logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाबळेश्वर परिसरातील पाचगणीजवळच्या भोस गावात पर्यटनासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुणाची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. अक्षय रमेश जाधव असे मृत तरुणाचे नाव असून, तो मूळचा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील रहिवासी होता. दारूच्या नशेत एका घरात डोकावल्याच्या संशयावरून अक्षयला लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी अक्षय आपल्या मित्रांसह 'अतिथी व्हिला हॉटेल' येथे मुक्कामाला होता. मद्यप्राशन केल्यामुळे मित्रांनी त्याला खोलीत ठेवून कडी लावली होती, मात्र काही वेळाने तो खोलीतून बाहेर पडला. शोध घेत असताना मित्रांना अक्षयवर काही लोक हल्ला करताना दिसले. एका मुलीने फोन केल्यानंतर तिचे वडील व त्यांच्या साथीदारांनी अक्षयला गाठून चिखलात तुडवत जबर मारहाण केली. अक्षयच्या मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयितांनी कोणाचेही ऐकले नाही. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी सूर्यकांत चंद्रकांत गोले, अविनाश सतीश भोसले, राहुल जनार्दन राजपुरे आणि अमोल गणेदेव वाडकर या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशाल अजित जाधव यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तो पाचगणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, स.पो.नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मृत अक्षय जाधव यांच्यावर भिगवण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

12 hrs ago
user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
12 hrs ago
7eb6860f-fbfb-4d0d-af20-e152bff9d5b2

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    1
    उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पुण्याच्या बारामतीमध्ये पालखी दरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीने अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो आपल्या गळ्यात घालून समाजाला एक संदेश दिला. पालखीमध्ये या ज्येष्ठ व्यक्तीने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घातल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
    1
    पुण्याच्या बारामतीमध्ये पालखी दरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीने अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो आपल्या गळ्यात घालून समाजाला एक संदेश दिला. पालखीमध्ये या ज्येष्ठ व्यक्तीने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घातल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याशी संबंधित एका भक्तीमय संदेशात, सम्राटेक विजापूर येथील दुर्गा माता देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व लोकांना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी देवी माता दुर्गादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हीआयपी (VIP) पाहुणे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असा उत्साह या संदेशातून व्यक्त करण्यात आला आहे।
    1
    सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याशी संबंधित एका भक्तीमय संदेशात, सम्राटेक विजापूर येथील दुर्गा माता देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व लोकांना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी देवी माता दुर्गादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हीआयपी (VIP) पाहुणे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असा उत्साह या संदेशातून व्यक्त करण्यात आला आहे।
    user_Shekhar chavan साहेब
    Shekhar chavan साहेब
    खटाव, सातारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दररोज सकाळी जगाच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना "पसायदान" म्हटली जाते. मात्र, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित शाळा इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे मिळतील काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून निधीचे "दान" मिळेल काय, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे।
    1
    बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दररोज सकाळी जगाच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना "पसायदान" म्हटली जाते. मात्र, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित शाळा इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे मिळतील काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून निधीचे "दान" मिळेल काय, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे।
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    पाटोदा, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील सचिन भोसले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'जगातील पहिला रस्त्यांचा डॉक्टर कोण?' असा प्रश्न उपस्थित करत सचिन भोसले यांच्याबाबत चर्चा सुरू आहे आणि सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ जोरदार गाजत आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील सचिन भोसले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'जगातील पहिला रस्त्यांचा डॉक्टर कोण?' असा प्रश्न उपस्थित करत सचिन भोसले यांच्याबाबत चर्चा सुरू आहे आणि सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ जोरदार गाजत आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या चरण पादुका असलेल्या पालखीचे शिरूर कासार शहरात प्रशासनाच्या वतीने मोठ्या जल्लोषात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे. "भेटी लागे जीव.. लागलीसे आस..पाऊले चालली पंढरीची वाट..!" या भक्तिभावाने पालखीचे स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याप्रसंगी तहसीलदार सुरेशजी घोळवे, नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी गणेश दहिफळे, पोलीस ठाण्याचे एपीआय राजेश गडवे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हरिनामाच्या गजरात शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
    1
    आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या चरण पादुका असलेल्या पालखीचे शिरूर कासार शहरात प्रशासनाच्या वतीने मोठ्या जल्लोषात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे. "भेटी लागे जीव.. लागलीसे आस..पाऊले चालली पंढरीची वाट..!" या भक्तिभावाने पालखीचे स्वागत करण्यात आले.

या स्वागत सोहळ्याप्रसंगी तहसीलदार सुरेशजी घोळवे, नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी गणेश दहिफळे, पोलीस ठाण्याचे एपीआय राजेश गडवे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हरिनामाच्या गजरात शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
    user_Mahesh Mangrulkar
    Mahesh Mangrulkar
    Shirur (Kasar), Beed•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.