"जिद्द,भक्ती आणि संघर्षाचा अनोखा संगम : पुलाची शिरोलीतील गोपाळ समाजाने उभारले ‘आई काळूबाई’चे मंदिर पुलाची शिरोली / प्रतिनिधी देशभरात मंदिरे भक्तीभावाने उभारली जातात. मात्र एखादा समाज स्वतःची राहती घरे पतसंस्थेत गहाण ठेवून मंदिराचा कळस चढवतो, तेव्हा ती घटना केवळ धार्मिक राहत नाही - ती त्या समाजाच्या स्वाभिमानाचा आणि एकजुटीचा बुलंद आवाज ठरते.हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील माळभागावर वास्तव्यास असलेल्या भटक्या गोपाळ समाजाने अशीच प्रेरणादायी कर्तृत्वगाथा घडवली आहे.पारंपरिक ‘बँजो (वाजंत्री)’ व्यवसाय करणाऱ्या या समाजाने आपल्या कुलदैवत ‘आई काळूबाई’चे मंदिर स्वखर्चातून उभारले आहे.तब्बल २१ लाख ५० हजार रुपये खर्च करून बांधलेले हे मंदिर केवळ विटा-मातीचे बांधकाम नाही,तर त्यात प्रत्येक कुटुंबाचा त्याग,श्रद्धा आणि संघर्ष गुंफलेला आहे. मंदिर उभारणीसाठी शिरोली येथील एका पतसंस्थेकडून १५ लाखांचे कर्ज घेण्यात आले, तर उर्वरित रक्कम वस्तीतील प्रत्येक व्यक्तीकडून एक हजार रुपये वर्गणी स्वरूपात जमा करण्यात आली.या मंदिराचा कळस १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभदिनी चढविण्यात येणार असून, २० फेब्रुवारी रोजी आई काळूबाईच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना होणार आहे.संपूर्ण वस्तीमध्ये सध्या उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.पुलाची शिरोलीतील या गोपाळ वस्तीत सुमारे ४७० नागरिक आपल्या कुटुंबांसह गुण्यागोविंदाने राहतात.गावातील इतर समाजांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरे असून तेथे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडतात.मात्र आपल्या समाजासाठी हक्काचे मंदिर नसल्याची खंत गोपाळ समाजाच्या मनात अनेक वर्षे होती. सामाजिक एकत्रिकरणासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागा असावी, या भावनेतून मंदिर उभारणीचा निर्णय घेण्यात आला.विशेष म्हणजे हा निर्णय आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या समाजाने घेतला.हातावर पोट असलेल्या या कुटुंबांकडे एवढी मोठी रक्कम नव्हती.तरीही समाजातील आकाश पवार, लखन जाधव,अमित जाधव,किरण जाधव,पिंटू जाधव आणि सिकंदर जाधव या तरुणांनी पुढाकार घेतला.त्यांनी स्वतःची राहती घरे पतसंस्थेकडे तारण ठेवून कर्ज उचलले.आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार बाजूला ठेवून समाजाच्या स्वाभिमानासाठी घेतलेला हा निर्णय खरोखरच धाडसी ठरला आहे.शिरोली ग्रामपंचायतीने २००५ साली या समाजातील कुटुंबांना १५ बाय २५ आकाराचे ३० प्लॉट उपलब्ध करून दिले होते.मात्र त्यानंतर या समाजाच्या पक्क्या घरांच्या प्रश्नाकडे ठोसपणे लक्ष देण्यात आले नाही.अनेक वर्षे अशिक्षित आणि अल्पसंपन्न अवस्थेत राहिलेल्या या समाजाने गावातील मुख्य प्रवाहापासून काहीसे अंतर राखले होते.परंतु कालांतराने त्यांनी शिक्षण,व्यवसाय आणि सामाजिक जाण यामध्ये प्रगती साधत स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला. चार वर्षांपूर्वी एका केंद्रीय मंत्र्यांनी या वस्तीस भेट देऊन कुटुंबीयांसमवेत भोजन घेतले होते. त्यावेळी ‘या लोकांना हक्काची घरे बांधून देऊ’ असे आश्वासनही देण्यात आले होते.मात्र आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.तरीही या समाजाने निराश न होता स्वतःच्या बळावर उभे राहण्याचा निर्णय कायम ठेवला.पारंपरिक वाद्यांच्या सुरातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या गोपाळ समाजाने आता सामाजिक एकात्मतेचा आणि स्वाभिमानाचा नवा सूर लावला आहे.‘हक्काची घरे’ मिळवण्यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे; पण ‘हक्काचे मंदिर’ त्यांनी आपल्या घामातून आणि कष्टातून साकारले आहे.मंदिर उभारणीमुळे समाजात नवचैतन्य संचारले आहे.धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजजागृतीची कामे याठिकाणी राबवण्याचा मानस आहे. त्यामुळे हे मंदिर केवळ श्रद्धास्थान न राहता सामाजिक परिवर्तनाचे केंद्र ठरणार असल्याचे पुलाची शिरोलीतील गोपाळ समाजाने दाखवून दिले.राजकीय आश्वासनांवर अवलंबून न राहता एकजुटीच्या बळावर स्वप्ने साकार करता येतात. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या त्यागाची दखल घेऊन किमान आता तरी पक्क्या घरांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा,हीच या समाजाची रास्त अपेक्षा आहे.आई काळूबाईच्या मंदिराच्या कळसारोहणाच्या निमित्ताने संपूर्ण वस्ती आज अभिमानाने उभी आहे.कारण हे मंदिर त्यांच्या श्रद्धेचेच नव्हे,तर त्यांच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहे.

