*विकास कामांना गती देऊन दर्जेदार सेवा तत्परतेने पुरवा - पालकमंत्री अतुल सावे* *महापालिकेच्या 100 दिवस कृती आराखड्याचा घेतला आढावा* नांदेड, दि.१७ एप्रिल :- नांदेड शहरातील विकास कामांना गती देऊन शहरातील नागरीकांना मुलभुत नागरी सुविधा तत्परतेने उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचे कौतुक करुन दर्जेदार सेवा वेळेत देणे, डिजिटल क्लासरुम, महिलांसाठी शौचालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळास्थळी त्यांच्या कविता लावाव्यात, शहर स्वच्छतेसाठी आवश्यकतेनुसार वाहणे व मनुष्यबळामध्ये वाढ करणे, पूर्ण क्षमतेने डोर टु डोर कचऱ्याचे संकलन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश *राज्याचे इतर मागास बहुजण कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे* यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात महानगरपालिकेच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत महापालिकेच्यावतीने १०० दिवसांचा आराखड्यात विविध कामांमध्ये समावेश असलेल्या कामांचा व पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी *महापौर सौ.कविता संतोष मुळे, पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते ॲड महेश कदकदंडे, माजी सभापती किशोर स्वामी,* अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, स.अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नांदेड शहरातील नागरिकांना १०० दिवसांच्या कृती अराखड्याच्या माध्यमातुन दर्जेदार सेवा ह्या विहीत वेळेत प्राप्त व्हाव्यात ही अपेक्षा व्यक्त करतांना या कृती आराखड्याचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. या कृती आराखड्याच्या माध्यमातुन होऊ घातलेल्या घरोघरी स्वच्छता, आपत्ती सौम्यीकरण, डीप क्लीनिंग, गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करणे, पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील सुधारणा, अत्याधुनिक गॅस शव दाहीणी, मुख्य चौकातील सुशोभीकरण, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणे, महिलांसाठी शौचालय उभारणे, अत्याधुनिक वाहतुक व्यवस्था, इलेक्ट्रीक चार्जर स्टेशन, धोकादायक विद्युत वाहीणी भुमिगत करणे, आरटीएस अंतर्गत ७४ सेवा ऑनलाईन इत्यादी उपक्रमांचे पाकमत्र्यांनी कौतुक करुन महापालिकेच्या कामाची प्रशंसा केली. दरम्यान, बैठकीत महापालिकेच्या विविध विभागांच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. शहरातील प्रस्तावित उड्डान पुले, वाहतुक नियोजन, स्टेडीयम उभारणी, मल्टीपार्कींग, पालिका शाळांचे अद्यावतीकरण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. *चौकट* शहरातील नागरीकांना दर्जेदार सेवा विहीत वेळेत प्राप्त व्हाव्यात, यासाठी विकासकामांना गती देण्याच्या सुचना देऊन महापालिका राबवित असलेला १०० दिवसांचा कृती आराखडा हा अगदी स्तुत्य उपक्रम असुन शहर विकासाशी संबंधित कामांमध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन *पालकमंत्री अतुल सावे* यांनी यावेळी दिले.
*विकास कामांना गती देऊन दर्जेदार सेवा तत्परतेने पुरवा - पालकमंत्री अतुल सावे* *महापालिकेच्या 100 दिवस कृती आराखड्याचा घेतला आढावा* नांदेड, दि.१७ एप्रिल :- नांदेड शहरातील विकास कामांना गती देऊन शहरातील नागरीकांना मुलभुत नागरी सुविधा तत्परतेने उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचे कौतुक करुन दर्जेदार सेवा वेळेत देणे, डिजिटल क्लासरुम, महिलांसाठी शौचालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळास्थळी त्यांच्या कविता लावाव्यात, शहर स्वच्छतेसाठी आवश्यकतेनुसार वाहणे व मनुष्यबळामध्ये वाढ करणे, पूर्ण क्षमतेने डोर टु डोर कचऱ्याचे संकलन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश *राज्याचे इतर मागास बहुजण कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक
ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे* यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात महानगरपालिकेच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत महापालिकेच्यावतीने १०० दिवसांचा आराखड्यात विविध कामांमध्ये समावेश असलेल्या कामांचा व पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी *महापौर सौ.कविता संतोष मुळे, पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते ॲड महेश कदकदंडे, माजी सभापती किशोर स्वामी,* अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, स.अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील यांच्यासह महापालिकेच्या
विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नांदेड शहरातील नागरिकांना १०० दिवसांच्या कृती अराखड्याच्या माध्यमातुन दर्जेदार सेवा ह्या विहीत वेळेत प्राप्त व्हाव्यात ही अपेक्षा व्यक्त करतांना या कृती आराखड्याचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. या कृती आराखड्याच्या माध्यमातुन होऊ घातलेल्या घरोघरी स्वच्छता, आपत्ती सौम्यीकरण, डीप क्लीनिंग, गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करणे, पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील सुधारणा, अत्याधुनिक गॅस शव दाहीणी, मुख्य चौकातील सुशोभीकरण, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणे, महिलांसाठी शौचालय उभारणे, अत्याधुनिक वाहतुक व्यवस्था, इलेक्ट्रीक चार्जर स्टेशन, धोकादायक विद्युत वाहीणी भुमिगत करणे, आरटीएस अंतर्गत ७४ सेवा ऑनलाईन इत्यादी उपक्रमांचे
पाकमत्र्यांनी कौतुक करुन महापालिकेच्या कामाची प्रशंसा केली. दरम्यान, बैठकीत महापालिकेच्या विविध विभागांच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. शहरातील प्रस्तावित उड्डान पुले, वाहतुक नियोजन, स्टेडीयम उभारणी, मल्टीपार्कींग, पालिका शाळांचे अद्यावतीकरण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. *चौकट* शहरातील नागरीकांना दर्जेदार सेवा विहीत वेळेत प्राप्त व्हाव्यात, यासाठी विकासकामांना गती देण्याच्या सुचना देऊन महापालिका राबवित असलेला १०० दिवसांचा कृती आराखडा हा अगदी स्तुत्य उपक्रम असुन शहर विकासाशी संबंधित कामांमध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन *पालकमंत्री अतुल सावे* यांनी यावेळी दिले.
- विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Shaikh Rafik Qureshi1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by नागनाथ ससाने1
- Post by Today One Live1
- ट्रॅक्टरवरील कोटींच्या दरोडेखोरीला आळा घाला – कॉम्रेड राजन क्षीरसागर1
- Post by नागनाथ ससाने1