विक्रम शिंदे /भोरच्या संग्रामात थोपटेंचा पराभव ; नवख्या उमेदवाराने चारली पराभवाची धूळ भोर दि.२३ पुणे जिल्ह्यातील भोर- राजगड (वेल्हा )- मुळशी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव झाला असून महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर 20 हजार 108 मतांनी विजयी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करणारे काँग्रेसचे संग्राम थोपटे या निवडणुकीत विजयाचा चौकार मारणार असे वाटत असताना ऐन वेळेला महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शंकर मांडेकरांनी भोर विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात संग्राम थोपटेंना पराभवाची धूळ चारली. महायुतीचे स्थानिक नेते भाजप तालुकाध्यक्ष जीवन कोंडे,माजी आमदार शरद ढमाले,राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत शिवतरे,भालचंद्र जगताप ,विक्रम खुटवड चंद्रकांत बाठे,संतोष घोरपडेंसह शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वानी एकजुटीने काम केल्याने मांडेकरांचा विजय झाल्याचे बोलले जाते. भोर - अंबाडे मार्गावरील वाघजाई नगर परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज (दि.23)सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली.मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून महायुतीच्या शंकर मांडेकर यांनी घेत टपाली मतांसह 20 हजार 108 मतांनी विजय मिळवला.मांडेकर यांना 1 लाख 26 हजार 252 तर संग्राम थोपटे यांना 1लाख 6 हजार 347 मते मिळाली .मात्र अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे, किरण दगडे पाटील यांचा करिष्मा चालू शकला नाही.चौरंगी वाटणारी लढत दुरंगी झाली.आयात उमेदवार म्हणून टीका झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांना आसमान दाखवले असून या मतदार संघाला मांडेकर यांच्या रूपाने मुळशी तालुक्याचा पहिला आमदार मिळाला आहे. काँग्रेसच्या बालेकिल्लाला मुळशीकरांनी भोरकरांच्या मदतीने सुरुंग लावल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
विक्रम शिंदे /भोरच्या संग्रामात थोपटेंचा पराभव ; नवख्या उमेदवाराने चारली पराभवाची धूळ भोर दि.२३ पुणे जिल्ह्यातील भोर- राजगड (वेल्हा )- मुळशी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव झाला असून महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर 20 हजार 108 मतांनी विजयी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करणारे काँग्रेसचे संग्राम थोपटे या निवडणुकीत विजयाचा
चौकार मारणार असे वाटत असताना ऐन वेळेला महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शंकर मांडेकरांनी भोर विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात संग्राम थोपटेंना पराभवाची धूळ चारली. महायुतीचे स्थानिक नेते भाजप तालुकाध्यक्ष जीवन कोंडे,माजी आमदार शरद ढमाले,राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत शिवतरे,भालचंद्र जगताप ,विक्रम खुटवड चंद्रकांत बाठे,संतोष घोरपडेंसह शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वानी एकजुटीने काम केल्याने
मांडेकरांचा विजय झाल्याचे बोलले जाते. भोर - अंबाडे मार्गावरील वाघजाई नगर परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज (दि.23)सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली.मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून महायुतीच्या शंकर मांडेकर यांनी घेत टपाली मतांसह 20 हजार 108 मतांनी विजय मिळवला.मांडेकर यांना 1 लाख 26 हजार 252 तर संग्राम थोपटे यांना 1लाख 6 हजार 347 मते मिळाली
.मात्र अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे, किरण दगडे पाटील यांचा करिष्मा चालू शकला नाही.चौरंगी वाटणारी लढत दुरंगी झाली.आयात उमेदवार म्हणून टीका झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांना आसमान दाखवले असून या मतदार संघाला मांडेकर यांच्या रूपाने मुळशी तालुक्याचा पहिला आमदार मिळाला आहे. काँग्रेसच्या बालेकिल्लाला मुळशीकरांनी भोरकरांच्या मदतीने सुरुंग लावल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
- Maharashtra के Exit Poll पर Pune NCP president Deepak Mankar ने कहा 'Mahayuti 180 सीटें जीतेगी' |1
- Maharashtra Vidhansabha Exit Poll | पुणे शहरातील आठ जागा, कोण ठरणार वरचढ? पत्रकारांचं विश्लेषण1
- Ambegaon Vidhansabha | आंबेगावमध्ये वळसे पाटलांचं पारडं जड ठरणार? - आंबेगाव विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे बाजी मारणार की राष्ट्रवादी पवार गटाचे देवदत्त निकम संधी साधणार? यावर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे, पाहा... -1
- उत्तर महाराष्ट्र, पुणे गारठलं; राज्यात थंडीचा कडाका वाढला | NDTV मराठी Shorts1
- 🙏🏻💯😊 video Credit deepak_gite_1
- Post by Ranjan...kumar1