logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड जिल्ह्याला चार दिवस ‘यलो अलर्ट’; विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता! मु प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ३० मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३० व ३१ मार्च २०२६ तसेच १ व ३ एप्रिल २०२६ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिकशक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारीघ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असालआणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोकेघालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युतउपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. या गोष्टी करु नका:  आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळकरू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्यासहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्या जवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

2 hrs ago
user_Press Mukhed Bablu Mulla
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
2 hrs ago

नांदेड जिल्ह्याला चार दिवस ‘यलो अलर्ट’; विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता! मु प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ३० मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३० व ३१ मार्च २०२६ तसेच १ व ३ एप्रिल २०२६ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिकशक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारीघ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असालआणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोकेघालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युतउपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. या गोष्टी करु नका:  आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळकरू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्यासहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्या जवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    1
    Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    user_श्री व्यंकटेश देवराव कदम
    श्री व्यंकटेश देवराव कदम
    Voice of people बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    1
    शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    1
    ये सारी बात का जिम्मेदार कोण है?
चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो.
बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है.
मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. 
और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली.
घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    1
    हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका
हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे.
निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे.
👉 नागरिकांची मागणी:
✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
✔️ देयके तात्काळ थांबवा
✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा
सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे.
#Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    1
    जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी..
जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे.
या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory
    1
    खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा
हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो 
आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे 
दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो 
#RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.