लेखी आश्वासनानंतर स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे लाक्षणिक उपोषण स्थगित जयसिंगपूर / प्रतिनिधी जयसिंगपूर शहरातील नागरिकांवरील घरफाळ्यावरील २ टक्के शास्ती (दंड) रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वराज्यक्रांती जनआंदोलनच्या वतीने सुरू करण्यात आलेले लाक्षणिक उपोषण मंगळवार, दि. १० मार्च रोजी नगरपरिषदेच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जयसिंगपूर शहरातील नागरिकांना घरफाळ्यावरील २ टक्के शास्ती रद्द करावी या मागणीसाठी दि. ३ डिसेंबर २०२४ पासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्यानंतर हे आंदोलन धरणे आंदोलनाच्या स्वरूपात तब्बल १०० दिवस सुरू ठेवण्यात आले होते. या जनआंदोलनाची दखल घेत शासनाने दि. १९ मे २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार प्रोत्साहनात्मक अभय योजना लागू केली. मात्र या योजनेचा जयसिंगपूर शहरातील नागरिकांना अपेक्षित आणि मोठ्या प्रमाणात फायदा झालेला नसल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली होती.या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. १० मार्च रोजी पुन्हा लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.यावेळी जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासोबत आंदोलकांची बैठक झाली.या बैठकीत नगरपरिषद क्षेत्रातील थकित मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुलीसाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रे आणि विविध माध्यमांद्वारे प्रयत्न सुरू असल्याचे नगरपरिषदेकडून तोंडी व लेखी आश्वासन देण्यात आले. नगरपरिषदेच्या या लेखी आश्वासनानंतर स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे मंगळवार, दि. १० मार्चपासून सुरू असलेले लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे आदमभाई मुजावर यांनी सांगितले.या बैठकीस शिरोळ विकास आघाडीचे नगरपरिषद पक्षप्रतोद संजय पाटील कोथळीकर, मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने निवेदक आदमभाई मुजावर आणि स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे शिरोळ तालुकाध्यक्ष गजानन पवार यांनी नगरपरिषदेचे पत्र स्वीकारले.दरम्यान, जयसिंगपूर शहरातील नागरिकांनी घरफाळ्यावरील दंडमाफीसाठी नगरपरिषदेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही आदमभाई मुजावर यांनी केले आहे.

- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- kondhwa budruk kya hal banaa Rakha hai4
- पुण्यातील बाबासाहेबांचे महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असलेले हे दुसरे घर... मावळ पुणे :- पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आपण पाहिलंय का..? सन १९४९ ते १९५६ च्या काळात ७ वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं जाणकार सांगतात. तळेगाव चाकण रोडवर असलेल्या हरणेश्र्वर टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली १६ हजार रुपयांना खरेदी केला होता. मावळचा निसर्गरम्य परिसर , सह्याद्री पर्वताच्या रांगा, कणखर कातळात कोरलेल्या कार्ले,भाजे आणि बेडसे च्या लेण्या यामुळं बाबासाहेबांना या जागेविषयी मोठं आकर्षण होत म्हणून त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. बाबासाहेब या बंगल्यात ये जाऊन राहत असतं. ज्या वेळी बाबासाहेब पुणे मुक्कामी असायचे तेव्हा ते या बंगल्यात ज्ञानसाधना करत,राजकीय ,सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत असत. या बंगल्याच्या परिसरात अनेक झाडे बाबासाहेबांनी लावली होती. ती आजही पाहायला मिळतात. १४ एप्रिल १९५१ रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसा दिवशी याच बंगल्यात शेड्युल कास्ट फेडरेशन ची बैठक पार पडली होती. या बंगल्यात डॉ. बाबासाहेबांनी वापरलेल्या टेबल ,खुर्ची, अनेक महत्वाच्या घडामोडींचे चित्रे या बंगल्यात लावण्यात आली आहेत. सध्या या बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनविण्यात आले आहे. या बंगल्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी प्रेरणा घेण्यासाठी आणि वाचनासाठी या बंगल्यात येत असतात. बाबासाहेब आंबेडरांचे हे घर म्हणजे विचारांची शाळा होते, अनेक मोठ्या व्यक्ती आणि विचारवंत यांचे चर्चा करण्याचे हे ठिकाण होते. यात आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, गाडगे महाराज, शाहीर पठ्ठे बापूराव , कवी राजानंद गडपायले अनेकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या..... : लिंबराज कांबळे - ग्रामस्थ #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #तळेगावदाभाडे #मावळपुणे #आंबेडकरस्मारक #इतिहासाचीसाक्ष #प्रेरणास्थळ #विचारांचीशाळा #सह्याद्री #कार्लेलेंणी #भाजेलेंणी #बेडसेलेणी #सामाजिकचळवळ #विद्यार्थीप्रेरणा #महाराष्ट्रइतिहास #DrBabasahebAmbedkar #TalegaonDabhade #MavalPune #AmbedkarMemorial #HistoricPlace #InspirationSpot #HouseOfIdeas #Sahyadri #KarleCaves #BhajeCaves #BedseCaves #SocialMovement #StudentInspiration #MaharashtraHistory1
- Post by Durgeshbhau khade Sarkar1
- पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: संत तुकारामनगर तपास पथकाकडून दोन गावठी पिस्तूल जप्त, ३ आरोपींना बेड्या1
- Vadodara Gujarat NH 48 accident date 3 wegti two wheeler Se jyaga par spot ho gaya hai1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- मावळ पुणे :- बोरघाटातील खंडाळा परिसरात माणुसकीचं हृदयस्पर्शी चित्र समोर आलं आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी भटकणाऱ्या मुक्या प्राण्यांची व्यथा पाहून भाजपचे नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे हाजी अराफत शेख यांनी पुणे मुंबई प्रवासा दरम्यान माकडांना थंडगार पाणी पाजत बिस्किटे खाऊ घातली. या प्रसंगाने “मानसातली माणुसकी” अजून जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक आणि वन विभागाला भावनिक साद घालत, बोरघाट-खंडाळा परिसरात या मुक्या प्राण्यांसाठी कायमस्वरूपी पाण्याची टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, परवानगी मिळाल्यास स्वतःच्या खर्चातून पाण्याची टाकी उभारण्याची तयारीही संबंधितांकडून दर्शवण्यात आली आहे. माणुसकी आणि दयाभाव जपत, आवाज नसलेल्या जीवांसाठी पुढे येणं हाच खरा मानवधर्म असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे... #मावळ #पुणे #बोरघाट #खंडाळा #माणुसकी #मुक्याप्राणी #प्राणीसंवर्धन #वनविभाग #पाणीटंचाई #उन्हाळा #सामाजिककार्य #दयाभाव #हाजीअराफतशेख #भाजप #पर्यावरण #Maval #Pune #BorGhat #Khandala #Humanity #AnimalCare #StrayAnimals #WildlifeCare #ForestDepartment #WaterScarcity #SummerHeat #SocialWork #Compassion #HajiArafatSheikh #BJP #Environment1
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आकर्षण गोल्डन रथ दुर्गामाता रथ निगडी1