logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शाहू महाराजांच्या नावावर बोगसगिरी चा बाजार खऱ्या वारकरी-कलावंतांना डावलून अपात्रांना सरकारी मानधनाचा मलिदा अपात्रणा दिलेल्या मानधन पाई-पाई वसूल करा -मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळुंके पाटील यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दखलीनंतर प्रकरण सीईओंकडे परतूर-मंठ्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांची चौकशी शाहू महाराजांच्या नावावर बोगसगिरी चा बाजार खऱ्या वारकरी-कलावंतांना डावलून अपात्रांना सरकारी मानधनाचा मलिदा अपात्रणा दिलेल्या मानधन पाई-पाई वसूल करा -मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळुंके पाटील यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दखलीनंतर प्रकरण सीईओंकडे परतूर-मंठ्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांची चौकशी परतूर पिराजी गायकवाड :- राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने शासनाची योजना आणि लाभार्थी मात्र कथित अपात्र गरजू कलाकारांच्या हक्काचे मानधन कुणाच्या खिशात जात आहे? असा संतप्त सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके पाटील यांनी उपस्थित केला आहे. जालना जिल्ह्यासह परतूर आणि मंठा तालुक्यातील लाभार्थी निवड प्रक्रियेची चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांचे मानधन बंद करावे आणि आतापर्यंतची रक्कम नियमानुसार वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.शाहू महाराजांचे नाव अन् कागदोपत्री कलाकार राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेचा उद्देश पात्र ज्येष्ठ साहित्यिक वारकरी भजनकार कीर्तनकार व लोककलावंतांना आधार देणे हा आहे. मात्र योजनेच्या लाभार्थी यादीतच अपात्र किंवा कथित बोगस लाभार्थी घुसले असतील तर ही योजना नेमकी कोणासाठी असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके पाटील यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने या तक्रारीची दखल घेत १८ ऑगस्ट रोजी प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी वर्ग केले आहे. गावोगावी चौकशी करा कागदावरचे कलाकार उघडे पडतील योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंतच्या प्रत्येक लाभार्थ्याची स्वतंत्र निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती खरोखर वारकरी आहे का भजन-कीर्तन करते का अभंग,हरिपाठ,काकड आरती,मंदिर सेवा आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग आहे का की फक्त कागदावरच कलाकार तयार करण्यात आला आहे याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी सोळंके पाटील यांनी केली आहे.ग्रामसभेच्या ठरावाने निवड करा लाभार्थी निवडीचा अधिकार केवळ कागदोपत्री प्रक्रियेला न ठेवता ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या ठरावातून पारदर्शक पद्धतीने निवड करावी अशी मागणी आहे. गावातील नागरिकांसमोर लाभार्थ्याची प्रत्यक्ष ओळख स्पष्ट झाली तर खरा कलाकार कोण आणि कागदोपत्री कलाकार कोण हे समोर येईल अशी भूमिका मांडण्यात आली आहे.शासकीय तिजोरी लुटण्याचा प्रकार असेल तर खैर नाही‌ लाभार्थी निवड समिती संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्या कामकाजाची तसेच आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिफारस गैरप्रकार किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळवून दिल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. अपात्र लाभार्थ्यांना शासनाकडून आजपर्यंत किती रक्कम देण्यात आली याचा हिशेब काढून ती संपूर्ण रक्कम नियमाप्रमाणे वसूल करा, अशी मागणी सोळंके पाटील यांनी केली आहे. मानधन घ्या, पण समाजासाठी कामही करा! शासनाचे मानधन घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी समाजासाठीही योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि युवकांना अभंग,हरिपाठ, भजन-कीर्तन,वारकरी परंपरा व नैतिक मूल्यांचे संस्कार देणे, मंदिर स्वच्छता, दिवाबत्ती, नित्य हरिपाठ, काकड आरती तसेच ग्रामदैवताच्या धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेणे याची नोंद ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता सीईओंच्या दारात फाईल कारवाईची कसोटी जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रार सीईओंकडे पाठविल्याने आता जिल्हा परिषद प्रशासनाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तक्रारीतील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार की पुन्हा कागदोपत्री सोपस्कार करून फाईल धूळ खात पडणार हा खरा सवाल आहे.शाहू महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या योजनेत जर गैरप्रकार झाला असेल तर तो कोणाच्याही दबावाखाली दडपला जाऊ नये. खऱ्या वारकरी-कलावंतांचा हक्क हिरावून अपात्रांना लाभ देणाऱ्यांचा हिशेब झाला पाहिजे बोगस लाभार्थी आढळल्यास त्यांचे मानधन बंद करून आतापर्यंतची शासकीय रक्कम वसूल करावी. तसेच दोषी अधिकारी कर्मचारी किंवा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके पाटील यांनी केली आहे.

12 hrs ago
user_Farukh Shekh कृष्णा नीती रिपोर्टर
Farukh Shekh कृष्णा नीती रिपोर्टर
Reporter Jalna, Maharashtra•
12 hrs ago
fd6c4d40-7d6c-42b9-b9bf-940ad3e70117

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला... जालना जिल्हाभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मोठा उत्साह... आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढलीय. यावेळी लेझिम सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
    1
    जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी...

देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी...

जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी...
देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...
जालना जिल्हाभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मोठा उत्साह...
आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढलीय. यावेळी लेझिम सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 min ago
  • नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग.. नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..
    1
    नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात..

डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..
नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात..
डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात निधोनायेथे चंदनझिरा पोलीस आणि एस पी पथकाची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगारावर गुन्हा दाखल २५लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
    1
    मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात निधोनायेथे चंदनझिरा पोलीस आणि एस पी पथकाची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगारावर गुन्हा दाखल २५लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान भोकरदन इसरारखान पठाण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे. गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे. समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
    4
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान
भोकरदन इसरारखान पठाण
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे.
जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते.
बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे.
गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे.
समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
    user_इसरारखान पठाण
    इसरारखान पठाण
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    16 min ago
  • दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा
    1
    दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा
    user_Sambhaji Fit Wellness Studio
    Sambhaji Fit Wellness Studio
    Fitness Trainer जाफ्राबाद, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
    1
    न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून
 नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून
नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    6 hrs ago
  • जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शहरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली.
    1
    जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न...

जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न...
आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शहरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 min ago
  • जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप
    1
    जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!

चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप

    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.