logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एआययू राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठाचे उत्कृष्ट प्रदर्शन ; ललित कला प्रकारात उपविजेता चषक एआययू राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठाचे उत्कृष्ट प्रदर्शन ; ललित कला प्रकारात उपविजेता चषक (कला कौशल्य सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण - कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर) नागपूर : (१-४-२०२६) असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी (AIU) द्वारा आयोजित ३९ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत ललित कला प्रकारात उपविजेता चषक पटकाविले आहे. चेन्नई येथील सत्यभामा विज्ञान व तंत्रज्ञान संस्था येथे १० ते १४ मार्च २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या यशाने विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढविला आहे. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते दीक्षांत सभागृहात बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.‌ कला-कौशल्य सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण असल्याचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करताना म्हटले.‌ माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेत आयोजित सत्कार कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, ललित कला विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, सांस्कृतिक समन्वयक श्री. प्रकाश शुक्ला यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सांस्कृतिक युवा महोत्सव मध्य क्षेत्रिय सांस्कृतिक महोत्सव तसेच इंद्रधनुष्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनतीतून उत्तुंग यश प्राप्त केले.‌ याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाल्या. विविध स्पर्धांच्या माध्यमातून अनुभवाधारित मिळणारे शिक्षण वर्गातील शिक्षणापेक्षा सर्वोत्तम असून याची तुलना होऊ शकत नाही, असे कुलगुरू म्हणाल्या. विविध स्पर्धेत सहभागी होत सादर केलेल्या कला गुणांचा पुढील आयुष्यात आपणास निश्चित फायदा होईल असे सांगत दैदिपमान यश प्राप्त करीत विद्यापीठाचा नावलौकिक वाढविल्याने पुरस्कार प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय युवा महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत यश प्राप्त केले आहे. पोस्टर निर्माण स्पर्धा - द्वितीय पुरस्कार वेदांत खासबागे, रांगोळी स्पर्धा - द्वितीय पुरस्कार सायली गडकरी, सर्जनशील नृत्य (क्रिएटिव्ह डान्स) - द्वितीय पुरस्कार श्रुती तुलावी, सेजल नगराळे, हिमाक्षी गेडाम, स्नेहा सिडाम, चेतना मंथनवार, भूमिका जापुलकर, छकुली जाधव, युगलहंस मरकाम, शैलेश नैताम, चिराग शुक्ला, यामिनी जांगडे, खुशाली मेश्राम, लघुनाट्य (स्किट) स्पर्धा – तृतीय पुरस्कार : मोहित सरकार, अवनी धावणकर, युगलहंस मरकाम, छकुली जाधव, निहार तांबे, मोहनी वानकर, चिराग शुक्ला शास्त्रीय गायन स्पर्धा – तृतीय पुरस्कार : इंद्राणी इंदूरकर, सुयोग देवळकर, अक्षत जाधव प्रश्नमंजुषा (क्विज) स्पर्धा – अनुष्का नाग, लीलाधर खुराना, सृजन नागदेवे वाद-विवाद स्पर्धा (इंग्रजी) – तृतीय पुरस्कार : खुशाली दलाल, ईरा पाठक या सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने विद्यापीठाच्या चमूने ललित कला प्रकारात उपविजेता चषक प्राप्त केले. राष्ट्रीय युवक महोत्सवात विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. संघ व्यवस्थापक म्हणून श्री. प्रकाश शुक्ला, महिला संघ व्यवस्थापक म्हणून ललित कला विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात तर प्रशिक्षक म्हणून स्वप्निल खरे, नितीन मरसकोल्हे आणि जय गाला यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. मध्य क्षेत्रिय आंतर विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव छत्रपती संभाजी नगर येथील एमजीएम विद्यापीठात पार पडला. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील जवळपास ४० विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यापीठाच्या संघाने एकूण‌ ८ पुरस्कार प्राप्त केले. त्यामध्ये शास्त्रीय नृत्य प्रकारात इंद्राणी इंदुरकर ने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनुष्का नाग, लीलाधर खुराना, सृजन नागदेवे यांनी प्रथम पुरस्कार, क्रिएटिव्ह डान्स प्रकारात प्रथम पुरस्कार, शास्त्रीय गायन स्पर्धेत इंद्राणी इंदुरकर, सुयोग देवळकर, अक्षत जाधव यांनी द्वितीय पुरस्कार, पोस्टर निर्माण स्पर्धेत वेदांत खासबागे याने तृतीय पुरस्कार रांगोळी स्पर्धेत सायली गडकरी ने तृतीय पुरस्कार, वादविवाद स्पर्धा (इंग्रजी) इरा पाठक व खुशाली दलाल यांनी तृतीय पुरस्कार तर स्कीट संघाने तृतीय पुरस्कार प्राप्त केला. महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव 'इंद्रधनुष्य' स्पर्धेत विद्यापीठाची इंद्राणी इंदुरकर हिने शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम तर छायाचित्रण प्रकारात चिराग शुक्ला यांनी तृतीय पुरस्कार प्राप्त केला. यावेळी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर व प्रमुख अतिथींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त सर्व विद्यार्थी, संघ व्यवस्थापक प्रकाश शुक्ला, ललित कला विभाग प्रमुख डॉ.