logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*जनसेवा सप्ताहात पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; राष्ट्रवादी काँग्रेसचा संवेदनशील उपक्रम* नाशिक, दि. ३१ जुलै* : दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित "जनसेवा सप्ताह" अंतर्गत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चांदोरी–सायखेडा परिसरातील पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. जनता इंग्लिश मिडीयम स्कूल, सायखेडा येथे पार पडलेल्या या उपक्रमातून महापुरामुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नव्याने बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या आठवड्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे चांदोरी, सायखेडा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तूंसह विद्यार्थ्यांच्या वह्या, पुस्तके, दप्तर आणि इतर शालेय साहित्यही चिखलयुक्त पाण्यात भिजून निकामी झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांसमोर पुन्हा शाळेत जाण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला, तर पालकांनीही या संवेदनशील उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले की, "पूरासारख्या नैसर्गिक संकटामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून, समाजातील प्रत्येक गरजू घटकाला मदतीचा हात देणे हीच आमची भूमिका आहे." उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खंबीर राहण्याचा संदेश देत नव्या उत्साहाने शिक्षण सुरू ठेवण्याचे आवाहन केले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमातून जनसेवा सप्ताहाचा उद्देश केवळ कार्यक्रमांचे आयोजन नसून समाजातील गरजू, संकटग्रस्त आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हा असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची पुढील काळातही सातत्याने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. उल्हास पवार सर यांनी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांचे आभार मानत, आम्ही नेहमीच आपल्या सोबत राहुल शाळेला कोणतीही मदत लागली तर ती करू असे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी ग्वाही दिली. या प्रसंगी बाळासाहेबजी कर्डक, योगेश निसाळ, सिद्धार्थ वनारसे, बापू गडाख, निखिल डेरले, आशपाक शेख, महेश कुटे, राजेंद्र कुटे, विजय काळे हाजी वाजहत शेख, समीर गायधनी, आशुतोष चव्हाण, संदीप शेलार, सुयश लवांड, विठ्ठल भोज, संकेत ओली, यश नायर तथा शाळेचे शिक्षक इतर कर्मचारी वर्ग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

20 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
20 hrs ago
9803050a-3919-4754-9c23-26d83517472f

*जनसेवा सप्ताहात पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; राष्ट्रवादी काँग्रेसचा संवेदनशील उपक्रम* नाशिक, दि. ३१ जुलै* : दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित "जनसेवा सप्ताह" अंतर्गत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चांदोरी–सायखेडा परिसरातील पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. जनता इंग्लिश मिडीयम स्कूल, सायखेडा येथे पार पडलेल्या या उपक्रमातून महापुरामुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नव्याने बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या आठवड्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे चांदोरी, सायखेडा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे

724dd436-ed3a-411f-a927-ed498a9ec56f

संसार उद्ध्वस्त झाले असून घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तूंसह विद्यार्थ्यांच्या वह्या, पुस्तके, दप्तर आणि इतर शालेय साहित्यही चिखलयुक्त पाण्यात भिजून निकामी झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांसमोर पुन्हा शाळेत जाण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला, तर पालकांनीही या संवेदनशील उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले की, "पूरासारख्या नैसर्गिक संकटामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस

6959bb42-17cc-4fa1-9c71-89ed69faefc2

पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून, समाजातील प्रत्येक गरजू घटकाला मदतीचा हात देणे हीच आमची भूमिका आहे." उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खंबीर राहण्याचा संदेश देत नव्या उत्साहाने शिक्षण सुरू ठेवण्याचे आवाहन केले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमातून जनसेवा सप्ताहाचा उद्देश केवळ कार्यक्रमांचे आयोजन नसून समाजातील गरजू, संकटग्रस्त आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हा असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची पुढील काळातही सातत्याने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे यावेळी

