logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात २० आणि २१ जून रोजी दोन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रोटरी क्लब आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला कारागृहातील कैदी तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारागृहाच्या अधीक्षिका अरुणा मुगुटराव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकार तथा ब्रह्माकुमार दिलीप बोरसे, बी.के. सुधा माता, बी.के. सुनीता माता, योग प्रशिक्षक अशोक गवळी, राजेश साळी तसेच रोटरी क्लबचे कैलास सोनवणे, विश्वास शिंपी आणि अजय चव्हाण उपस्थित होते. कारागृहाचे शिक्षक बालाजी म्हेत्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय केले. शिबिराच्या पहिल्या दिवशी कैद्यांसाठी राजयोग ध्यान, योगासने व प्राणायामाचे विशेष सत्र घेण्यात आले. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग’ या घोषवाक्यानुसार विविध योगासने, कपालभाती, अनुलोम-विलोम, शीतली आणि भ्रामरी आदी प्राणायामांचा सराव करून घेण्यात आला. यावेळी ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी मानसिक स्वास्थ्य आणि तणावमुक्त जीवनासाठी राजयोग मेडिटेशनचे महत्त्व समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी वरिष्ठ तुरुंगाधिकारी व कर्मचारी वर्गासाठी विशेष योग सत्र आयोजित करण्यात आले. यात विविध योगासने व प्राणायामानंतर ‘गाईडेड मेडिटेशन’द्वारे उपस्थितांना मानसिक शांततेचा अनुभव देण्यात आला. अध्यक्षीय भाषणात अधीक्षिका अरुणा मुगुटराव यांनी योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले.

3 hrs ago
user_Anil GUNJAL
Anil GUNJAL
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago
849bbd00-b272-4e55-8eb1-0ac1c8a90ec2

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात २० आणि २१ जून रोजी दोन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रोटरी क्लब आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला कारागृहातील कैदी तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारागृहाच्या अधीक्षिका

fb03ae7b-ef12-46af-b914-07b7f96b2ddc

अरुणा मुगुटराव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकार तथा ब्रह्माकुमार दिलीप बोरसे, बी.के. सुधा माता, बी.के. सुनीता माता, योग प्रशिक्षक अशोक गवळी, राजेश साळी तसेच रोटरी क्लबचे कैलास सोनवणे, विश्वास शिंपी आणि अजय चव्हाण उपस्थित होते. कारागृहाचे शिक्षक बालाजी म्हेत्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय केले. शिबिराच्या

6dfd2667-b3fa-4e5f-8244-d0c55f0bb534

पहिल्या दिवशी कैद्यांसाठी राजयोग ध्यान, योगासने व प्राणायामाचे विशेष सत्र घेण्यात आले. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग’ या घोषवाक्यानुसार विविध योगासने, कपालभाती, अनुलोम-विलोम, शीतली आणि भ्रामरी आदी प्राणायामांचा सराव करून घेण्यात आला. यावेळी ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी मानसिक स्वास्थ्य आणि तणावमुक्त जीवनासाठी राजयोग मेडिटेशनचे महत्त्व समजावून सांगितले. दुसऱ्या

