logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कार कालव्यात कोसळली; जावई बचावला, पत्नी व सासू-सासऱ्यांचा बुडून मृत्यू ! सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात नातेपुते जवळील जुन्या पालखी महामार्गावर आज शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. मुंबईहून फोंडशिरसकडे निघालेली इर्टिगा कार निरा उजवा कालव्याच्या पुलावरून थेट पाण्यात कोसळल्याने गाडीत अडकून तीन जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चालक सुनील मोहन टिळेकर हे बचावले आहेत. मृतांमध्ये प्रीती सुनील टिळेकर (पत्नी), हनुमंत जठार (सासरे) व मंजू हनुमंत जठार (सासू) यांचा समावेश आहे. तिघेही सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुधबावी येथील मूळ रहिवासी असून, नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे पाचच्या सुमारास कार पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट कालव्यात कोसळले. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात उतरून मदतकार्य सुरू केले. पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या पथकासह पाटबंधारे विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोकलेन व इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने कालव्यात अडकलेल्या गाडीचा शोध घेण्यात आला. मात्र, गाडीत अडकलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. देवदर्शन आटोपून परतताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

2 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago
929c8dbe-b27b-49af-a801-8c52eb086363

कार कालव्यात कोसळली; जावई बचावला, पत्नी व सासू-सासऱ्यांचा बुडून मृत्यू ! सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात नातेपुते जवळील जुन्या पालखी महामार्गावर आज शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. मुंबईहून फोंडशिरसकडे निघालेली इर्टिगा कार निरा उजवा कालव्याच्या पुलावरून थेट पाण्यात कोसळल्याने गाडीत अडकून तीन जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चालक सुनील मोहन टिळेकर हे बचावले आहेत. मृतांमध्ये प्रीती सुनील टिळेकर (पत्नी), हनुमंत जठार (सासरे) व मंजू हनुमंत जठार (सासू) यांचा समावेश आहे. तिघेही सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुधबावी येथील मूळ रहिवासी असून, नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे पाचच्या सुमारास कार पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट कालव्यात कोसळले. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात उतरून मदतकार्य सुरू केले. पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या पथकासह पाटबंधारे विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोकलेन व इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने कालव्यात अडकलेल्या गाडीचा शोध घेण्यात आला. मात्र, गाडीत अडकलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. देवदर्शन आटोपून परतताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली
    1
    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी..
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मंठा : शहरात कोयता गँगने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीनंतर मंठा पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत ३ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई विशेष पथकाने करून आरोपींना काल रात्री जालना येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केली असून ती मंठा पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना अटक केल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत असून इतर आरोपींचा शोधही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    मंठा : शहरात कोयता गँगने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीनंतर मंठा पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत ३ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई विशेष पथकाने करून आरोपींना काल रात्री जालना येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केली असून ती मंठा पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना अटक केल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत असून इतर आरोपींचा शोधही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • छ. संभाजीनगर प्रतिनिधी: बिबवेवाडी गावठाण येथील शाळेतून गेले 4,30 तास पाणी वाहत आहे...ह्यावर उपाययोजना करणार आहे की नाही, का ह्याच उत्तर पण आम्ही नगरसेवकांना मागायच की नेहरूंना शाळेतून 6 वाजल्यापासून पाणी वाहत आहे... अजूनही उपाययोजना नाही ...
    1
    छ. संभाजीनगर प्रतिनिधी: बिबवेवाडी गावठाण येथील शाळेतून गेले 4,30 तास पाणी वाहत आहे...ह्यावर उपाययोजना करणार आहे की नाही,
का ह्याच उत्तर पण आम्ही नगरसेवकांना मागायच की नेहरूंना 
शाळेतून 
6 वाजल्यापासून पाणी वाहत आहे...
अजूनही उपाययोजना नाही ...