- कोल्हापूरातील शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रस्ते व वाहनतळ विकासकामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. निविदेपूर्वी काम पूर्ण व मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड केल्याचा दावा करत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून सखोल चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.1
- सांगोला तालुका सूतगिरणी समोर MH10AW6517 या सीएनजी टाटा गाडीला अचानक आग लागली गाडीमध्ये कोणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सांगोला येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तत्काळ आग विझवण्यात आली.1
- 🚩 *शिवरायांचे स्वप्नदर्शन; समाजजागृतीसाठी कार्य करण्याची महाराजांची प्रेरणा* 🚩 १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवराय हे केवळ एक राजा नव्हते, तर ते जनतेचे रक्षणकर्ते, स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून जगाला दाखवून दिले की ध्येय, धैर्य आणि योग्य विचार यांच्या बळावर अशक्यही शक्य होते. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, न्याय आणि लोकहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. महाराजांचे महानत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देते. माझ्या आयुष्यातही महाराजांचे स्थान अत्यंत विशेष आहे. अनेकदा स्वप्नामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. त्या स्वप्नांमध्ये महाराज मला मार्गदर्शन करतात, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात आणि “समाजाचा उद्धार कर, लोकांमध्ये जागृती निर्माण कर” असा संदेश देतात. महाराज स्वप्नामध्ये सांगतात की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नसून लोकांच्या मनात स्वाभिमान जागवणे होय. समाजामध्ये एकता, न्याय, स्त्रीसन्मान आणि मानवतेचे मूल्य पसरवण्याचे उपदेश ते देतात. त्यांच्या आशीर्वादातून समाजसेवेची ऊर्जा आणि धैर्य मिळते. महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आजच्या काळात शिवरायांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे — हाच खरा शिवमार्ग आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त भूतकाळ नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवणारी प्रेरणा आहे. १९ फेब्रुवारी या पावन दिवशी आपण सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. स्वराज्याची भावना आपल्या कृतीतून जिवंत ठेवूया. 🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा! 🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #शिवराय #हिंदवीस्वराज्य #शिवप्रेरणा #समाजजागृती #महाराष्ट्रअभिमान #जयशिवराय #१९फेब्रुवारी #शिवविचार1
- इन्सुली भिसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सावंतवाडी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा प्रकार आज सकाळी घडला. तो आठ ते नऊ वर्षाचा आहे. कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला दाजीपुर येथील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी चे वन अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.1
- भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo1
- सातारा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये अघोरी नृत्य रद्द करावे -हमीद दाभोळकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)1