अनवली येथे सर्व सोयी-सुविधांनी सज्ज शासकीय निवासी शाळा सुरू प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थ्यांची क्षमता; मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांचे आवाहन सोलापूर, दि. 26 : ग्रामीण भागातील सर्वसामान्य व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे दर्जेदार व मोफत शिक्षण मिळवून देऊन त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सातत्याने कार्यरत आहे. या उद्देशाचा एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6 वी ते 8 वीच्या वर्गांसाठी प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे. शासकीय निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेत शाळेत दररोज ताजे, संतुलित व सकस भोजन, सकाळचा नाश्ता, दूध, अंडी, फळे व आठवड्यातून दोन वेळा मिष्टान्न भोजन देण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी आर.ओ. (RO) प्रणालीद्वारे शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खेळ व शारीरिक सुदृढतेला महत्त्व देत शाळेच्या क्रीडांगणावर विविध क्रीडा साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गासाठी 40 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. शालेय अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विशेष उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच व्यक्तिमत्त्व विकासावरही विशेष भर देण्यात येत आहे. अनवली येथील शासकीय निवासी शाळा ही ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारे एक सक्षम व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त करून पंढरपूर तालुक्यासह परिसरातील जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या शासकीय निवासी शाळेत प्रवेश घ्यावा, प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सात रस्ता, सोलापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर सुलोचना सोनवणे यांनी केले आहे. शाळेचा पत्ता : अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, अनवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.

- विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.1
- घरी जाऊन विचारा तुमच्या बायकोला : खासदार सुप्रिया सुळे1
- बिबवेवाडीत जीवघेणा हल्ला; फरार चार आरोपी आठ तासांत पोलिसांच्या ताब्यात!1
- कंगना रणौत ने (रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरुन वाद पेटला, )Kriti Sanon ला कंगनाने सुनावलं | रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरुन वाद पेटला, Kriti Sanon ला कंगनाने सुनावलं | Kangna Ranaut watch full video संपूर्ण व्हिडिओ पहा1
- गांधीनगर खराळवाडी पिंपरी पुणे 18 लोखंडे भवन यांचे शेजारी लाईट फांद्याच्या झाडांनी झाकून गेले आहे नमस्कार, मी युवराज उपाडे, सामाजिक कार्यकर्ता, गांधीनगर खराळवाडी. लोखंडे भवन यांच्या शेजारी असलेल्या या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील लाईट झाडांच्या फांद्यांमध्ये झाकला जात आहे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना तसेच वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भात सारथीवर तक्रार करून बरेच दिवस झाले आहेत; मात्र अजूनपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बॅनरसाठी झाडांच्या फांद्या लगेच तोडल्या जातात, पण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावर पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी आवश्यक असलेली छाटणी का केली जात नाही? माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की, या ठिकाणी तातडीने पाहणी करून आवश्यक त्या फांद्यांची योग्य पद्धतीने छाटणी करावी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, ही माझी विनंती.3
- धक्कादायक! कांदिवलीत शौचालयाशेजारी हिरव्या पाण्यात मटार भिजवण्याचा प्रकार; अन्नाच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्न!1
- गरिबीतून संघर्ष, संघर्षातून यश..! तुकाराम मुंढेंनी सांगितली कहाणी... पिंपरी चिंचवड : गरिबीच्या परिस्थितीतून आलेल्या तुकाराम मुंढेंनी संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आयुष्यात मोठं यश मिळवलं. दिशा सोशल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी गरिबीने आपल्याला काय शिकवलं, याबद्दल मनोगत व्यक्त केलं.गरिबी ही अडचण नसून, तीच आयुष्याची मोठी शिकवण ठरली, असं त्यांच्या अनुभवातून दिसून आलं... #TukaramMundhe #तुकाराममुंढे #DishaSocialFoundation #IAS #IASOfficer #TukaramMundheSpeech #Inspiration #SuccessStory #StruggleStory #Motivation #MarathiNews #MaharashtraNews #PuneNews #ViralNews #SocialNews #TheNayakNews1
- "त्या कुटुंबाला एक रुपया ही मागू नका.., जे काय तुमचं बिल आहे ते..!"1
- पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1