logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाणी हा नागरिकांचा मुलभूत अधिकार...प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार *ग्रामीण भागातील अपूर्ण जलजीवन योजनांवर तातडीने लक्ष देण्याचे निर्देश* मंडळ अध्यक्षांना गावागावात जाऊन पाणीपुरवठ्याची स्थिती तपासण्याचे आवाहन बिनधास्त जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर - सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम संवेदनशील असलेले नेते राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडली. ऑडिओ ब्रिज ‘संवाद सेतू’च्या माध्यमातून भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजनांमुळे सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तीव्र चिंता व्यक्त केली. “उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई भासायला नको. पाणी हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत पाणी पोहोचलेच पाहिजे,” असे ठामपणे सांगत आ. श्री. मुनगंटीवार यांनी या विषयाकडे तातडीने लक्ष देण्यासाठी विशेष भर दिला.* या ऑडिओ संवाद सेतूमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, संघटन प्रभारी राम लाखिया आणि सर्व मंडळ अध्यक्ष उपस्थित होते. पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते तसेच विजेचे बिल न भरल्यामुळे योजना बंद पडणे, लिकेजमुळे पाणीपुरवठा खंडित होणे, ग्रामपंचायतींकडे देखभाल-दुरुस्तीचा निधी नसणे, तसेच काही ठिकाणी आरओ यंत्रणा बसवूनही योग्य मेंटेनन्स न होणे या सर्व कारणांमुळे गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि वंचित कुटुंबांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागू नये, यासाठी मंडळ अध्यक्षांनी प्रत्येक तालुक्यात दौरे करून प्रत्यक्ष गावागावात जाऊन पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घ्यावी. त्यातील अडचणी समजून घेत त्या नोंद करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिल्या. “पाणी ही केवळ सुविधा नाही, तर जीवनाचा मूलभूत हक्क आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे ईश्वरीय कार्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या गावात, आपल्या तालुक्यात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, समस्या ओळखाव्यात आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे स्पष्ट निर्देश दिले. बोर चांदली, येरगाव, दुर्गापूर, कोठारी, घनोट्टी तुकूम, बोर्डा झुल्लूरवार, भीमनी, बेंबाळ, जुनासुर्ला आदी गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे विशेष लक्ष देण्याचे सांगत, आवश्यक ठिकाणी बैठका घेऊन तातडीने उपाययोजना निश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. सार्वजनिक मालमत्ता ही समाजाची संपत्ती आहे, ती दुर्लक्षित राहू नये, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक योजनेची माहिती गोळा करून अडचणींची सविस्तर यादी तयार करून देण्याचे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले. लवकरच, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत विस्तृत बैठक घेऊन या योजना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आ. मुनगंटीवार यांनी दिली. विहीर, हातपंप आणि नळ योजना यांसारख्या सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा मजबूत करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी आणण्याचे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याचबरोबर, नुकतेच केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत पोंभुर्णा नगरपंचायतसाठी मंजूर झालेल्या तब्बल ४०.८४ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाचा उल्लेख केला. पाण्याच्या प्रश्नामुळे जनतेला भेडसावणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून, शहराच्या, गावाच्या दीर्घकालीन पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निश्चित पूर्ण शक्तीने प्रयत्न करू, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी या अभियानात जीव ओतून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

4 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
4 hrs ago
1f0d8cde-e1e9-45b2-a0b1-9cba7fff6503

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    1
    छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण
जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Suresh k langde
    1
    Post by Suresh k langde
    user_Suresh k langde
    Suresh k langde
    कळमेश्वर, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    1
    कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    1
    उमरेड ( राजु जांभुळे )
भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • औराई सीओ के खिलाफ ख़बर नहीं चलाने के लिए सीओ के करीबी ने पत्रकार को धम/काया! #aurai #अंचल #VijaySinha #biharpolice #Muzaffarpurpolice #BreakingNews #muzaffarpur #worldbiharnews #viralreels
    1
    औराई सीओ के खिलाफ ख़बर नहीं चलाने के लिए सीओ के करीबी ने पत्रकार को धम/काया!
#aurai #अंचल #VijaySinha #biharpolice #Muzaffarpurpolice #BreakingNews #muzaffarpur #worldbiharnews #viralreels
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम* चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई। इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।
    1
    ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम*
चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई।
प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी।
घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई।
इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।
    user_दिनेश सिंह कुशवाहा
    दिनेश सिंह कुशवाहा
    Classified ads newspaper publisher समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    1
    नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.