0dc6b476-7a03-4789-98dc-00b951365666

सांगण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. उल्हास पवार सर यांनी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांचे आभार मानत, आम्ही नेहमीच आपल्या सोबत राहुल शाळेला कोणतीही मदत लागली तर ती करू असे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी ग्वाही दिली. या प्रसंगी बाळासाहेबजी कर्डक, योगेश निसाळ, सिद्धार्थ वनारसे, बापू गडाख, निखिल डेरले, आशपाक शेख, महेश कुटे, राजेंद्र कुटे, विजय काळे हाजी वाजहत शेख, समीर गायधनी, आशुतोष चव्हाण, संदीप शेलार, सुयश लवांड, विठ्ठल भोज, संकेत ओली, यश नायर तथा शाळेचे शिक्षक इतर कर्मचारी वर्ग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    1
    दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 
दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून   २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    1
    9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची  जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    user_Nilesh Nana Dhinda
    Nilesh Nana Dhinda
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बदापूर-ब्राह्मणगाव रस्त्याची दैनंदिन दुरवस्था: संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतली; नागरिक हैराण ​येवला:दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बदापूर ते ब्राह्मणगाव रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे रोजच लहान-मोठी वाहने फसण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास मोठा उशीर झाला. ​या रस्त्यावरून दररोज दुचाकी, छोटा हत्ती आणि ट्रॅक्टरसारखी वाहने चिखलात अडकून पडतात. आज अचानक शाळेची बस रस्त्यातच रुतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने ही बस बाहेर काढण्यात आली. ​दोन जिल्ह्यांमधील दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असतानाही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर तातडीने 'रस्त्याचे' काम करून रस्ता दुरुस्त करावा, अशी तीव्र मागणी त्रस्त ग्रामस्थ व पालकांकडून केली जात आहे
    1
    बदापूर-ब्राह्मणगाव रस्त्याची दैनंदिन दुरवस्था: संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतली; नागरिक हैराण
​येवला:दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बदापूर ते ब्राह्मणगाव रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे रोजच लहान-मोठी वाहने फसण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास मोठा उशीर झाला.
​या रस्त्यावरून दररोज दुचाकी, छोटा हत्ती आणि ट्रॅक्टरसारखी वाहने चिखलात अडकून पडतात. आज अचानक शाळेची बस रस्त्यातच रुतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने ही बस बाहेर काढण्यात आली.
​दोन जिल्ह्यांमधील दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असतानाही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर तातडीने 'रस्त्याचे' काम करून रस्ता दुरुस्त करावा, अशी तीव्र मागणी त्रस्त ग्रामस्थ व पालकांकडून केली जात आहे
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी। 5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी।
    1
    5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा।
मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी।
5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा।
मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी।
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    24 min ago
  • नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा आता रस्त्यावर उतरून लढा! "ही लढाई कोणत्याही पक्षाची नाही, तर सामान्य माणसाची"; क्रांतीदिनी चक्काजाम जनआंदोलनाची दिली हाक मुंबई, दि. ३१ जुलै २०२६ : पुणे–नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे–नाशिक महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. यावर बोलताना आमदार तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले, तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या अपेक्षा आजही कायम आहेत. सरकारने नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे नाही. हा सामान्य नागरिकांचा लढा आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आज ही संधी हातची गेली, तर पुढील अनेक पिढ्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही," असे तांबे यांनी स्पष्ट केले.पुणे–नाशिक दरम्यानचा सध्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन तासांत होणाऱ्या प्रवासासाठी आज सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढता ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज पुणे व नाशिकदरम्यान प्रवास करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण यांसह संपूर्ण परिसराला या रेल्वेमुळे मोठा विकासाचा वेग मिळेल. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत, "केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो," असे आमदार तांबे यांनी ठामपणे सांगितले. शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, "हे आंदोलन कोणत्या पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही, तर भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामान्य माणूस म्हणून या जनआंदोलनात सहभागी व्हावे."
    1
    नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा आता रस्त्यावर उतरून लढा!
"ही लढाई कोणत्याही पक्षाची नाही, तर सामान्य माणसाची"; क्रांतीदिनी चक्काजाम जनआंदोलनाची दिली हाक
मुंबई, दि. ३१ जुलै २०२६ : पुणे–नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे–नाशिक महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.
यावर बोलताना आमदार तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले, तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या अपेक्षा आजही कायम आहेत. सरकारने नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
"हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे नाही. हा सामान्य नागरिकांचा लढा आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आज ही संधी हातची गेली, तर पुढील अनेक पिढ्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही," असे तांबे यांनी स्पष्ट केले.पुणे–नाशिक दरम्यानचा सध्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन तासांत होणाऱ्या प्रवासासाठी आज सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढता ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज पुणे व नाशिकदरम्यान प्रवास करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अधिक तीव्र झाली आहे.
सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण यांसह संपूर्ण परिसराला या रेल्वेमुळे मोठा विकासाचा वेग मिळेल. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत, "केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो," असे आमदार तांबे यांनी ठामपणे सांगितले.
शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, "हे आंदोलन कोणत्या पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही, तर भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामान्य माणूस म्हणून या जनआंदोलनात सहभागी व्हावे."
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है। पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई। इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है
    1
    पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan
पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan
विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है।
पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई।
इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुंबई आग्रा महामार्गावर राहुड गावाजवळ मोठ्या बाबा मंदिराजवळ मोटरसायकलचा अपघात होऊन एक जण जखमी रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या मोफत रुग्णवाहिकेचे तत्पर मदत चांदवड : दिनांक 31/ 7 /2026 रोजी दुपारी 12:42 मिनिटांच्या सुमारास अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार राहुड गावाजवळ मोठ्या बाबा मंदिराजवळ रस्त्याला खड्डा पडलेला असल्याने गाडी खड्ड्यात जाऊन अपघात झाला असून एक जण जखमी झालेला आहे. घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या विनामूल्य ॲम्बुलन्स सेवेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातातील वाहन : मोटरसायकल MH -18 -CC -8598 जखमीचे नाव : 1) निलेश राजेंद्र पाटील गाव: उंडाणे.धुळे
    5
    मुंबई आग्रा महामार्गावर राहुड गावाजवळ मोठ्या बाबा मंदिराजवळ मोटरसायकलचा अपघात होऊन एक जण जखमी
रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या मोफत रुग्णवाहिकेचे तत्पर मदत
चांदवड : दिनांक 31/ 7 /2026 रोजी दुपारी 12:42 मिनिटांच्या सुमारास अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार राहुड गावाजवळ मोठ्या बाबा मंदिराजवळ रस्त्याला खड्डा पडलेला असल्याने गाडी खड्ड्यात जाऊन अपघात झाला असून एक जण जखमी झालेला आहे. 
घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या विनामूल्य ॲम्बुलन्स सेवेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 
अपघातातील वाहन :  मोटरसायकल MH -18 -CC -8598
जखमीचे नाव :
1) निलेश राजेंद्र पाटील
गाव: उंडाणे.धुळे
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.