महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या:-संभाजी ब्रिगेडची मागणी महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या:-संभाजी ब्रिगेडची मागणी सध्या बीड जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाअभावी गंभीर बनलेल्या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. “मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात आहे. पावसाने सातत्याने ओढ दिल्यामुळे खरीप पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. पिकांचे उत्पादन हातात येण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने केवळ परिस्थितीचा आढावा न घेता तातडीने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.” अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे तातडीने मूल्यांकन करून मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख मागण्या... १. कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात. २. खरीप पिकांच्या नुकसानीसाठी तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी. ३. आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे व आवश्यक कृषी निविष्ठांचे नियोजन करावे. ४. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे. ५. पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन टँकरने पाणीपुरवठा व जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करावे. ६. दि. १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा. ७. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा. शेतकरी जगला तरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकेल; त्यामुळे संकटाच्या काळात शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी आग्रही भूमिका संभाजी ब्रिगेडच्या वतीने मांडण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक रामकिसन मस्के सर,विभागीय सचिव ठोंबरे सर, महिला अध्यक्ष सुनंदा लोखंडे,जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे, केज तालुकाध्यक्ष आकाश नखाते, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष संभाजी घोरपडे, नारायण मुळे,यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. याविषयी संपूर्ण राज्यभर आज सरकारला निवेदन देण्यात आली.
महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या:-संभाजी ब्रिगेडची मागणी महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या:-संभाजी ब्रिगेडची मागणी सध्या बीड जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाअभावी गंभीर बनलेल्या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. “मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात आहे. पावसाने सातत्याने ओढ दिल्यामुळे खरीप पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. पिकांचे उत्पादन हातात येण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने केवळ परिस्थितीचा आढावा न घेता तातडीने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.” अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे तातडीने मूल्यांकन करून मदतीचा निर्णय घ्यावा,
अशी मागणी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख मागण्या... १. कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात. २. खरीप पिकांच्या नुकसानीसाठी तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी. ३. आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे व आवश्यक कृषी निविष्ठांचे नियोजन करावे. ४. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे. ५. पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन टँकरने पाणीपुरवठा व जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करावे. ६. दि. १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा. ७. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा. शेतकरी जगला तरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकेल; त्यामुळे संकटाच्या काळात शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी आग्रही भूमिका संभाजी ब्रिगेडच्या वतीने मांडण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक रामकिसन मस्के सर,विभागीय सचिव ठोंबरे सर, महिला अध्यक्ष सुनंदा लोखंडे,जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे, केज तालुकाध्यक्ष आकाश नखाते, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष संभाजी घोरपडे, नारायण मुळे,यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. याविषयी संपूर्ण राज्यभर आज सरकारला निवेदन देण्यात आली.
- पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीडकर सज्ज; छत्रपती शिवाजी महाराज चौकात खिचडी-पाण्याची व्यवस्था मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीडकर सज्ज; छत्रपती शिवाजी महाराज चौकात खिचडी-पाण्याची व्यवस्था बीड | प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षाची भूमिका घेणारे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना त्यांच्या स्वागतासाठी बीड शहरातील मराठा समाज बांधव सज्ज झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी येणाऱ्या समाजबांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने खिचडी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महिला भगिनींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनोज दादांच्या स्वागताची तयारी करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे होणाऱ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी समाजबांधवांची गर्दी होत आहे. मनोज दादांच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी बीडकर एकवटले आहेत.2
- महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत महादेव महाराज भारती (बेलेश्वर संस्थान बेलगाव) श्री क्षेत्र भालचंद्र गणपतीच्या चरणी नतमस्तक.:-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ1
- मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत सोनपेठ (दर्शन) :- मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत, आजच्या नव्या पिढिला मराठी जुणे गाणे नकोसे वाटतात तेच जुण्या पिढिला जुण्या आठवणीत घेऊन जातात.1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- पत्रकारांच्या हक्कां साठी आणखी जोमाने लढणार - पठाण अमरजान नियुक्तीपत्र स्वीकारून पदभार; पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार बीड (प्रतिनिधी) अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.4