logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व सभागृह उभारणीसाठी ५ गुंठे जागा व पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपये - धनंजय मुंडे *साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व सभागृह उभारणीसाठी ५ गुंठे जागा व पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपये - धनंजय मुंडे* *महापुरुषांचे विचार आत्मसात करा, त्यांना जातीत बांधू नका - अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे आवाहन* *जात किंवा आडनावाने नाही तर कर्तृत्वाने आपली ओळख व्हावी, असे काम करून दाखवा - ना. पंकजाताई मुंडे* *परळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी* परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचित - उपेक्षितांना बळ दिले, आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या वेदनांना फुंकर घातली, अशा जागतिक कीर्तीच्या थोर व्यक्तीचे स्मारक व सामाजिक सभागृह उभारण्यासाठी ५ गुंठे जागा नगर परिषदेस उपलब्ध करून देणार असून या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात या कामासाठी २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे धनंजय मुंडे यांनी परळीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. महापुरुषांना आपण जातीत वाटून घेतले आहे, मात्र परळीची संस्कृती वेगळी आहे. इथे शिवजयंतीचा अध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजातील व्यक्तीला बनवतो. थोडक्यात महापुरुषांना आपण जातीत बांधून न घेता त्यांचे विचार आत्मसात करून सामाजिक प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. परळी वैद्यनाथ शहरातील साठेनगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ना. पंकजाताई मुंडे याही उपस्थित होत्या. पंकजाताई मुंडे यांनी बोलताना, शिक्षणा चे महत्त्व पटवून सांगितले तसेच तरुणाईला व्यसनमुक्तीचे आवाहन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या चारित्र्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. आज माणसाने स्वतःला वेगवेगळ्या रंगात वाटून घेतले आहे. पण जात, आडनाव यापेक्षा आपली ओळख ही आपल्या कर्तृत्वाने झाली पाहिजे, यासाठी परिश्रम घेण्याची तयारी ठेवा, असा मोलाचा संदेश पंकजाताई मुंडे यांनी दिला. धनंजय मुंडे यांनी यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना आणि कार्याला उजाळा देत अनेक दाखले दिले. अत्यंत उत्साहात हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, बाजीराव धर्माधिकारी, जुगलकिशोर लोहिया, अजय मुंडे, प्रा. विनोद जगतकर, वैजनाथराव सोळंके, भावड्या कराड, पवन मुंडे, अय्युब खान पठाण, शकील कुरेशी, ॲड. वैजनाथ वाघमारे, अंजलीताई माळी, मीराताई नागरगोजे, विक्रम मिसाळ, तानाजी व्हावळे, अश्विन मोगरकर, सुनील मस्के, रमेश मस्के, केशव नागरगोजे, हनुमंत गायकवाड यांसह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच परळी वैद्यनाथ शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

6 hrs ago
user_M. p. gitte
M. p. gitte
परळी, बीड, महाराष्ट्र•
6 hrs ago
af0dae4b-0ac4-4ffa-9947-ac96d772c305

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व सभागृह उभारणीसाठी ५ गुंठे जागा व पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपये - धनंजय मुंडे *साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व सभागृह उभारणीसाठी ५ गुंठे जागा व पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपये - धनंजय मुंडे* *महापुरुषांचे विचार आत्मसात करा, त्यांना जातीत बांधू नका - अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे आवाहन* *जात किंवा आडनावाने नाही तर कर्तृत्वाने आपली ओळख व्हावी, असे काम करून दाखवा - ना. पंकजाताई मुंडे* *परळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी* परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचित - उपेक्षितांना बळ दिले,

78816a30-5bf0-4a64-83a1-bb48fc46e81d

आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या वेदनांना फुंकर घातली, अशा जागतिक कीर्तीच्या थोर व्यक्तीचे स्मारक व सामाजिक सभागृह उभारण्यासाठी ५ गुंठे जागा नगर परिषदेस उपलब्ध करून देणार असून या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात या कामासाठी २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे धनंजय मुंडे यांनी परळीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. महापुरुषांना आपण जातीत वाटून घेतले आहे, मात्र परळीची संस्कृती वेगळी आहे. इथे शिवजयंतीचा अध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजातील व्यक्तीला बनवतो. थोडक्यात महापुरुषांना आपण जातीत बांधून न घेता त्यांचे विचार आत्मसात करून सामाजिक प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना

cb6aace8-eb64-451f-a402-1e3ed594ded1

म्हणाले. परळी वैद्यनाथ शहरातील साठेनगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ना. पंकजाताई मुंडे याही उपस्थित होत्या. पंकजाताई मुंडे यांनी बोलताना, शिक्षणा चे महत्त्व पटवून सांगितले तसेच तरुणाईला व्यसनमुक्तीचे आवाहन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या चारित्र्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. आज माणसाने स्वतःला वेगवेगळ्या रंगात वाटून घेतले आहे. पण जात, आडनाव यापेक्षा आपली ओळख ही आपल्या कर्तृत्वाने झाली पाहिजे, यासाठी परिश्रम घेण्याची तयारी ठेवा, असा मोलाचा संदेश पंकजाताई मुंडे यांनी दिला. धनंजय मुंडे यांनी यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना

c102b008-b77d-4bbc-8779-fe18a7a1c8c4

आणि कार्याला उजाळा देत अनेक दाखले दिले. अत्यंत उत्साहात हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, बाजीराव धर्माधिकारी, जुगलकिशोर लोहिया, अजय मुंडे, प्रा. विनोद जगतकर, वैजनाथराव सोळंके, भावड्या कराड, पवन मुंडे, अय्युब खान पठाण, शकील कुरेशी, ॲड. वैजनाथ वाघमारे, अंजलीताई माळी, मीराताई नागरगोजे, विक्रम मिसाळ, तानाजी व्हावळे, अश्विन मोगरकर, सुनील मस्के, रमेश मस्के, केशव नागरगोजे, हनुमंत गायकवाड यांसह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच परळी वैद्यनाथ शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.
    1
    8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष!
रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी.
महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध!
8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष!
रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी.
महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध!
सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026.
लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले.
लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती.
तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला.
"गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." 
यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
    1
    लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
    3
    बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी
नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण

 दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार 
बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी
नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली.
या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा
    1
    तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा
तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    1
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    1
    मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    1
    महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल बीड प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.
    4
    लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे

 राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल 

लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे
राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल 
बीड प्रतिनिधी :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी  अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.
ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.