एका रात्रीत 08 दुकाने फोडणारी चोरीची टोळी मिरजगाव पोलिसांकडून 12 तासांत जेरबंद; 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त मिरजगाव अहिल्या नगर (प्रतिनिधी) : मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका रात्रीत सलग 08 दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा मिरजगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासांत पर्दाफाश करत सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 1,15,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 04 मार्च 2026 रोजी सायंकाळी 08.00 वाजेपासून ते 05 मार्च 2026 रोजी सकाळी 09.00 वाजेच्या दरम्यान मिरजगाव ते कडा रोडवरील वीर पाटील कॉम्प्लेक्स येथील 8 दुकानांच्या पाठीमागील पत्रे उचकावून अज्ञात आरोपींनी दुकानात प्रवेश केला. आरोपींनी सोलर किटचे 13 कंट्रोलर, सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर, ड्रिल मशीन, स्पॅनर सेट, ट्रॅक्टर टेप, स्पीकर वायर, कटर तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करून नेला होता. याप्रकरणी फिर्यादी अभय बाळासाहेब दळवी (रा. तिखी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 74/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(4), 334(1), 305, 324(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका रात्रीत झालेल्या सलग चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलबुर्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत मा. श्री. प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत मनोहर भीमराव पवार (रा. बीडसांगवी, ता. आष्टी, जि. बीड) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार खालील आरोपींना अटक करण्यात आली : मनोहर भीमराव पवार अरुण रघुनाथ बर्डे काळुराम चंदु माळी ज्ञानेश्वर गंगाराम साळुंखे सुरेश बाळु माळी भास्कर बबन गांगर्डे (सर्व रा. देवीनिमगाव, ता. आष्टी, जि. बीड) अटक आरोपींकडून चोरीतील 1,15,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मनोहर पवार याच्याविरुद्ध यापूर्वी आष्टी पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक विजय झंजाड, सफौ शंकर रोकडे, पोहेकॉ गणेश ठोंबरे, पोकॉ सुनील खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे, अक्षय गार्डे, बळीराम काकडे तसेच होमगार्ड प्रशांत माने, अजय फुलमाळी, अक्षय पवार, दीपक काळे व बिभीषण रणदिवे यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफौ शंकर रोकडे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

- पिंपरी चिंचवड : - लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केले. तरीही हा एक लव जिहादचाच प्रकार असल्याचं नुकत्याच हिंदू धर्मात घर वापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे... लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंद ू रिती रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता, असंही अद्यान स्पष्ट केले. लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली. मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि मी माझी चूक सुधारल्याचही अद्या ने स्पष्ट केलं. चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच, दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत असल्याचं सांगतानाच तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता. मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं अद्या ने स्पष्ट केले. अद्याने दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचं ही ती म्हणाली...! : अद्या उर्फ सायली सुर्वे #सायलीसुर्वे #घरवापसी #पिंपरीचिंचवड #लव्हजिहादप्रकरण #धर्मांतरवाद #महिलाअत्याचार #पोलीसतक्रार #पुणेबातम्या #सामाजिकप्रकरण #कौटुंबिकवाद #SayaliSurve #GharWapsi #PimpriChinchwad #LoveJihadCase #ReligiousConversion #WomenHarassment #PoliceComplaint #PuneNews #SocialIssue #FamilyDispute1
- आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।1
- चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान1
- जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.1
- -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते -आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे -आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत -सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल -महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल1
- बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- आळंदि पुणे : - पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे... : माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद #आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या #Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews1
- Post by R A News1
- ‘सुमन – एक वास्तविक प्रेम कथा’ Amazon वर उपलब्ध... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1