logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक; भूमी थीममध्येही सर्वोत्कृष्ट कामगिरी *माझी वसुंधरा अभियानात पिंपरी चिंचवड महापालिका राज्यात सर्वप्रथम....* बक्षिसाची रक्कम १० कोटी पिंपरी दि.१७ फेब्रुवारी २०२६ महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ च्या राज्यस्तरीय अंतिम निकालात १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावून राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.तसेच भूमी विषयांतर्गत महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. अभियान कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे डेस्कटॉप मूल्यांकन व फिल्ड मूल्यांकन करण्यात आले.दोन्ही मूल्यांकनांमधील एकूण गुणांच्या आधारे राज्यातील १४ गटांतील विजेत्यांची निवड शासन मान्यतेनंतर जाहीर करण्यात आली.या प्रक्रियेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरण संरक्षण,हरित उपक्रम,कचरा व्यवस्थापन,जलसंवर्धन, ऊर्जा बचत आणि जनजागृती यामध्ये प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला आहे. महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन,प्लास्टिक निर्मूलन उपक्रम, जलसंधारण प्रकल्प,घनकचरा व्यवस्थापन सुधारणा,हरित शाळा उपक्रम, सौरऊर्जा प्रकल्प,तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागातून विविध पर्यावरणपूरक मोहिमा राबवल्या आहेत. नागरिक,स्वयंसेवी संस्था,शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक आस्थापनांच्या सहभागामुळे अभियानाला व्यापक यश मिळाले. या यशाबद्दल महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर,आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे,उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन केले . राज्यस्तरावर मिळालेल्या या मानांकनामुळे पिंपरी चिंचवड शहराची पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळख अधिक बळकट झाली आहे.आगामी काळात ‘माझी वसुंधरा ६.० अभियान’ ही देखील अधिक व्यापक स्वरूपात राबवून हरित,स्वच्छ आणि शाश्वत शहर घडविण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. माझी वसुंधरा ५.० अभियानामध्ये मिळालेला प्रथम क्रमांक हा महापालिकेच्या सर्व विभागांच्या समन्वयित कामकाजाचा आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा परिणाम आहे.पर्यावरण संरक्षण,शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांना प्राधान्य देत आम्ही पुढील काळात अधिक तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि परिणामकारक प्रकल्प राबवू.‘माझी वसुंधरा ६.०’ अंतर्गत अधिक व्यापक नियोजन करून पिंपरी चिंचवड शहराला पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. -रवि लांडगे,महापौर,पिंपरी चिंचवड महापालिका माझी वसुंधरा ५.० अभियानात मिळालेले यश हे पिंपरी चिंचवड शहराचे असून,पर्यावरण संवर्धनासाठी पिंपरी चिंचवड शहर कटिबद्ध असून भविष्यातही अधिक प्रभावी उपक्रम राबविण्यात येतील. आगामी काळात तंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि नवकल्पना यांना अधिक चालना देण्यात येईल. -श्रावण हर्डीकर ,आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका माझी वसुंधरा अभियानामध्ये राबविण्यात आलेले विविध हरित प्रकल्प,घनकचरा व्यवस्थापनातील सुधारणा आणि ऊर्जा बचतीसंदर्भातील उपक्रम यांचा एकत्रित परिणाम म्हणून हे यश मिळाले आहे. प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वय राखत नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. — विजयकुमार खोराटे,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.‘माझी वसुंधरा ५.०’ अंतर्गत जनजागृती,प्लास्टिक निर्मूलन,जलसंधारण आणि हरित उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. — डॉ. प्रदीप ठेंगल,उपायुक्त,पिंपरी चिंचवड महापालिका

5 hrs ago
user_City Mirror News
City Mirror News
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शस्त्राचा धाक दाखवून मोटार सायकल चोरी, जबरी चोरी तसेच घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या जाळ्यात
    1
    शस्त्राचा धाक दाखवून मोटार सायकल चोरी,
जबरी चोरी तसेच घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या जाळ्यात
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    25 min ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Deepak Sagar
    1
    Post by Deepak Sagar
    user_Deepak Sagar
    Deepak Sagar
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून  डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र  तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे  डोळेझाक करत असून  पर्यावरण प्रेमींनी  कारवाईची मागणी केली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by AMINIYA COURIER
    1
    Post by AMINIYA COURIER
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पुणे अहिल्यानगर‌ महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.
    1
    पुणे अहिल्यानगर‌ महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    17 hrs ago
  • BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    1
    BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. 
#AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    38 min ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.