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आज गुरुवार 2 एप्रिल रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरात काही जणांनी एका तरुणाला क्रिकेटच्या लाकडी बॅटने बेदम मारहाण केली आहे सदरील घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून मात्र सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    1
    आज गुरुवार 2 एप्रिल रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरात काही जणांनी एका तरुणाला क्रिकेटच्या लाकडी बॅटने बेदम मारहाण केली आहे सदरील घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून मात्र सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • राजनगाव येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एक जनास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे
    1
    राजनगाव येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एक जनास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
    1
    जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • अनोख्या परंपरेने हनुमान जयंती उत्सव १०० वर्षांची परंपरा, सर्वधर्म समभावाचा सुंदर संगम! जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथे हनुमान जयंती एक आगळी-वेगळी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा जपत साजरी केली जाते. तब्बल १०० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात कायम आहे. हनुमान जयंतीनिमित्त गावातील प्रत्येक घरातून ‘शिदा’ गोळा करण्याची अनोखी प्रथा येथे पाहायला मिळते. हरभरा, डाळी, भाजीपाला, मसाले अशा विविध साहित्याचा संग्रह करून संध्याकाळी मारोती मंदिरात मोठ्या प्रमाणावर चविष्ट भाजी तयार केली जाते. यानंतर ग्रामस्थ आपल्या घरातून आणलेल्या भाकऱ्यांसह मंदिरात एकत्र बसून महाप्रसादाचा आनंद घेतात. विविध घरांमधून आलेल्या साहित्यामुळे या भाजीची चवही खास आणि आगळीवेगळी लागते, ज्याची सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. या परंपरेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्म समभाव. धर्म, जात, वय किंवा आर्थिक स्थिती याचा कोणताही भेदभाव न ठेवता संपूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सहकार्याची भावना दृढ करणारा ठरतो. बानेगावची ही परंपरा आजच्या काळातही सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरत असून इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
    1
    अनोख्या परंपरेने हनुमान जयंती उत्सव १०० वर्षांची परंपरा, सर्वधर्म समभावाचा सुंदर संगम!
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथे हनुमान जयंती एक आगळी-वेगळी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा जपत साजरी केली जाते. तब्बल १०० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात कायम आहे.
हनुमान जयंतीनिमित्त गावातील प्रत्येक घरातून ‘शिदा’ गोळा करण्याची अनोखी प्रथा येथे पाहायला मिळते. हरभरा, डाळी, भाजीपाला, मसाले अशा विविध साहित्याचा संग्रह करून संध्याकाळी मारोती मंदिरात मोठ्या प्रमाणावर चविष्ट भाजी तयार केली जाते.
यानंतर ग्रामस्थ आपल्या घरातून आणलेल्या भाकऱ्यांसह मंदिरात एकत्र बसून महाप्रसादाचा आनंद घेतात. विविध घरांमधून आलेल्या साहित्यामुळे या भाजीची चवही खास आणि आगळीवेगळी लागते, ज्याची सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात.
या परंपरेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्म समभाव. धर्म, जात, वय किंवा आर्थिक स्थिती याचा कोणताही भेदभाव न ठेवता संपूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सहकार्याची भावना दृढ करणारा ठरतो.
बानेगावची ही परंपरा आजच्या काळातही सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरत असून इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आज गुरुवार 2 एप्रिल रोजी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली की महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून 71 लाख लाडक्या बहिणीचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे अशी माहिती अंबादास दानवे यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत सदरील माहिती दिली आहे.
    1
    आज गुरुवार 2 एप्रिल रोजी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली की महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून 71 लाख लाडक्या बहिणीचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे अशी माहिती अंबादास दानवे यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत सदरील माहिती दिली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • महिला व बालकल्याण समिती सभापतीपती ऐश्‍वर्या अजय चव्हाण तर समाज कल्याण सभापतीपदी पार्वती मुंढे बिनविरोध
    1
    महिला व बालकल्याण समिती सभापतीपती ऐश्‍वर्या अजय चव्हाण तर समाज कल्याण सभापतीपदी पार्वती मुंढे  बिनविरोध
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.