पालकसचिव डॉ. पुलकुंडवार यांची जिल्हा परिषदेला भेट -अधिका-यांनी समन्वय ठेवून काम करण्याचे केले आवाहन परभणी(प्रतिनिधी):- ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्रालयाचे सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालकसचिव डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी परभणी जिल्हा परिषदेला शुक्रवारी दिनांक 31 भेट दिली. जिल्हा परिषदेच्या वतीने सचिव डॉ पुलकुंडवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. पुलकंडवार यांच्या हस्ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या खाद्य साहित्य किटचे विमोचन करण्यात आले. दरम्यान, महिला बचत गटांच्या लावण्यात आलेल्या स्टॉलला डॉ. पुलकुंडवार यांनी भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांची पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी परभणी जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हाभरामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून दिली. यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली असून शासनाच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी विविध योजनांची आखणी करावी. तसेच ग्रामपंचायतींनी सोलार प्रकल्पास अनुदान देण्यासाठी प्रशासन अनुदान देण्याची तरतूद करेल. त्यामुळे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी समन्वयाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहण्याबाबत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष लताताई वाकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, महिला व बालविकास विभाग सभापती ऐश्वर्या चव्हाण, कृषी व पशुसंवर्धन सभापती कौशल्याबाई शिंदे, उपमुख्य कायकारी अधिकारी प्रशासन डॉ. संदीप घोन्सीकर, उपमुख्य कायकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकसचिव डॉ. पुलकुंडवार यांची जिल्हा परिषदेला भेट -अधिका-यांनी समन्वय ठेवून काम करण्याचे केले आवाहन परभणी(प्रतिनिधी):- ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्रालयाचे सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालकसचिव डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी परभणी जिल्हा परिषदेला शुक्रवारी दिनांक 31 भेट दिली. जिल्हा परिषदेच्या वतीने सचिव डॉ पुलकुंडवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. पुलकंडवार यांच्या हस्ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या खाद्य साहित्य किटचे विमोचन करण्यात आले. दरम्यान, महिला बचत गटांच्या लावण्यात आलेल्या स्टॉलला डॉ. पुलकुंडवार यांनी भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांची पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी परभणी जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हाभरामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून दिली. यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत, ग्रामीण भागातील नागरिकांचे
जीवनमान उंचावण्यासाठी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली असून शासनाच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी विविध योजनांची आखणी करावी. तसेच ग्रामपंचायतींनी सोलार प्रकल्पास अनुदान देण्यासाठी प्रशासन अनुदान देण्याची तरतूद करेल. त्यामुळे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी समन्वयाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहण्याबाबत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष लताताई वाकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, महिला व बालविकास विभाग सभापती ऐश्वर्या चव्हाण, कृषी व पशुसंवर्धन सभापती कौशल्याबाई शिंदे, उपमुख्य कायकारी अधिकारी प्रशासन डॉ. संदीप घोन्सीकर, उपमुख्य कायकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.3
- महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज1
- पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.2