गावकऱ्यांनी केलेला सत्कार लाखमोलाचा असतो-सत्कारमुर्तींची भावना चपळगांव-बावकरवाडी ग्रामपंचायत परिवार व ग्रामस्थांकडुन गावातील सेवानिवृत्त गुरुजन, पदोन्नती मिळवलेले गुरुजन व कष्ट व जिद्दीच्या बळावर पोलीस दलात भरती मिळवलेल्या तरुणींचा सन्मान करण्यात आला.यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष बिराजदार गुरुजी, काशिनाथ बंडगर गुरुजी, नुतन मुख्याध्यापक विश्वनाथ बाणेगांव, नुतन पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कदम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तर महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या गावच्या संघर्षकन्या साक्षी सुरेश कल्याणशेट्टी व शिवानी सुरेश मनगुळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासक सरपंच वर्षा भंडारकवठे होत्या. तर व्यासपीठावर तंटामुक्त अध्यक्ष संजय बाणेगांव, पोलिस पाटील विवेकानंद हिरेमठ,पोलिस पाटील दयानंद बावकर,सामाजिक कार्यकर्ते सिध्दाराम भंडारकवठे,परमेश्वर वाले,गणेश कोळी,तंटामुक्त उपाध्यक्ष विशालराज नन्ना, सोसायटीचे व्हा.चेअरमन सुरेश सुरवसे,गंगाधर कांबळे गुरुजी,महादेव मोची, सुभाष बुगडे,प्रकाश बुगडे,विजयकुमार कोरे,श्रीशैल गाडवे,मोनप्पा दुलंगे,मडोळप्पा बाणेगांव,अंबण्णा हाल्लोळे,शरणप्पा हन्नुरे,दाऊद पटेल,लिपीक उमेश सोनार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मनोगत व्यक्त करत ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंभुलिंग अकतनाळ यांनी तर आभार सिध्दाराम भंडारकवठे यांनी मानले.

- Post by Digital media.1
- गॅसवर स्वयंपाक का केला ? आशा किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप.....1
- लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे1
- 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.1
- अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे. पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या एकूण किंमत – ₹3,500/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. या कारवाईत मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले,पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.4
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- AJITDADA MEMORIES : अजितदादांची आठवण सांगताना युवा नेते जय पवार बारामतीकरांना काय म्हणाले..? पहा व्हिडीओ..!1
- 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ1