logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी हालचाली वेगवान म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी हालचाली वेगवान २८ जुलै रोजी डॉ. एस. जयशंकर यांची भेट; खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश, भारतीय दूतावासाची विशेष राजनैतिक कारवाई बीड | प्रतिनिधी : म्यानमारमधील म्यावाडी (Myawaddy) परिसरातील सायबर फसवणूक केंद्रांमध्ये अडकलेल्या बीड जिल्ह्यातील स्वप्नील भारत काळुंके यांच्यासह महाराष्ट्रातील इतर भारतीय नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. भारतीय दूतावासाने या प्रकरणात विशेष राजनैतिक (Diplomatic) कारवाई सुरू केल्याची अधिकृत माहिती दिली आहे. या संदर्भात दि. २८ जुलै २०२६ रोजी खासदार बजरंग सोनवणे यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार निलेश लंके यांच्यासमवेत केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेचा गंभीर आणि मानवीय प्रश्न मांडला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडे सविस्तर निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्याची दखल घेत म्यानमारमधील भारताचे राजदूत अभय ठाकूर यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील ३२ भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी म्यानमार प्रशासनाकडे स्वतंत्र Diplomatic Note पाठविण्यात आली असून, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील स्वप्नील भारत काळुंके यांचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे की, म्यावाडी परिसर सध्या गैर-राज्य घटकांच्या (Non-State Actors) नियंत्रणाखाली असल्यामुळे बचाव मोहिमेस अनेक अडचणी येत आहेत. तरीही भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करून त्यांना मायदेशी परत आणणे हे भारतीय दूतावासाचे सर्वोच्च प्राधान्य असून, यासाठी म्यानमारमधील संबंधित यंत्रणा आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. दूतावासाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुलै २०२२ पासून आतापर्यंत २,६८३ भारतीय नागरिकांनी मदतीसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून, त्यापैकी २,४१८ नागरिकांची यशस्वीरित्या सुटका करून त्यांना भारतात परत आणण्यात आले आहे. उर्वरित भारतीय नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठीही प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले की, म्यानमारमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाची सुरक्षित सुटका होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरू राहील. बीड जिल्ह्यातील स्वप्नील काळुंके यांच्यासह सर्व भारतीय नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परतावेत, यासाठी केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाशी सातत्याने संपर्क ठेवून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

1 hr ago
user_Anil Kachare
Anil Kachare
Event management company बीड, बीड, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल बीड प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.
    4
    लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे

 राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल 

लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे
राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल 
बीड प्रतिनिधी :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी  अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.
ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 min ago
  • ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    1
    ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    user_दत्ता. सखाराम. बळी
    दत्ता. सखाराम. बळी
    गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    1
    मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार!
परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    1
    महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
    3
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती
बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
    1
    भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास!

भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास!
भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.