Shuru
Apke Nagar Ki App…
बुलढाणा जिल्ह्यातील भुमराळा, वझर आणि कासारी शिवारातील मार्च २०२६ मधील वंचित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. या नुकसान भरपाईसाठी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने प्रशासनाला थेट क्रांतीदिनाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. क्रांतीदिनापर्यंत सर्व बाधित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकरी योद्धा कृती समिती थेट आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
Raghunath Aghao
बुलढाणा जिल्ह्यातील भुमराळा, वझर आणि कासारी शिवारातील मार्च २०२६ मधील वंचित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. या नुकसान भरपाईसाठी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने प्रशासनाला थेट क्रांतीदिनाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. क्रांतीदिनापर्यंत सर्व बाधित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकरी योद्धा कृती समिती थेट आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालन्यात अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी महापौर वंदना मगरे यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नसताना महापौरांनी दबावापोटी नोटीस बजावल्याचा दावा त्यांनी केला. जालना शहरातील हॉटेल आनंदी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सभेची व्हिडिओ क्लिप पत्रकारांना दाखवली आणि महापौरांना नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा अधिकारच नसल्याचे स्पष्ट करत ती नोटीस पत्रकार परिषदेतच फाडून केराच्या टोपलीत फेकून दिली. नोटीस बजावून आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असून राजकीय कोंडी करण्यासाठी व अपक्ष असल्यामुळे दबाव आणला जात असल्याचा आरोप पांगारकर यांनी केला. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो, मात्र जालना मनपामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. तसेच, स्वतः महापालिका कार्यालयातच स्वच्छता नाही तर शहर काय स्वच्छ असणार, असा टोलाही त्यांनी मनपा प्रशासनाला लगावला. दरम्यान, महापौरांनी बजावलेल्या या नोटीसला कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीने उत्तर देणार असल्याचे पांगारकर यांनी स्पष्ट केले. यासोबतच महापौरांनाही कायदेशीर मार्गाने नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.1
- लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम करत विनम्र अभिवादन करण्यात आले आहे.1
- विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी 'महाराष्ट्र बंद'चे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 23 जुलै 2026 रोजी जंतर-मंतर आंदोलनादरम्यान चान्नी बंद आणि महाराष्ट्र बंदची ही हाक देण्यात आली आहे.2
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि राहुल गांधींवरील अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले असून त्यांनी या कारवाईविरोधात जोरदार धरणे आंदोलन छेडले आहे.1
- देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुंभार पिंपळगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या 'गाव बंद'च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवले. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या तीव्र निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कुंभार पिंपळगावची संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जालना शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. गुरुवार, २३ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे शांततेत आवाहन केले. यादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जंतर-मंतर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, तर काही ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जंतर-मंतर येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आणि राज्यभरातील बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले. माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी भाजप आणि सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त संपूर्ण देश आणि जनता या लाठीचार्जचा निषेध करत आहे, मात्र सदाभाऊ खोत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सर्व जण आतंकवादी दिसत आहेत, असा घणाघाती आरोप घुमारे यांनी केला. भाजपच्या कोणत्याही कृतीला विरोध केला तर भाजप कार्यकर्त्यांना ते आतंकवादी कृत्य असल्याचेच दिसून येते, असेही ते म्हणाले.1
- परभणी जिल्ह्यात बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर संपूर्ण परभणी जिल्हा आज पूर्णपणे बंद राहिला.1
- बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या प्रमुख मागण्या अत्यंत आक्रमक आणि जोरदारपणे मांडल्या.1