logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सोरापाडा येथे ११ जुलै २०२६ रोजी व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील युवक-युवती, महिला, नागरिक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनमोल पाडवी यांनी व्यसनाचे शरीर, मन, कुटुंब आणि समाज यांवर होणारे घातक दुष्परिणाम सविस्तरपणे पटवून दिले. तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि दारू यांसारखी व्यसने शरीरासाठी अत्यंत घातक असून त्यामुळे कर्करोग, हृदयविकार, यकृताचे आजार आणि श्वसनाचे विकार यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, निरोगी व आनंदी जीवनासाठी नियमित व्यायाम, योग, पौष्टिक आहार, फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करण्याचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व नागरिकांनी "व्यसनमुक्त सोरापाडा – हर घर व्यसनमुक्त" हा संकल्प करत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका संगीता पाडवी व जर्मीबाई पाडवी यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज पाडवी यांनी जनजागृतीपर गीते सादर केली, तर ॲड. पूनम पाडवी, छायाचित्रकार पवन पाडवी, बबन पाडवी आणि सरगम पाडवी यांनी मोलाचे सहकार्य केले. समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.

4 hrs ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
4 hrs ago
a7f07d73-292b-46b3-bd31-447ea43a497c

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सोरापाडा येथे ११ जुलै २०२६ रोजी व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील युवक-युवती, महिला, नागरिक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनमोल पाडवी यांनी व्यसनाचे शरीर, मन, कुटुंब आणि समाज यांवर होणारे घातक दुष्परिणाम सविस्तरपणे पटवून दिले. तंबाखू, गुटखा,

f31d8351-ee55-4e25-b6c8-bc08030b0dc5

सिगारेट आणि दारू यांसारखी व्यसने शरीरासाठी अत्यंत घातक असून त्यामुळे कर्करोग, हृदयविकार, यकृताचे आजार आणि श्वसनाचे विकार यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, निरोगी व आनंदी जीवनासाठी नियमित व्यायाम, योग, पौष्टिक आहार, फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करण्याचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व नागरिकांनी "व्यसनमुक्त सोरापाडा – हर घर व्यसनमुक्त" हा संकल्प करत व्यसनमुक्त

90fcb5e6-4557-4045-87cc-cbaf9e8bd44b

समाज निर्माण करण्याची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका संगीता पाडवी व जर्मीबाई पाडवी यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज पाडवी यांनी जनजागृतीपर गीते सादर केली, तर ॲड. पूनम पाडवी, छायाचित्रकार पवन पाडवी, बबन पाडवी आणि सरगम पाडवी यांनी मोलाचे सहकार्य केले. समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लाभ क्षेत्राचा दाखला मिळण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ थांबवून त्यांना त्वरित दाखले देण्यात यावेत, अन्यथा प्रकाशा पाटबंधारे उपविभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहादाचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिला आहे. सध्या शेतकऱ्यांना लाभ क्षेत्राचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सुमारे २५ दिवस ते महिनाभर ताटकळत राहावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही ससेहोलपट थांबवण्यासाठी अभिजीत पाटील यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू झाली असली तरी प्रकाशा बॅरेज उपविभागीय कार्यालयातून अद्यापही शेतकऱ्यांना दाखले मिळत नसल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी १० जुलै २०२६ रोजी प्रकाशा येथील बॅरेज कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना तात्काळ दाखले वितरीत करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली असून तसे न झाल्यास या ठिकाणी लवकरच पुढचे आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
    1
    लाभ क्षेत्राचा दाखला मिळण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ थांबवून त्यांना त्वरित दाखले देण्यात यावेत, अन्यथा प्रकाशा पाटबंधारे उपविभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहादाचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिला आहे. सध्या शेतकऱ्यांना लाभ क्षेत्राचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सुमारे २५ दिवस ते महिनाभर ताटकळत राहावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही ससेहोलपट थांबवण्यासाठी अभिजीत पाटील यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू झाली असली तरी प्रकाशा बॅरेज उपविभागीय कार्यालयातून अद्यापही शेतकऱ्यांना दाखले मिळत नसल्याचे समोर आले आहे.

याच पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी १० जुलै २०२६ रोजी प्रकाशा येथील बॅरेज कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना तात्काळ दाखले वितरीत करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली असून तसे न झाल्यास या ठिकाणी लवकरच पुढचे आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
    1
    नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते.

यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील शिंदेवस्ती परिसरात आज सकाळी एका हृदयद्रावक दुर्घटनेत ५२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. दरेगाव येथील रहिवासी असलेल्या इंदुबाई संतोष देवरे या आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात माहेरी आल्या होत्या. नात शिक्षणासाठी तिथेच त्यांच्या भावाकडे राहत असून, वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इंदुबाई कालच राजदेरवाडीला पोहोचल्या होत्या. आज सकाळी इंदुबाई नेहमीच्या नित्यक्रमासाठी आणि प्रातःविधीसाठी घराबाहेर पडल्या असताना हा अनर्थ घडला. शिंदेवस्ती जवळील डोंगराचा भाग अचानक खचल्याने त्यावरून एक मोठा दगड थेट त्यांच्या अंगावर कोसळला. वजनी दगडाखाली दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कालपर्यंत आनंदाचे वातावरण असलेल्या घरात एका क्षणात शोककळा पसरली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे दरेगाव आणि राजदेरवाडी दोन्ही गावांवर शोकवदना पसरली असून परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवड पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
    2
    चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील शिंदेवस्ती परिसरात आज सकाळी एका हृदयद्रावक दुर्घटनेत ५२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. दरेगाव येथील रहिवासी असलेल्या इंदुबाई संतोष देवरे या आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात माहेरी आल्या होत्या. नात शिक्षणासाठी तिथेच त्यांच्या भावाकडे राहत असून, वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इंदुबाई कालच राजदेरवाडीला पोहोचल्या होत्या.

