“शिवरायांच्या पुतळ्यासमोरील पेट्रोल पंप हटवा!” — विशेष सभेत सत्ताधाऱ्यांची कोंडी, विरोधकांचा ठाम पाठींबा उमरखेड वार्ता मुख्य संपादक उमरखेड | दि. 30 मे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील पेट्रोल पंप हटवण्याच्या मागणीवरून आज दुपारी 3 वाजता घेण्यात आलेली विशेष सभा चांगलीच गाजली. या सभेत सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करत प्रशासनाची निष्क्रियता उघडकीस आणली. सभेची सुरुवात होताच नगरसेविका रुपाली सुधीर कवाने यांनी निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. “सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पूर्ण करून देऊ,” असे वचन जनशक्ती पॅनेलने दिले होते. त्या वचनपूर्तीसाठीच ही विशेष सभा बोलावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावर नगरसेवक सुरेंद्र कोडगीरवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “मागील 29 जानेवारीच्या सभेनंतर कोणताही ठोस पाठपुरावा झाला नाही, त्यामुळे 90 दिवसांनी पुन्हा त्याच विषयावर सभा घ्यावी लागते, ही सत्ताधाऱ्यांची राजकीय हार आहे का?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. दरम्यान, शिक्षण सभापती यांनी पीठासन अधिकाऱ्यांची परवानगी न घेता उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यांच्या या भूमिकेला स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब नाईक यांनी पाठिंबा दिल्याने वातावरण आणखी तापले. विरोधकांचा स्पष्ट इशारा: सभेत विरोधकांनी स्पष्ट भूमिका घेतली की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील सुशोभीकरणात अडथळा ठरणारा सारडा पेट्रोल पंप तात्काळ हटवण्यात यावा. “या प्रश्नावर आम्ही पूर्णपणे तुमच्या सोबत आहोत, पण आता केवळ आश्वासन नको — ठोस निर्णय घ्या,” असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. एकूणच, आजची सभा ही केवळ चर्चा न राहता सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली असून, आता पेट्रोल पंप हटवण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

- शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress1
- आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.1
- मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.4
- श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती1
- Post by Mohsin ahmed khan1
- स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! #SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat1