जालना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. २७ मे रोजी दुपारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून दोन धारदार खंजर जप्त केले आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एमआयडीसी भागातील स्वराज पार्किंगसमोरील रस्त्यावर दोन युवक धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजवत असल्याची खबर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेऊन, त्यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित ओमकार शामधन सिंघल (वय २२, रा. संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) आणि ओमकार गिरीजाशंकर शेळके (वय १९, रा. धनगर पिंपरी, ता. अंबड, जि. जालना) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्या अंगझडतीत दोन धारदार खंजर सापडले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख आणि कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुब वेताळ आणि रवी देशमुख करत आहेत. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सपोउपनि मनसुब वेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे आणि रवींद्र देशमुख यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

- पुण्यातील विकाश नगर देहूरोड विभागाच्या भीमा शंकर कॉलनी परिसरात महानगरपालिकेचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.4
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.1
- घडलेली घटना ही एक प्रकारे हत्याच आहे असे ठामपणे सांगण्यात आले आहे. या घटनेच्या पाठीमागे जे कोणीही असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.1
- वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तोतया पोलिसाने मनी लाँड्रिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या घटनेत फसवणूकदाराने पीडित व्यक्तीकडून तब्बल १२.२८ लाख रुपये हडपले आहेत.1
- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूच्या सेवनामुळे २० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, प्रशासन अखेर जागे झाल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत, वाकड परिसरातील एका घरातून सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. घरातूनच हा अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विषारी दारू प्रकरणाच्या गंभीरतेनंतर, पोलिसांकडून आता शहरभरातील अशाच इतर अवैध दारू अड्ड्यांवरही व्यापक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.1
- जलसंपदा विभागाने आपली १४ कार्यालये नाशिक अहिल्यानगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. प्रदीप चव्हाण यांनी या निर्णयावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, हा मराठवाड्याला वाळवंट करण्याचा डाव आहे.1
- पुणे शहरात शिवसेनेने अवैध दारूच्या अड्ड्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या कारवाईदरम्यान शेकडो लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली.1
- विजयपूरमध्ये एक थरारक आणि निर्घृण सामूहिक हत्याकांड घडले आहे. या घटनेत एकूण ६ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, हल्लेखोरांनी गोळीबार करत आणि कोयत्याने गळे चिरून हे क्रूर कृत्य केले.1