e3c58bb5-ff73-4255-860b-18d6f1bf6476

दिवशी वरिष्ठ तुरुंगाधिकारी व कर्मचारी वर्गासाठी विशेष योग सत्र आयोजित करण्यात आले. यात विविध योगासने व प्राणायामानंतर ‘गाईडेड मेडिटेशन’द्वारे उपस्थितांना मानसिक शांततेचा अनुभव देण्यात आला. अध्यक्षीय भाषणात अधीक्षिका अरुणा मुगुटराव यांनी योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक शहरातील वडाळा गावातील गुलशन नगर गल्ली क्रमांक २ मध्ये रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याची गंभीर समस्या समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही जागा अधिकृत कचराकुंडी नसतानाही लोक तिथे कचरा टाकत आहेत. याउलट, नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी 'येथे कचरा टाकू नये' असा स्पष्ट फलक लावलेला आहे, मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. येथील रहिवाशांनी, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा विचार करून, रस्त्यावर कचरा टाकण्याच्या या प्रथेला त्वरित आळा घालण्याची आणि हे कचरा टाकण्याचे ठिकाण बंद करण्याची मागणी केली आहे.
    3
    नाशिक शहरातील वडाळा गावातील गुलशन नगर गल्ली क्रमांक २ मध्ये रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याची गंभीर समस्या समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही जागा अधिकृत कचराकुंडी नसतानाही लोक तिथे कचरा टाकत आहेत. याउलट, नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी 'येथे कचरा टाकू नये' असा स्पष्ट फलक लावलेला आहे, मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. येथील रहिवाशांनी, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा विचार करून, रस्त्यावर कचरा टाकण्याच्या या प्रथेला त्वरित आळा घालण्याची आणि हे कचरा टाकण्याचे ठिकाण बंद करण्याची मागणी केली आहे.
    user_Imran Attar
    Imran Attar
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नाशिकमध्ये सारडा सर्कल ते चौक मंडई परिसरातील रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या समस्येची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे रस्ते व पदपथ मोकळे झाले. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या कृतीचे स्वागत करत मत व्यक्त केले की, शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासनाने अशीच तत्परता कायम ठेवावी.
    1
    नाशिकमध्ये सारडा सर्कल ते चौक मंडई परिसरातील रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या समस्येची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे रस्ते व पदपथ मोकळे झाले.

या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या कृतीचे स्वागत करत मत व्यक्त केले की, शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासनाने अशीच तत्परता कायम ठेवावी.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे एका शिक्षकाच्या मुलाच्या लग्नाचा मंडप काढत असताना, विजेच्या ताराला लोखंडी पाईपचा धक्का लागून ऋषिकेश कैलास मत्सागर (वय २७, रा. शिवरे, ता. चांदवड) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत ऋषिकेशच्या वडिलांच्या निधनानंतर तो मंडप व्यवसायात पूर्णवेळ काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. ही घटना वणी येथील कृपा हॉस्पिटल परिसरात घडली. या घटनेनंतर महावितरण विभागावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चांदवड तालुका अध्यक्ष विलास भवर आणि परिसरातील नागरिकांनी वणी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी वणी पोलीस स्टेशनच्या एपीआय गायत्री जाधव यांना या प्रकरणी महावितरण विभागावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. यावेळी संदेश निरगुडे, संदीप घडवजे, कैलास खापटे, राजेंद्र शिंदे, नाना निरगुडे, शरद आहेर, स्वप्नील मोरे, दीपक मोरे, विनोद माळी, वसंत झेंडफळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मंडप व्यावसायिक ऋषिकेशच्या मृत्यू प्रकरणी महावितरण विभागावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
    1
    दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे एका शिक्षकाच्या मुलाच्या लग्नाचा मंडप काढत असताना, विजेच्या ताराला लोखंडी पाईपचा धक्का लागून ऋषिकेश कैलास मत्सागर (वय २७, रा. शिवरे, ता. चांदवड) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत ऋषिकेशच्या वडिलांच्या निधनानंतर तो मंडप व्यवसायात पूर्णवेळ काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.

ही घटना वणी येथील कृपा हॉस्पिटल परिसरात घडली. या घटनेनंतर महावितरण विभागावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चांदवड तालुका अध्यक्ष विलास भवर आणि परिसरातील नागरिकांनी वणी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी वणी पोलीस स्टेशनच्या एपीआय गायत्री जाधव यांना या प्रकरणी महावितरण विभागावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.