आज सकाळी इंदुबाई नेहमीच्या नित्यक्रमासाठी आणि प्रातःविधीसाठी घराबाहेर पडल्या असताना हा अनर्थ घडला. शिंदेवस्ती जवळील डोंगराचा भाग अचानक खचल्याने त्यावरून एक मोठा दगड थेट त्यांच्या अंगावर कोसळला. वजनी दगडाखाली दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कालपर्यंत आनंदाचे वातावरण असलेल्या घरात एका क्षणात शोककळा पसरली.

माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे दरेगाव आणि राजदेरवाडी दोन्ही गावांवर शोकवदना पसरली असून परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवड पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।
    1
    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नाशिकच्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड (वय ३७) यांना ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कारवाई थांबवून त्यांचे वाहन सोडण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    नाशिकच्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड (वय ३७) यांना ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कारवाई थांबवून त्यांचे वाहन सोडण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती.

तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    user_SANTOSH VIDHATE
    SANTOSH VIDHATE
    Mechanic दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून प्रशांत तुळशीराम वाडीले नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर नाशिक येथे आणण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाल्याप्रमाणे, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण गैरव्यवहारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. तपासादरम्यान समोर आले आहे की, प्रशांत वाडीले याने धुळे जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा वापर करून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस हवालदार कराड, गिते, पोलीस अंमलदार येवले तसेच अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस अंमलदार पचलोरे व महाले यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून वाडीले याला अटक केली. आरोपीला धुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल यांचे पथक करत आहे.
    1
    बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून प्रशांत तुळशीराम वाडीले नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर नाशिक येथे आणण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाल्याप्रमाणे, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण गैरव्यवहारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत.

तपासादरम्यान समोर आले आहे की, प्रशांत वाडीले याने धुळे जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा वापर करून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस हवालदार कराड, गिते, पोलीस अंमलदार येवले तसेच अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस अंमलदार पचलोरे व महाले यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून वाडीले याला अटक केली.

आरोपीला धुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल यांचे पथक करत आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पिशोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मोठा दणका बसला आहे.
    1
    औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पिशोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मोठा दणका बसला आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत धडगाव तालुक्यातील मांडवी येथील शासकीय आश्रम शाळेतील ५० ते ६० विद्यार्थिनींनी शाळेतील असुविधा आणि त्रासाला कंटाळून थेट पायी मोर्चा काढला. आश्रमशाळेत पुरेसे शिक्षक आणि पुस्तके उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या या विद्यार्थिनींनी आपल्या विविध प्रश्नांवर दाद मागण्यासाठी तब्बल २२ किलोमीटर पायपीट केली. शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्याने त्यांना पुन्हा शाळेत पाठवण्यात यावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. मांडवी आश्रमशाळेतून तळोदा येथील प्रकल्प कार्यालयाकडे पायी निघाल्या असताना, वाटेत नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते लतिका राजपूत, सियाराम पाडवी, चेतन साळवे, राजेश गुरुजी, प्रेमसिंग गुरुजी व इतर सहकारी त्यांना भेटले. कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता विद्यार्थिनींनी आपले गाऱ्हाणे मांडले. यानंतर कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींची समस्या समजून घेत त्यांना बिजरी आश्रमशाळेत नेले. नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाबाबत तळोदा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तातडीने दाद मागितली आहे. आश्रमशाळेतील या असुविधांच्या विरोधात कडक कारवाई करून विद्यार्थिनींना त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत धडगाव तालुक्यातील मांडवी येथील शासकीय आश्रम शाळेतील ५० ते ६० विद्यार्थिनींनी शाळेतील असुविधा आणि त्रासाला कंटाळून थेट पायी मोर्चा काढला. आश्रमशाळेत पुरेसे शिक्षक आणि पुस्तके उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या या विद्यार्थिनींनी आपल्या विविध प्रश्नांवर दाद मागण्यासाठी तब्बल २२ किलोमीटर पायपीट केली. शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्याने त्यांना पुन्हा शाळेत पाठवण्यात यावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.

मांडवी आश्रमशाळेतून तळोदा येथील प्रकल्प कार्यालयाकडे पायी निघाल्या असताना, वाटेत नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते लतिका राजपूत, सियाराम पाडवी, चेतन साळवे, राजेश गुरुजी, प्रेमसिंग गुरुजी व इतर सहकारी त्यांना भेटले. कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता विद्यार्थिनींनी आपले गाऱ्हाणे मांडले. यानंतर कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींची समस्या समजून घेत त्यांना बिजरी आश्रमशाळेत नेले.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाबाबत तळोदा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तातडीने दाद मागितली आहे. आश्रमशाळेतील या असुविधांच्या विरोधात कडक कारवाई करून विद्यार्थिनींना त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.