चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पुर्ण मतदार संघातील ३०६ मतदान केंद्रांची १४ टेबलवर २२ फेऱ्याद्वारे होणार मतमोजणी (सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी चांदवड ) चांदवड - चांदवड देवळा विधानसभा मतदार संघातील ३०६ मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी एकूण १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून एकूण २२ फेऱ्या होणार आहे. तसेच ईटीपीबीएस व पोस्टल बॅलेटची मोजणी स्वतंत्र आठ टेबलवर होणार आहे. यासाठी शनिवार (दि.२३) रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रत्यक्ष सुरवात होणार असून प्रथम पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांना दिली. इव्हिएम मोजणीसाठी १४ मतमोजणी पर्यवेक्षक , १४ मतमोजणी सहाय्यक नियुक्त केल जाणार आहे. प्रत्येक टेबलसाठी स्वतंत्र सूक्ष्म निरीक्षक नेमले आहेत. मतमोजणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून उमेदवारांना देखील त्यांचे मतमोजणी प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मतमोजणी कक्षामध्ये उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना आवश्यक ओळखपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. संपूर्ण मतमोजणी परिसरामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस प्रशासन निवडणुकीची देखभाल करण्यासाठी सज्ज असल्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सांगितले संपूर्ण मतदान केंद्र परिसरात सीसीटीव्ही देखील लावण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वैध ओळख पत्राशिवाय कुणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल बंदी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग यांनी सांगितले.
चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पुर्ण मतदार संघातील ३०६ मतदान केंद्रांची १४ टेबलवर २२ फेऱ्याद्वारे होणार मतमोजणी (सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी चांदवड ) चांदवड - चांदवड देवळा विधानसभा मतदार संघातील ३०६ मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी एकूण १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून एकूण २२ फेऱ्या होणार आहे. तसेच ईटीपीबीएस व पोस्टल बॅलेटची मोजणी स्वतंत्र आठ टेबलवर होणार आहे. यासाठी शनिवार (दि.२३) रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रत्यक्ष सुरवात होणार असून प्रथम पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांना दिली. इव्हिएम मोजणीसाठी १४ मतमोजणी पर्यवेक्षक , १४ मतमोजणी सहाय्यक नियुक्त केल जाणार
आहे. प्रत्येक टेबलसाठी स्वतंत्र सूक्ष्म निरीक्षक नेमले आहेत. मतमोजणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून उमेदवारांना देखील त्यांचे मतमोजणी प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मतमोजणी कक्षामध्ये उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना आवश्यक ओळखपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. संपूर्ण मतमोजणी परिसरामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस प्रशासन निवडणुकीची देखभाल करण्यासाठी सज्ज असल्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सांगितले संपूर्ण मतदान केंद्र परिसरात सीसीटीव्ही देखील लावण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वैध ओळख पत्राशिवाय कुणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल बंदी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग यांनी सांगितले.
- राहुल दादा आहेर यांचा विजय निश्चित कार्यकर्त्यांचा जल्लोष5
- साई मंडप डेकोरेटर्स,चांदवड Gokul Rahane -77439727851
- साई मंडप डेकोरेटर्स,चांदवड Gokul Rahane1
- चांदवड रेणुका माता दर्शन1
- चांदवड : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज ; सकाळी आठ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात..!1
- Post by Shaukat Ansari1
- साई मंडप डेकोरेटर्स,चांदवड Gokul Rahane -77439727851
- बादमाश दिल पावरी 🔥 𝐍𝐞𝐰 𝐑𝐨𝐜𝐤 𝐒𝐭𝐚𝐫 𝐛𝐚𝐧𝐝 (चांदवड) 𝟕𝟖 💯1