logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना अभिजात सन्मान मिळावा : जयदीप कवाडे अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना अभिजात सन्मान मिळावा : जयदीप कवाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे भव्य सामाजिक रॅली अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना शासनाच्या धोरणांत स्थान देण्याची मागणी नागपूर, (दि. १ ऑगस्ट) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नागपुरात भव्य सामाजिक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. दीक्षाभूमी येथून प्रारंभ झालेल्या या रॅलीचा समारोप अण्णाभाऊ साठे चौक येथे झाला. रॅलीपूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर व कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई कवाडे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयदीप कवाडे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर वंचित, शोषित, श्रमिक, भटक्या-विमुक्त समाजाच्या संघर्षाला शब्दबद्ध करणारे सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांच्या स्मृतींना केवळ औपचारिक अभिवादन न करता त्यांना अभिजात सन्मान मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब शासनाच्या धोरणांमध्ये दिसले, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल. कवाडे यांनी राज्य शासनाकडे अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील ऐतिहासिक वास्तूला स्मारकाचा दर्जा देण्याची जोरदार मागणी केली. ही वास्तू त्यांच्या संघर्षमय जीवनाची साक्ष असून ती प्रेरणास्थळ म्हणून विकसित व्हावी, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला समर्पित भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून त्या प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. सध्या अनेक योजना निधीअभावी अपेक्षित परिणाम साधू शकत नाहीत. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या विकासासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी. जयदीप कवाडे यांनी वडार, बंजारा, पारधी, कंजरभाट, गोंधळी तसेच इतर भटक्या-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. शिक्षण, रोजगार, उद्योग, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. कार्यक्रमात बोलताना त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचा गौरव करत सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून अन्यायग्रस्त समाजाला संघर्षाची दिशा दिली. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. रॅलीदरम्यान "अण्णाभाऊ अमर रहे", "सामाजिक न्याय आमचा हक्क आहे", "अण्णाभाऊ यांच्या विचारांना शासनमान्यता द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येने युवक, महिला आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, शहराध्यक्ष कैलास बोंबले, शहर कार्याध्यक्ष संजय सूर्यवंशी, शहर महासचिव दिलीप पाटील, पूर्व विदर्भ महासचिव डॅनी शामकुंवर, दक्षिण-पश्चिम अध्यक्ष स्वप्निल महाल्ले, दक्षिण-पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष श्रेयस गडले, प्रवेश ठवरे, प्रजोत कांबळे, सोमेश काले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जयदीप कवाडे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा सन्मान केवळ घोषणांमधून किंवा सोशल मीडियावरील पोस्टमधून होणार नाही. त्यांच्या विचारांना शासनाच्या धोरणांमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये आणि विकासाच्या योजनांमध्ये स्थान मिळाले, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर आधारित सामाजिक परिवर्तनाचा लढा आणखी व्यापक व निर्णायक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले.

3 hrs ago
user_Pallavi Patil, निवासी संपादक
Pallavi Patil, निवासी संपादक
Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
25e25801-4e51-4cb3-9192-5b88b2218daf

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"
    1
    बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    1
    विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • "शिवरायांचा अपमान?" किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त! कामठीत संतापाचा स्फोट! दोषी कोण? कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डीव्हायडर कोणी तोडला? अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे? प्रशासनाने कारवाई का केली नाही? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? #KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews #JB Sharma
    1
    "शिवरायांचा अपमान?"
किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त!
कामठीत संतापाचा स्फोट!
दोषी कोण?
कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डीव्हायडर कोणी तोडला?  अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे?  प्रशासनाने कारवाई का केली नाही?  दोषींवर गुन्हा दाखल होणार का?
#KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews
#JB Sharma
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    1
    एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात.....
तालुका प्रतिनिधी हिंगणा 
हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू 
उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    1
    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    43 min ago
  • *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया
    1
    *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...*
शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही.
चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया.
चला, एकत्र काम करूया.
चला, भारतासाठी काम करूया
    user_Harshal kukadkar
    Harshal kukadkar
    Security Guard सावनेर, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • स्मशानभुमी परिसर येथे जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर कारवाई, शहरात एकच खळबळ उमरेड । भिवापूर (प्रतिनिधि ) स्मशानभुमी परिसरात येथे अवैधरित्या ५२ ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ६ जणावर पोलिसांनी कारवाई करीत धाड टाकली. यात २ लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन दिवसा अगोदर वाडा बिअर मध्ये जुगार खेळतांना अशीच कारवाई करण्यात आली होती. आज दि. १ ऑगस्टला सायंकाळी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आल्याने शहरात चांगळीच खळबळ माजली. सदरच्या कारवाईमध्ये सहा मोबाइल व चार दुचाकी वाहन असा एकूण र लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किशोर प्रल्हाद पिंपळकर वय ३२ भिवापूर, सचिन सुरेश दिघोरे घुबडतोली, भिवापूर, अजय बिसन वाघमारे वय ३८ वर्षे पारवे पेट्रोल पंप जवळ, भिवापूर, कुशाब जांभुळे भिवापूर, कलदार प्रल्हाद गाडवे सिद्धार्थ नगर ,भिवापूर धनराज गोपाळराव नागपुरे वय ५४ वर्षे गुरुदेव वार्ड ,भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी केली
    1
    स्मशानभुमी परिसर येथे जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर कारवाई, शहरात एकच खळबळ
उमरेड । भिवापूर (प्रतिनिधि )
स्मशानभुमी परिसरात येथे अवैधरित्या ५२ ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ६ जणावर पोलिसांनी कारवाई करीत धाड टाकली. यात २ लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन दिवसा अगोदर वाडा बिअर मध्ये जुगार खेळतांना अशीच कारवाई करण्यात आली होती. आज दि. १ ऑगस्टला सायंकाळी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आल्याने शहरात चांगळीच खळबळ माजली.
सदरच्या कारवाईमध्ये सहा मोबाइल व चार दुचाकी वाहन असा एकूण र लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किशोर प्रल्हाद पिंपळकर वय ३२ भिवापूर, सचिन सुरेश दिघोरे घुबडतोली, भिवापूर, अजय बिसन वाघमारे वय ३८ वर्षे पारवे पेट्रोल पंप जवळ, भिवापूर, कुशाब जांभुळे भिवापूर, कलदार प्रल्हाद गाडवे सिद्धार्थ नगर ,भिवापूर धनराज गोपाळराव नागपुरे वय ५४ वर्षे गुरुदेव वार्ड ,भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी केली
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    1
    SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की।
अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है।
उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी।
BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की।
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.