अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची विभागीय आढावा बैठक 2 ऑगस्ट रोजी बीडमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची विभागीय आढावा बैठक 2 ऑगस्ट रोजी बीडमध्ये बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड; राज्यभरातील कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन बीड, प्रतिनिधी : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची विभागीय आढावा बैठक रविवार, दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता बीड येथील श्री संत शिरोमणी मनमथ स्वामी मंदिर, श्रीक्षेत्र कापीलधार (मांजरसुबा) येथे आयोजित करण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खांडापुरकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार असून, संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्याबरोबरच आगामी वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. बैठकीत संघटन बळकटीकरण, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची दिशा, विविध सामाजिक प्रश्न तसेच प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया देखील पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या बैठकीस राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधींसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बैठकीस महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. राणीताई स्वामी, महाराष्ट्र राज्य मुख्य कार्याध्यक्ष विनोद आप्पा इंगोले, प्रदेश सरचिटणीस राणीताई पवार, मराठवाडा महिला विभागीय अध्यक्ष प्राजक्ता अभिमान डॉगरे, बीड जिल्हाध्यक्ष बालाजी इंगोले, धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, लातूर जिल्हा प्रमुख नेताजी जाधव यांच्यासह राणा चव्हाण, सारिका गायकवाड पाटील, जयश्री गवळी, समीक्षा वाघमारे, विनोद सावंत, सुभद्राताई शिंदे, रेखाताई लोमटे, नागेश जाधव, सोनालीताई नाईक, शिल्पाताई इंगळे, शिवाजी हिंदोळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा सूर्यवंशी, परमेश्वर बाप्पा कवचाट, पोपट अण्णा डोळे, दीपक सोलंके, ज्ञानेश्वर पोद्वार, दत्ता काळे, माने सर, शितोळे सर, उमेश रवींद्र जोगदंड, बाळासाहेब भारती, सीमा शिलावंत, स्वाती शिरसाट, सीता गावते, रितेश शिंदे, मिलिंद कांबळे, सुनील चौधरी, मीराताई खाडे, रूपाली देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संपर्क कार्यालय : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, माने कॉम्प्लेक्सजवळ, जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या पाटीमागे, ता. बीड, जि. बीड – 431122.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची विभागीय आढावा बैठक 2 ऑगस्ट रोजी बीडमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची विभागीय आढावा बैठक 2 ऑगस्ट रोजी बीडमध्ये बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड; राज्यभरातील कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन बीड, प्रतिनिधी : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची विभागीय आढावा बैठक रविवार, दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता बीड येथील श्री संत शिरोमणी मनमथ स्वामी मंदिर, श्रीक्षेत्र कापीलधार (मांजरसुबा) येथे आयोजित करण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खांडापुरकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार असून, संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्याबरोबरच आगामी वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. बैठकीत संघटन बळकटीकरण, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची दिशा, विविध सामाजिक प्रश्न तसेच प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया देखील पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या बैठकीस राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधींसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटनेचे
सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बैठकीस महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. राणीताई स्वामी, महाराष्ट्र राज्य मुख्य कार्याध्यक्ष विनोद आप्पा इंगोले, प्रदेश सरचिटणीस राणीताई पवार, मराठवाडा महिला विभागीय अध्यक्ष प्राजक्ता अभिमान डॉगरे, बीड जिल्हाध्यक्ष बालाजी इंगोले, धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, लातूर जिल्हा प्रमुख नेताजी जाधव यांच्यासह राणा चव्हाण, सारिका गायकवाड पाटील, जयश्री गवळी, समीक्षा वाघमारे, विनोद सावंत, सुभद्राताई शिंदे, रेखाताई लोमटे, नागेश जाधव, सोनालीताई नाईक, शिल्पाताई इंगळे, शिवाजी हिंदोळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा सूर्यवंशी, परमेश्वर बाप्पा कवचाट, पोपट अण्णा डोळे, दीपक सोलंके, ज्ञानेश्वर पोद्वार, दत्ता काळे, माने सर, शितोळे सर, उमेश रवींद्र जोगदंड, बाळासाहेब भारती, सीमा शिलावंत, स्वाती शिरसाट, सीता गावते, रितेश शिंदे, मिलिंद कांबळे, सुनील चौधरी, मीराताई खाडे, रूपाली देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संपर्क कार्यालय : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, माने कॉम्प्लेक्सजवळ, जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या पाटीमागे, ता. बीड, जि. बीड – 431122.
- हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.1
- *बद्रीनाथ में चोरी करने वाले के पास मिला सोना-चांदी:* आज खत्म हो रही रिमांड; PA ने घर में छिपाई थी चांदी की मूर्ति-विदेशी करेंसी बद्रीनाथ धाम के बहुचर्चित चढ़ावा चोरी मामले में मुख्य आरोपी प्रमोद नौटियाल की 4 दिनों की पुलिस कस्टडी रिमांड आज (31 जुलाई 2026) समाप्त हो रही है। चमोली पुलिस की विशेष जांच टीम (SIT) ने रिमांड के दौरान आरोपी के बद्रीनाथ और देहरादून स्थित ठिकानों पर ताबड़तोड़ छापेमारी कर भारी मात्रा में चोरी का सामान और संपत्तियों के दस्तावेज बरामद किए हैं।छापेमारी में बरामद हुआ 'खजाना'बद्री-केदार मंदिर समिति (BKTC) के अध्यक्ष के पूर्व निजी सहायक (PA) प्रमोद नौटियाल के पास से मिली सामग्रियां इस प्रकार हैं:मूर्तियां और धार्मिक वस्तुएं: बद्रीनाथ स्थित नीलकंठ वीवीआईपी गेस्ट हाउस के सरकारी आवास से भगवान नारायण की एक चांदी की मूर्ति, चांदी का नाग और मंदिर का पवित्र शालिग्राम पत्थर बरामद हुआ है।विदेशी और भारतीय करेंसी: तलाशी में 500-500 रुपये के नोटों की गड्डियों के साथ 150 नोट नेपाली करेंसी (विदेशी मुद्रा) और चांदी के सिक्के मिले हैं। ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा1
- उपसंचालकांचा आदेश असतानाही शिक्षकांची नियुक्ती नाही? सामाजिक संघटनांचे निवेदन व मागणी नेकनूर येथील डी.एड महाविद्यालय येथे शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याचे निवेदन सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आले1
- अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल1
- जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण1
- जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले1
- उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोलीस चौकी अथवा पोलीस दूरक्षेत्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात उपळी येथील सौ. रूपाली कचरे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयाचा तसेच महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ मधील तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौकी अथवा दूरक्षेत्राची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, उपळी परिसरात गेल्या पाच वर्षांत ३१ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, महिला, विद्यार्थिनी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपळी येथे तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आणि पोलीस चौकी सुरू करण्यास झालेल्या विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनानंतर उपळी परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत शासन व गृह विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.1