सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी,
कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व
उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे,
तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
- प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा अकोट तालुका प्रतिनिधी..... अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुले मुली विठु मावली च्या गजरात वारकरी च्या गणवेशात टाळ मृदुंगात रमली विशेषता पालकांनी या सोहळ्या करीता चिमुकल्यांना छान प्रकारे तयारी करून उत्साह व्यक्त केला. या सर्व मुलांचा उत्साह महिला व पुरुष पालक यांनी पण घेतला. सर्व सहभागी मुलांना 15 ऑगष्ट 26 रोजी विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे या प्रसंगी शिक्षक वृंद सौ पुजा म्हसाये कोमल धांडे धांडे मॅडम वैशाली धांडे अक्षय निबाळकर शिवनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमा करीता प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ स्वातीताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावरा मंचनपुर देऊळगाव रंभापुर आसेगांव बाजार येथील पालकांनी सहकार्य केले.1
- बुलढाण्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद मध्ये पावसाचा हाहाकार. हजारो हेक्टर वरील पिके वाहून गेली. राष्ट्रीय महामार्ग 161 जी ठप्प1
- माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती1
- प्रभाग क्रमांक 14 मध्ये शेतातील पाणी घरात घुसले; नगर परिषद उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी केली तातडीने मदत प्रभाग क्रमांक 14 मध्ये शेतातील पाणी घरात घुसले; नगर परिषद उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी केली तातडीने मदत अकोट तालुका प्रतिनिधी.... दि. 31 जुलै : अकोट नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये घुसल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.या बाबतीत येथील नागरिकांच्या जिवित्वास हाणी पोहचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.या घटनेची माहिती मिळताच अकोट नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी तातडीने सफाई कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.व सफाई कामगार यांनी नाल्यांमधील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी मार्ग मोकळा केला. त्यामुळे या परिसरात घरांमध्ये साचलेले पाणी कमी होण्यास मदत झाली. अचानक आलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नगर परिषदेच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.2
- जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी* जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- - लोहारी रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल; नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलसमोरील समस्या गंभीर प्रतिनिधी : वर्षा फुसे | अकोट मुंडगाव येथील लोहारी रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्वर्गीय नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. लहान मुलांचे दप्तर व गणवेश भिजत असून, अनेक विद्यार्थ्यांना घसरून पडण्याची भीती कायम असते. शिक्षकांनाही शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, लोहारी रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. "शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज." - लोहारी रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल; नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलसमोरील समस्या गंभीर प्रतिनिधी : वर्षा फुसे | अकोट मुंडगाव येथील लोहारी रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्वर्गीय नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. लहान मुलांचे दप्तर व गणवेश भिजत असून, अनेक विद्यार्थ्यांना घसरून पडण्याची भीती कायम असते. शिक्षकांनाही शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, लोहारी रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. "शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज."4