यावेळी संदेश निरगुडे, संदीप घडवजे, कैलास खापटे, राजेंद्र शिंदे, नाना निरगुडे, शरद आहेर, स्वप्नील मोरे, दीपक मोरे, विनोद माळी, वसंत झेंडफळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मंडप व्यावसायिक ऋषिकेशच्या मृत्यू प्रकरणी महावितरण विभागावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • उष्णतेच्या कडाक्यातून गारवा मिळवण्यासाठी सध्या जव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. जव्हार तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून थंड हवेसाठी एक उत्तम ठिकाण म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक सुंदर फिरण्याची ठिकाणे असली तरी, काळमांडवीचा धबधबा विशेषत्वाने पर्यटकांना आकर्षित करत आहे. दूरदूरहून मोठ्या संख्येने येणारे पर्यटक या धबधब्यावर गर्दी करत असून, पाण्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत आहेत. यामुळे, सध्या काळमांडवी धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे.
    4
    उष्णतेच्या कडाक्यातून गारवा मिळवण्यासाठी सध्या जव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. जव्हार तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून थंड हवेसाठी एक उत्तम ठिकाण म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक सुंदर फिरण्याची ठिकाणे असली तरी, काळमांडवीचा धबधबा विशेषत्वाने पर्यटकांना आकर्षित करत आहे.

दूरदूरहून मोठ्या संख्येने येणारे पर्यटक या धबधब्यावर गर्दी करत असून, पाण्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत आहेत. यामुळे, सध्या काळमांडवी धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे.
    user_Ravindra Laxman pardhi
    Ravindra Laxman pardhi
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • परभणी जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. देवदर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर अचानक बांधलेला मंडप कोसळला.
    1
    परभणी जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. देवदर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर अचानक बांधलेला मंडप कोसळला.
    user_Sushma Khilari
    Sushma Khilari
    कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आमच्या घराजवळ एक खड्डा असून, तो बुजवून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
    1
    आमच्या घराजवळ एक खड्डा असून, तो बुजवून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
    user_Prathamesh Dalvi
    Prathamesh Dalvi
    नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २१ परीक्षा केंद्रांवर जिल्हा पोलिसांसह सीआयआयएसएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी ४५ वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्व नियमित प्रक्रियांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, सुरक्षा व गोपनीयतेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे.
    1
    नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २१ परीक्षा केंद्रांवर जिल्हा पोलिसांसह सीआयआयएसएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.

प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी ४५ वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्व नियमित प्रक्रियांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, सुरक्षा व गोपनीयतेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • येवला तालुका काँग्रेस कमिटीने विरोधी पक्षनेते खासदार श्री. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारंभ उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे (दक्षिण विभाग) जिल्हाध्यक्ष मा. श्री. भरतभाऊ टाकेकर होते, तर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खळसे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अॅड. समीर यादवराव देशमुख यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील व परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना 'प्रशस्तीपत्रक' देऊन गौरविण्यात आले. यामध्ये असिस्टंट डायरेक्टर (ग्रेड-१) पदी निवड झालेले शुभम विजय बोराळे आणि पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ९६.१४% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेली भक्ती सुनील थोरकुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रीतम पटणी, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोधळी, शुकदेव मडवई, बळीराम शिंदे, अॅड. नाना शिंदे, रेहान पठाण, अरमान शेख यांच्यासह सर्व सन्माननीय पदाधिकारी, फ्रंटल विभाग व सेलचे सदस्य, तसेच मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
    3
    येवला तालुका काँग्रेस कमिटीने विरोधी पक्षनेते खासदार श्री. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारंभ उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे (दक्षिण विभाग) जिल्हाध्यक्ष मा. श्री. भरतभाऊ टाकेकर होते, तर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खळसे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अॅड. समीर यादवराव देशमुख यांनी केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील व परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना 'प्रशस्तीपत्रक' देऊन गौरविण्यात आले. यामध्ये असिस्टंट डायरेक्टर (ग्रेड-१) पदी निवड झालेले शुभम विजय बोराळे आणि पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ९६.१४% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेली भक्ती सुनील थोरकुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रीतम पटणी, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोधळी, शुकदेव मडवई, बळीराम शिंदे, अॅड. नाना शिंदे, रेहान पठाण, अरमान शेख यांच्यासह सर्व सन्माननीय पदाधिकारी, फ्रंटल विभाग व सेलचे सदस्य, तसेच मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.