धरणगाव स्टेशनची DRM कडून पाहणी; प्रवासी मंडळाने मांडल्या महत्त्वाच्या मागण्या धरणगाव (प्रतिनिधी) – पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), मुंबई सेंट्रल विभाग यांनी आज धरणगाव स्टेशनला भेट देऊन संपूर्ण पाहणी केली. या दौर्यादरम्यान धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने DRM यांची विशेष भेट घेत विविध प्रवासी सुविधांसंदर्भात महत्त्वाच्या मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या. प्रवासी मंडळाच्या वतीने पुढील पाच प्रमुख मागण्या सादर करण्यात आल्या: 1) नवीन फुट-ओव्हर-ब्रिजची मागणी नवीन तिकीट काउंटरजवळ प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने आणि प्लॅटफॉर्म बदलताना मोठी गैरसोय होत असल्याने येथे तातडीने नवा FOB उभारावा, अशी मागणी करण्यात आली. 2) दोन्ही प्लॅटफॉर्मवर विस्तृत शेडची गरज धरणगाव परिसरातील उन्हाळ्यात तापमान तब्बल 48°C पर्यंत पोहोचते. सध्या शेडची अपुरी व्यवस्था असल्यामुळे प्रवाशांना उभे राहणे कठीण होत आहे. त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवर नवीन व विस्तृत शेड बसविण्याची मागणी करण्यात आली. 3) नवीन अंडरपास (RUB) निर्माण करावा स्टेशनच्या उत्तर व पश्चिम बाजूच्या नागरिकांना स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा फेरा मारावा लागतो. RUB झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील तसेच वाहतूक व्यवस्थाही सुलभ होईल, असे प्रवासी मंडळाने नमूद केले. 4) 19106 भुसावळ–उधना मेमूची स्वच्छता सुधारावी ही गाडी नेहमीच अस्वच्छ आढळते, विशेषतः टॉयलेटची अवस्था अत्यंत खराब असल्याचे प्रवाशांनी सांगितले. भुसावळ येथे या गाडीची नियमित स्वच्छता सुनिश्चित करावी, अशी मागणी DRMसमोर करण्यात आली. 5) उधना–पुणे दररोजची नवीन ट्रेन सुरू करावी ताप्ती व्हॅली परिसरातून पुण्याकडे मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. त्यामुळे उधना–पुणे (वाया नंदुरबार–जळगाव–मनमाड) अशी दैनिक विशेष गाडी सुरू करण्याची आवश्यकता प्रवासी मंडळाने व्यक्त केली. यासोबतच 09575/76 राजकोट–महेबूबनगर स्पेशल आणि 09519/20 मदुराई–ओखा स्पेशल एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना धरणगाव स्टेशनवर थांबा देण्याबाबतही प्रवासी मंडळाने स्वतंत्र निवेदन सादर केले. DRM यांनी सर्व मागण्या सहानुभूतीपूर्वक ऐकून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे प्रवासी मंडळाने सांगितले.

- टेक्नोलॉजी ने एक बार फिर दुनिया को चौंका दिया! अमेरिका के The Cosm में दिखा Daytona 500 का नज़ारा लोगों को इतना रियल लगा कि किसी को यकीन ही नहीं हुआ कि ये सब सिर्फ एक 8K स्क्रीन थी। 87 फुट के इस कर्व्ड LED डोम ने दर्शकों को ऐसा भ्रम दिया जैसे वे सच में रेस ट्रैक के बीच खड़े हों। लाइव स्पोर्ट्स का भविष्य यहीं से बदल रहा है! #Daytona500 #NASCAR #TheCosm #Texas #Innovation #SportsTech #Experience #Racing1
- TMC विधायक हमायूँ कबीर का बड़ा ऐलान , " बाबरी मस्जिद को बनाने का बजट 300 करोड़ रखा गया है जिसे बाद मे बढ़ाया जा सकता है , बाबरी मस्जिद के साथ साथ यहां मेडिकल कॉलेज , हॉस्पिटल , लाइब्रेरी , पार्क और हेलीकाप्टर उतरने के लिए एक हेलीपैड भी बनाया जायेगा "...1
- पैसो से जमीन मी बिकती हैं, जंगल भी, और कुछ भी... आदिवासी?1
- Yeola | सम्राट वर्मा ग्रुप आयोजित सामुदायिक विवाह सोहळा.... प्रतिनिधी सचिन वखारे,येवला.1
- विश्वासघाताची शेवटची रात्र2
- mhaprinirvan Hardik shubhechha5
- पारुंडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी1
- एक आपनी जमीन जंगल को सरक्षण के लिए लढ रहे हैं। एक आपनी नौकरी के लिए दोंनो का संघर्ष हैं मगर नौकरी से पहले जमीन और जंगल हैं। और वह आदिवासी है।1