"वाचनालय हे ज्ञान व संस्काराचे मंदिर असते", सरपंच अरविंद ढोणे "वाचनालय हे ज्ञान व संस्काराचे मंदिर असते", सरपंच अरविंद ढोणे पंचशिल नगरात वाचनालय व अभ्यासकांचे उद्घाटन हिंगणा शहर प्रतिनिधी हिंगणा (दि १० मे):- वाचनालय पुस्तकांचे भांडार नसते, तर ते ज्ञानाचे, संस्काराचे व विचारांचे मंदिर असते असे मत सरपंच अरविंद ढोणे यांनी पंचशिल नगरात आयोजित वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. हिंगणा तालुक्यातील ग्राम पंचायत ईसासनी परिसरातील पंचशिल नगर येथे नालंदा बुद्ध विहारात राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन नुकतेच सरपंच अरविंद ढोणे व वरिष्ठ पत्रकार तथा जेष्ठ समाजसेवक लिलाधर दाभे यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती दिनी पार पडले. या वेळी ग्राम पंचायत सदस्य जोत्सनाताई रहांगडाले, उषाताई वाघमारे, समाज सेविका इंदूताई पटले, धम्म उपासक कैलास देशभ्रतार, मनोज भिलावे, पद्माकर चौधरी, राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद काळबांडे, सचिव सहदेव बांगर, सल्लागार प्रविण तिरपूडे, राज उके, माजी अध्यक्ष सुनील शिंगाडे मंचकावर उपस्थित होते. वाचनालयात वाचकांना नविन नविन गोष्टी शिकायला मिळतात, त्यामुळे त्यांच्या विचारांना चालना मिळते व तो स्वतःचा विकास घडवितो असेही सरपंच ढोणे पुढे बोलले. वाचनालयाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे ढोणे म्हणाले. मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून कुठलीही माहिती सहज उपलब्ध होत असली तरी पण पुस्तक वाचण्याची मजा व त्यातून मिळणारे सखोल ज्ञान याला पर्याय नाही. वाचकांना पुस्तके माहितीच देत नाही, तर ते विचार करायला, प्रश्न विचारला आणि योग्य निर्णय घेण्यास शिकविते. वाचनालय शांत वातावरणात एकाग्रतेने अभ्यास करण्याची आणि वाचनाची सवय लावण्याची संधी देते असे मत वरिष्ठ पत्रकार लिलाधर दाभे यांनी व्यक्त केले व वाचनालयात पुस्तके खरेदी करण्यासाठी पाच हजार धम्म दान देण्याचे जाहीर केले. तुषार सुर्यवंशी यांच्या समाज प्रबोधनाचे कार्यक्रमानी प्रेषक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण शिंगाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रल्हाद काळबांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता संस्थेचे सदस्य दिलीप इंगळे, रवि मनोहरे, मनोज टेंभुर्णे, श्रीराम वानखेडे, बाळू मेश्राम, अश्विन वाघमारे, सुनील खोब्रागडे, मंगेश वालदे, चंद्रशेखर उके, कुसूमताई खांडेकर, रामभाऊ मुनघाटे, सिध्दार्थ नाईक, प्रबुद्ध नाईक, विकास सोनुले, राजकन्या राऊत, पुंडलिक बागडे, विनोद सोनुले, प्रमोद खंडारे, अरूण वानखेडे आदींनी अथक परिश्रम घेतले

- शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे. आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।। - द किरण माने.1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या नागपूर :- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात एका १९ वर्षीय युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव लकी विजयराव कानफाडे असे आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा प्रक्रिया केली. यानंतर गळफास घेतलेल्या लकी कानफाडे यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे करीत आहेत.1
- उत्तर प्रदेशातील हापुड येथे महाराणा प्रताप जयंती शोभायात्रेदरम्यान मुस्लिमबहुल भागात दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून काही वाहनांचीही तोडफोड झाली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून पुढील तपास सुरू आहे.1
- मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.2
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- अभिनेता किरण माने यांनी आपल्या रक्तात 'शिव-भीम विचारांची धग आणि रग' भिनल्याचे मोठे विधान केले. कोल्हापुरातील त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर, त्यांनी आपल्या विरोधकांना डिवचत हे कॉम्बिनेशन 'लै खतरनाक' असल्याचे म्हटले. त्यांची तडफड हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे नवीन पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर विदेशी सिगारेटचा मोठा साठा जप्त करण्यात आला. क्राईम ब्रांचच्या 'ऑपरेशन थंडर'ने ही कारवाई केली असून, यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतक-यांना दुहेरी फायदा नागपूर शहर प्रतिनिधी पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतक-यांना दुहेरी फायदा नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि १० मे) पाणंद रस्त्यांच्या बांधकामासाठी लागणारा मुरूम जर नदी, नाले व तलाव यांच्या खोलीकरणातून उपलब्ध करून घेतला, तर त्यातून दुहेरी फायदा होऊ शकतो असे प्रतिपादन आमदार आशीष देशमुख यांनी केले. एका बाजूला शेतकऱ्यांसाठी दर्जेदार पाणंद रस्त्यांचे बांधकाम होईल, तर दुसऱ्या बाजूला जलयुक्त शिवार व जलसंधारणाची प्रभावी कामेही पूर्ण होतील. नदी, नाले आणि तलावांचे खोलीकरण झाल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, विहिरी व बोअरवेलला पाणी टिकून राहील आणि भविष्यातील दुष्काळाच्या संकटावर मोठ्या प्रमाणात मात करता येईल.1