प्रतिकूलतेवर मात करत धोंडेवाडीचा सुपुत्र झाला 'खाकी'चा मानकरी; नानासो घाडगे यांची PSI पदी निवड! प्रतिकूलतेवर मात करत धोंडेवाडीचा सुपुत्र झाला 'खाकी'चा मानकरी; नानासो घाडगे यांची PSI पदी निवड! मायणी दि.१२:प्रतिनिधी, "जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे होते," हे धोंडेवाडी (ता.खटाव) येथील सुपुत्र नानासो आशाताई भीमराव घाडगे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत नानासो यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, एका सामान्य कुटुंबातील तरुणाने घेतलेल्या या भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वनानासो यांचा हा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, गरिबीच्या झळा सोसत ते शिक्षणासाठी पुण्याला गेले. "आपल्या बापाची ओळख एका मोठ्या साहेबाचा बाप म्हणून व्हावी," हे एकमेव स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी २०१९ पासून अभ्यासाला सुरुवात केली. गेल्या ६ वर्षांपासून नानासो रात्रंदिवस अभ्यास करत होते. या काळात अनेक मित्र अधिकारी झाले, काही वेळा अपयश आले, तर काही जवळच्या व्यक्तींनी "आता बस झाले, नोकरी-धंद्याचे बघ" असा सल्लाही दिला. मात्र, मनाशी पक्के ठरवलेले 'खाकी'चे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर, सततचा सराव आणि अफाट कष्टाच्या जोरावर त्यांनी हे शिखर गाठले आणि आपल्या नावापुढे 'साहेब' ही पदवी लावून दाखवली. नानासो यांची निवड झाल्याचे समजताच समस्त घाडगे परिवार आणि धोंडेवाडी ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. एका जिद्दी तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. चौकट - "रात्रीचा दिवस करून फक्त एकच विचार असायचा की व्हायचं तर साहेबच... आज त्या कष्टाचे फळ मिळाले असून माझ्या गावाची मान अभिमानाने उंचावली आहे, याचा आनंद मोठा आहे." - नानासो घाडगे
प्रतिकूलतेवर मात करत धोंडेवाडीचा सुपुत्र झाला 'खाकी'चा मानकरी; नानासो घाडगे यांची PSI पदी निवड! प्रतिकूलतेवर मात करत धोंडेवाडीचा सुपुत्र झाला 'खाकी'चा मानकरी; नानासो घाडगे यांची PSI पदी निवड! मायणी दि.१२:प्रतिनिधी, "जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे होते," हे धोंडेवाडी (ता.खटाव) येथील सुपुत्र नानासो आशाताई भीमराव घाडगे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत नानासो यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, एका सामान्य कुटुंबातील तरुणाने घेतलेल्या
या भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वनानासो यांचा हा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, गरिबीच्या झळा सोसत ते शिक्षणासाठी पुण्याला गेले. "आपल्या बापाची ओळख एका मोठ्या साहेबाचा बाप म्हणून व्हावी," हे एकमेव स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी २०१९ पासून अभ्यासाला सुरुवात केली. गेल्या ६ वर्षांपासून नानासो रात्रंदिवस अभ्यास करत होते. या काळात अनेक मित्र अधिकारी झाले, काही वेळा अपयश आले, तर काही जवळच्या व्यक्तींनी "आता बस झाले, नोकरी-धंद्याचे बघ" असा सल्लाही दिला. मात्र, मनाशी पक्के ठरवलेले 'खाकी'चे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत
नव्हते. अखेर, सततचा सराव आणि अफाट कष्टाच्या जोरावर त्यांनी हे शिखर गाठले आणि आपल्या नावापुढे 'साहेब' ही पदवी लावून दाखवली. नानासो यांची निवड झाल्याचे समजताच समस्त घाडगे परिवार आणि धोंडेवाडी ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. एका जिद्दी तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. चौकट - "रात्रीचा दिवस करून फक्त एकच विचार असायचा की व्हायचं तर साहेबच... आज त्या कष्टाचे फळ मिळाले असून माझ्या गावाची मान अभिमानाने उंचावली आहे, याचा आनंद मोठा आहे." - नानासो घाडगे
- Suresh BhosalePhaltan, Satara😡on 17 March
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य : डॉ.प्रविण दबडघाव विक्रम शिंदे /भोर दि.१४ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प.महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रविण दबडघाव यांनी केले.कापूरहोळ येथील विराट हिंदू मेळाव्याला संबोधित करताना डॉ. प्रवीण दबडघाव बोलत होते. यावेळी मेळाव्याला कापूरहोळ, हरिश्चंद्री ,दिवळे ,केतकावळे, कुंभोशी ,चिव्हेवाडी, खडकी कामथडी , उंबरे या गावातून हिंदू राम भक्त उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सुरू असलेल्या संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी बालांनी रामरक्षा गणपती स्तोत्र मनाचे श्लोक सर्वांसमोर सादर केले जानुबाई ढोल लेझीम पथक कामथडी या गावाने ढोल लेझीमच्या वाद्य पथकाने नेत्रदीपक खेळ सादर करत लक्ष वेधून घेतले.1
- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून आशीर्वाद घेतले आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाबद्दल आदर व्यक्त केला. दर्शनासोबतच जनसंवाद आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. सामान्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी लोकांशी चर्चा केली. "श्री अंबाबाई देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची सांगड घालणारे हे मंदिर आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.1
- Post by Madan petkar1
- कोल्हापूर : रविराज कांबळे आरक्षणाची जनभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या होतात. अशा या पवित्र भूमीत असल्याचा अभिमान व्यक्त करत Dr. B. R. Ambedkar यांच्या विचारांमुळेच आपल्या खांद्यावरचे स्टार आहेत, असे मनोगत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केले. विश्वरत्न बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात अभिवादनासाठी उपस्थित राहून त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी संदेश दिला.2
- kondhwa budruk kya hal banaa Rakha hai4
- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत असतानाच, आता ऐतिहासिक पंचगंगा घाट परिसरातील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रंकाळा आणि के.एम.बी.पी. पार्क येथील कारवाईनंतर महापालिकेने आपला मोर्चा पंचगंगा घाटाकडे वळवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सध्या घाट परिसरात अनधिकृत दुकाने, गाळे आणि खाऊ गल्ली मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहे. यामुळे घाटाचे ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्य लोप पावत असून स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नदी प्रदूषणमुक्तीचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात घाटावर वाढलेली खाऊ गल्ली आणि पूजेच्या साहित्यांच्या स्टॉल्समुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. गणेशोत्सव आणि जोतिबा यात्रेच्या काळात येथे मोठी गर्दी असते, अशा वेळी या अतिक्रमणांमुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महापालिकेने केवळ रस्त्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कोल्हापूरकरांमधून होत आहे.1