जालना मर्चंट्स को-ऑप बँकेचे विलिनीकरण; ग्राहकांना सहकार्याचे आवाहन जालना – मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को-ऑप बँक लि., जालना यांच्या वतीने सर्व सभासद, ग्राहक व ठेवीदारांना एक महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., डोंबिवली (पूर्व) मध्ये विलिनीकरण (मर्जर) होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विलिनीकरण प्रक्रियेनंतर बँकेत असलेल्या चालू, बचत तसेच सर्व प्रकारच्या मुदत ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहून त्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा भीती (पॅनिक) न बाळगता बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बँक प्रशासनाने सर्व ग्राहकांना शांतता व विश्वास ठेवण्याचे आवाहन करत, विलिनीकरण प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
जालना मर्चंट्स को-ऑप बँकेचे विलिनीकरण; ग्राहकांना सहकार्याचे आवाहन जालना – मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को-ऑप बँक लि., जालना यांच्या वतीने सर्व सभासद, ग्राहक व ठेवीदारांना एक महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., डोंबिवली (पूर्व) मध्ये विलिनीकरण (मर्जर) होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विलिनीकरण प्रक्रियेनंतर बँकेत असलेल्या चालू, बचत तसेच सर्व प्रकारच्या मुदत ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहून त्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा भीती (पॅनिक) न बाळगता बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बँक प्रशासनाने सर्व ग्राहकांना शांतता व विश्वास ठेवण्याचे आवाहन करत, विलिनीकरण प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
- घनसावंगी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्ती केंद्र गुंज बु. येथे इयत्ता पहिली वर्गाचा शाळा प्रवेशोत्सव मेळावा दि. 29 एप्रिल 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रवेशपात्र मुलांची गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध स्टॉल लावण्यात आले होते. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या पाऊलांचे ठसे घेऊन जतन करण्यात आले आहेत. या पूर्वतयारी मेळाव्यात इयत्ता पहिलीसाठी 20 मुलांचा प्रवेश निश्चित झाला आहे. हा कार्यक्रम मुख्याध्यापक तौर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाप्रसंगी अंगणवाडी ताई, शा. व्य. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, पालक, माता पालक व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. दि. 1 मे 2026 रोजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग) मुलांच्या कलागुणांचा अविष्कार सोहळा पार पडणार आहे. तरी सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे..1
- लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले. शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले. एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.1
- Post by Raghunath Aghao1
- भीषण अपघात; भरधाव पिकअप उलटून १२ जणांचा मृत्य, २ लहान मुलांचा समावेश भयानक व्हिडिओ समोर मध्य प्रदेश राज्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला असून, भरधाव पिकअप वाहन उलटल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.1
- railway station Nariman Nagar1
- Post by Mohsin ahmed khan1
- सतना सोशल मीडिया में सतना स्मार्ट सिटी और महापौर जी को मिल रहे लाखों न्यू, जमकर वायरल हो रही शहर की विकाश गाथा, रीवा से सतना हो गया आगे, महापौर जी के प्रयास की हर जगह हो रही वाहवाही1
- • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.1