शहापूर तालुक्यात 'पोटहिस्सा मोजणी' प्रकल्पाची सुरूवात ठाणे:शेतकऱ्यांच्या जमिनींचे अचूक विभाजन होऊन त्यांना हक्काचे आणि अद्ययावत दस्तऐवज मिळावेत, यासाठी राज्य शासनाच्या 'पोटहिस्सा मोजणी' प्रकल्पाची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात होणार आहे. अत्याधुनिक 'रोव्हर' तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही मोजणी करण्यात येणार असून त्यामुळे जमिनींचे अचूक मापन जलदगतीने पूर्ण होणार आहे. शहापूर तालुक्यातील तब्बल २२५ गावांमध्ये 'पोटहिस्सा मोजणी' हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात डोळखांब परिसरातील पोफोडी, आपटे, आदिवली, मानखिंड आणि ठुणे (बु.) या गावांपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक शरद काळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार मोजणीची प्रक्रिया वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच तालुक्यातील ज्या ७/१२ उताऱ्यांवर अद्याप मोजणी झालेली नाही किंवा जमिनींचे हिस्से स्पष्ट झालेले नाहीत, अशा सर्व जमिनींची नव्याने मोजणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे केवळ १० गुंठे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा लाभ मिळणार असून त्यांच्या जमिनींचे अचूक पोट हिस्से निश्चित केले जाणार आहेत.या उपक्रमामुळे प्रत्येक जमीनधारकाला अद्ययावत ७/१२ उतारा आणि हिस्सानिहाय नकाशा उपलब्ध होणार आहे. परिणामी जमीन खरेदी-विक्री व्यवहार अधिक सुलभ होणार असून शासकीय योजनांचा लाभ घेणे, पीक विमा मिळविणे तसेच नैसर्गिक आपत्तीतील भरपाई प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. एकूणच, 'पोटहिस्सा मोजणी' प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जमिनीच्या हक्कांच्या प्रश्नांना मार्ग मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- राज्यसभेची जागा शरद पवार यांना दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात अंतर्गत वाद सुरू झाले असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत हा वाद उफाळून आला आहे1
- अंबरनाथ प्रशासन नगरपालिका शिव मंदिर1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- प्रेसिडेंट कप इंडिया 2026 का उद्घाटन करने पहुंचे बॉलीवुड के भाईजान सलमान खान BNN NEWS1
- मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes1
- वसई, महाराष्ट्र: मानवता को शर्मसार करने वाला यह वीडियो सामने आया है। संदीप पवार नाम के एक व्यक्ति ने चार वर्षीय बच्चे को पूरी ताकत से सड़क पर पटक दिया। बच्चे का नाम विघ्नेश बताया जा रहा है। बच्चे के पिता का संदीप के साथ विवाद चल रहा था। आरोप है कि उसी विवाद का गुस्सा संदीप ने मासूम बच्चे पर निकाला। #Vasai #ChildSafety #CrimeNews #India #Justice1
- Post by Sanjay Dsilva1
- अंबड तालुक्यातील महाकाळा परिसरात आज सायंकाळी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या तीन युवकांवर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोन तरुण जागीच मृत्युमुखी पडले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपशील: आज सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती परिसरात ही घटना घडली. अचानक आलेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी तीन तरुणांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. याच दरम्यान झाडावर जोरदार वीज कोसळली. यामध्ये: १. गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१ वर्षे) – जागीच मृत्यू. २. आदित्य दगडू बेद्रे (वय २० वर्षे) – जागीच मृत्यू. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यवाही: घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्याची प्रक्रिया सुरू असून, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तातडीने घटनास्थळाचा पंचनामा व सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन स्तरावरून मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.1