संयुक्ता थोरात,जाई देशपांडे, प्रशिक्षक स्वप्निल खरे,नितीन मरसकोल्हे,जय गाला यांचा सत्कार करण्यात आला. या सोबतच अविष्कार स्पर्धेत पुरस्कार प्राप्त मानसी तडस, अश्विनी पाटील, आकाश जैन, रोहित मदनकर, गायत्री बरडे, राधिका देशपांडे, चिन्मय जुनघरे व रितेश बागडे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार प्रकाश शुक्ला यांनी मानले. सर्वांचे सामुहिक प्रयत्न समर्पण आणि परिश्रमातून विद्यापीठाच्या संघाला उल्लेखनीय यश प्राप्त झाले. या यशाने केवळ विद्यापीठच नव्हे तर नागपूर परिसराला अभिमान होत आहे. प्राप्त झालेले यश युवा प्रतिभा, रचनात्मक परिश्रम आणि सांस्कृतिक प्रतिबद्धतेचे प्रतीक आहे. विद्यापीठाच्या संघाने प्राप्त केलेल्या यशामुळे कुलगुरू डॉ.मनाली क्षीरसागर, कुलसचिव राजू हिवसे व विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांनी विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन करीत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

20 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
20 hrs ago
1a10a8e1-94c4-4461-8919-5208e33aa065

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले. मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    1
    जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले.
मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. 
विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Mahesh RamRaj PandRam
    3
    Post by Mahesh RamRaj PandRam
    user_Mahesh RamRaj PandRam
    Mahesh RamRaj PandRam
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    14 min ago
  • खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh
    1
    खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela  #dimplesingh
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬. ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ ଭଙ୍ଗା. ଦେବଗଡ଼
    1
    ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬. ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ ଭଙ୍ଗା. ଦେବଗଡ଼
    user_Rupeli Vlog odia Tv
    Rupeli Vlog odia Tv
    Content Creator (YouTuber) समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • वानाडोंगरीत भू-माफियांचा मोठा घोटाळा उघड ! ओपन जागा विक्रीचा आरोप हिंगणा: वानाडोंगरी परिसरात शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीने लेआउटमधील मूळ नकाशा बदलून ओपन जागा विकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार नगर परिषद प्रशासनाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल ठाकरे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर निशाणा साधत म्हटले की, प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये आरक्षित जागा नकाशा बदलून कशा विकल्या गेल्या याची चौकशी करावी. संबंधित सर्व कागदपत्रे बाहेर काढून दोषींवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधू नरुले यांच्या नावावर महसूल विभागात जमीन नोंद असतानाही ती बेकायदेशीररीत्या प्लॉट करून विकण्यात आली. त्यावर ग्राहकांना कर आकारणी कशाच्या आधारे करण्यात आली ? तसेच त्या ठिकाणी रस्ते, नाले, पाणीपुरवठा यांसारखी विकासकामे कशी झाली, याबाबतही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. “नगर परिषदेत दाल काळी नाही, तर पूर्ण दाळच काळी आहे,” असा घणाघाती आरोप करत ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींनाच थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी हा मुद्दा सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना जेलची हवा लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा सुरू ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
    1
    वानाडोंगरीत भू-माफियांचा मोठा घोटाळा उघड ! ओपन जागा विक्रीचा आरोप
हिंगणा: वानाडोंगरी परिसरात शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीने लेआउटमधील मूळ नकाशा बदलून ओपन जागा विकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार नगर परिषद प्रशासनाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल ठाकरे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर निशाणा साधत म्हटले की, प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये आरक्षित जागा नकाशा बदलून कशा विकल्या गेल्या याची चौकशी करावी. संबंधित सर्व कागदपत्रे बाहेर काढून दोषींवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सिंधू नरुले यांच्या नावावर महसूल विभागात जमीन नोंद असतानाही ती बेकायदेशीररीत्या प्लॉट करून विकण्यात आली. त्यावर ग्राहकांना कर आकारणी कशाच्या आधारे करण्यात आली ? तसेच त्या ठिकाणी रस्ते, नाले, पाणीपुरवठा यांसारखी विकासकामे कशी झाली, याबाबतही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
“नगर परिषदेत दाल काळी नाही, तर पूर्ण दाळच काळी आहे,” असा घणाघाती आरोप करत ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींनाच थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी हा मुद्दा सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना जेलची हवा लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा सुरू ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 day ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.