकसान करत आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने लक्ष घालून माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पाटोदा येथील तहसील कार्यालयात हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी करत एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार, गाय ही हिंदू धर्मात श्रद्धेचे स्थान मानली जाते, तसेच दोन समाजांमधील सलोखा, देशातील एकोपा, सुख आणि समृद्धी कायम राहावी या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुस्लिम धर्मगुरु मौलाना अर्शद मदनी साहेबांनी घेतलेल्या निर्णयानंतर आणि त्यांच्या आदेशानुसार, भारतात प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे निवेदन सादर केले जात आहे. याच मालिकेचा भाग म्हणून पाटोदा येथील सर्व समाजसेवक, मौलाना, सामान्य नागरिक, पत्रकार आणि राजकीय पुढारी यांच्या उपस्थितीत तहसीलदारांमार्फत हे निवेदन महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. निवेदनात, सरकारने या मागणीवर त्वरित निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
    1
    पाटोदा येथील तहसील कार्यालयात हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी करत एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार, गाय ही हिंदू धर्मात श्रद्धेचे स्थान मानली जाते, तसेच दोन समाजांमधील सलोखा, देशातील एकोपा, सुख आणि समृद्धी कायम राहावी या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मुस्लिम धर्मगुरु मौलाना अर्शद मदनी साहेबांनी घेतलेल्या निर्णयानंतर आणि त्यांच्या आदेशानुसार, भारतात प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे निवेदन सादर केले जात आहे. याच मालिकेचा भाग म्हणून पाटोदा येथील सर्व समाजसेवक, मौलाना, सामान्य नागरिक, पत्रकार आणि राजकीय पुढारी यांच्या उपस्थितीत तहसीलदारांमार्फत हे निवेदन महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. निवेदनात, सरकारने या मागणीवर त्वरित निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    पाटोदा, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • हजरत सुफी कलीम अली शहा कादरी यांच्या वतीने सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
    1
    हजरत सुफी कलीम अली शहा कादरी यांच्या वतीने सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
    user_करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    Salesperson फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 min ago
  • गरीब शेतकऱ्याची मुलगी आकांक्षा उके हिला सावित्रीबाई फुले वसतिगृहातून बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे. वसतिगृह प्रशासनाने आकांक्षा नोकरदार असल्याचे कारण देत, ट्रेनिंगला नोकरी दर्शवून तिला वसतिगृहाबाहेर काढण्यासाठी नोटीस बजावली आहे. आकांक्षाने ४ आणि ८ तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वसतिगृहात कडाक्याच्या उन्हाळ्यात कुलर्सची सुविधा नसल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती केली आणि त्यांना झापले. याच रागातून विद्यार्थिनीवर ही कारवाई केली जात असल्याचा आरोप असून, तिला आज वसतिगृह सोडावे लागणार आहे. एवढेच नाही तर, तिच्याकडून सहा महिन्यांपासून राहत असल्याचे निवासाचे व भोजनाचे खर्चही वसूल करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
    1
    गरीब शेतकऱ्याची मुलगी आकांक्षा उके हिला सावित्रीबाई फुले वसतिगृहातून बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे. वसतिगृह प्रशासनाने आकांक्षा नोकरदार असल्याचे कारण देत, ट्रेनिंगला नोकरी दर्शवून तिला वसतिगृहाबाहेर काढण्यासाठी नोटीस बजावली आहे.

आकांक्षाने ४ आणि ८ तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वसतिगृहात कडाक्याच्या उन्हाळ्यात कुलर्सची सुविधा नसल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती केली आणि त्यांना झापले. याच रागातून विद्यार्थिनीवर ही कारवाई केली जात असल्याचा आरोप असून, तिला आज वसतिगृह सोडावे लागणार आहे. एवढेच नाही तर, तिच्याकडून सहा महिन्यांपासून राहत असल्याचे निवासाचे व भोजनाचे खर्चही वसूल करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेगाव येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे एक मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. गावातील इंगळे मळा परिसरात तुटलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका शेळीचा मृत्यू झाला, तर तिला वाचवण्यासाठी गेलेला १६ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी जालिंदर इंगळे यांची शेळी रविवारी सकाळी विजेचा धक्का लागून जागीच मृत्युमुखी पडली. या शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांचा १६ वर्षीय मुलगा ऋषिकेश इंगळे यालाही विजेचा धक्का बसला, मात्र त्याने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, ही विजेची तार गेल्या वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत खाली लोंबत होती. याबाबत अनेकदा संबंधित वायरमनला माहिती देऊनही दुरुस्ती करण्यात आली नाही. काही महिन्यांपूर्वी रोहित्र जळाल्यानंतरही ही तुटलेली तार दाखवून देण्यात आली होती, तरीही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पंचायत समिती सदस्य कुशल नाना सातव यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, त्यांनी यापूर्वी १२ मे रोजी महावितरणकडे तुटलेल्या तारा, रोहित्र आणि फ्युज बॉक्सच्या तातडीच्या दुरुस्तीची लेखी मागणी केली होती. त्यांच्या मते, महावितरणच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडला. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि वायरमनवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वाईकर यांनी “वायरमनची चौकशी करून योग्य ती कारवाई करू” अशी प्रतिक्रिया दिली आहे. वाडेगाव परिसरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, तुटलेल्या विजेच्या तारा आणि धोकादायक विद्युत यंत्रणांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेगाव येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे एक मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. गावातील इंगळे मळा परिसरात तुटलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका शेळीचा मृत्यू झाला, तर तिला वाचवण्यासाठी गेलेला १६ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी जालिंदर इंगळे यांची शेळी रविवारी सकाळी विजेचा धक्का लागून जागीच मृत्युमुखी पडली. या शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांचा १६ वर्षीय मुलगा ऋषिकेश इंगळे यालाही विजेचा धक्का बसला, मात्र त्याने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, ही विजेची तार गेल्या वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत खाली लोंबत होती. याबाबत अनेकदा संबंधित वायरमनला माहिती देऊनही दुरुस्ती करण्यात आली नाही. काही महिन्यांपूर्वी रोहित्र जळाल्यानंतरही ही तुटलेली तार दाखवून देण्यात आली होती, तरीही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पंचायत समिती सदस्य कुशल नाना सातव यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, त्यांनी यापूर्वी १२ मे रोजी महावितरणकडे तुटलेल्या तारा, रोहित्र आणि फ्युज बॉक्सच्या तातडीच्या दुरुस्तीची लेखी मागणी केली होती. त्यांच्या मते, महावितरणच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडला.

या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि वायरमनवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वाईकर यांनी “वायरमनची चौकशी करून योग्य ती कारवाई करू” अशी प्रतिक्रिया दिली आहे. वाडेगाव परिसरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, तुटलेल्या विजेच्या तारा आणि धोकादायक विद्युत यंत्रणांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    20 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे प्रकाश जाधव यांनी स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर एका आढावा बैठकीचे आयोजन केले.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे प्रकाश जाधव यांनी स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर एका आढावा बैठकीचे आयोजन केले.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.