logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपूरमधील नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थवृत्त व योग विभागाच्या वतीने १२वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २१ जून दरम्यान योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची 'योगा फॉर हेल्दी एजिंग' ही संकल्पना लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवण्यात आले. योग सप्ताहादरम्यान, महाविद्यालयीन उद्यानमध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक योगाभ्यास आयोजित करण्यात आला. तसेच, योगाचार्य भारत गुप्ता यांचे विशेष व्याख्यानही झाले. विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी योग क्विझ, सूर्यनमस्कार स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि रील स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. योग सप्ताहाचा समारोप २१ जून रोजी महावीर नगर ग्राउंड, अझमशाह लेआऊट, नंदनवन येथे आयोजित सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाने झाला. हा कार्यक्रम आरएआरआय (RARI) आणि नागपुरातील विविध आयुर्वेद महाविद्यालयांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ. माधवी रेहपाडे, डॉ. ममता तलमले, डॉ. ओमप्रकाश गुल्हाने, डॉ. शरयू गजापुरे, डॉ. रुपाली भनारे, डॉ. स्नेहल भामकर तसेच पदव्युत्तर विद्यार्थी शुभम, लक्ष्मी, आस्था, वैष्णवी, सुरभी, तरुणा, तुषार आणि प्रियंका यांनी विशेष परिश्रम घेतले.

1 hr ago
user_Pallavi Patil, निवासी संपादक
Pallavi Patil, निवासी संपादक
Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
7a4ae8c7-9a3d-45a6-aabf-09b74302ec26

नागपूरमधील नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थवृत्त व योग विभागाच्या वतीने १२वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २१ जून दरम्यान योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची 'योगा फॉर हेल्दी एजिंग' ही संकल्पना लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवण्यात आले. योग सप्ताहादरम्यान, महाविद्यालयीन उद्यानमध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक योगाभ्यास आयोजित करण्यात आला. तसेच, योगाचार्य भारत गुप्ता यांचे विशेष व्याख्यानही झाले. विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी योग क्विझ, सूर्यनमस्कार स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि रील स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. योग सप्ताहाचा समारोप २१ जून रोजी महावीर नगर ग्राउंड, अझमशाह लेआऊट, नंदनवन येथे आयोजित सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाने झाला. हा कार्यक्रम आरएआरआय (RARI) आणि नागपुरातील विविध आयुर्वेद महाविद्यालयांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ. माधवी रेहपाडे, डॉ. ममता तलमले, डॉ. ओमप्रकाश गुल्हाने, डॉ. शरयू गजापुरे, डॉ. रुपाली भनारे, डॉ. स्नेहल भामकर तसेच पदव्युत्तर विद्यार्थी शुभम, लक्ष्मी, आस्था, वैष्णवी, सुरभी, तरुणा, तुषार आणि प्रियंका यांनी विशेष परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अन्न धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धडाक्यावर एक मोठे वक्तव्य केले आहे.
    1
    अन्न धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धडाक्यावर एक मोठे वक्तव्य केले आहे.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 min ago
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, २१ जून रोजी बल्लारपूर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी नागरिकांसोबत योगाभ्यास केला आणि योगाचे महत्त्व अधोरेखित केले. मुनगंटीवार यांनी सांगितले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी स्पष्ट केले की, योगाचा अधिक व्यापक प्रसार होण्यासाठी, तसेच त्याचा लाभ प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र योग आयोगाची स्थापना करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या मते, अशा आयोगामुळे महाराष्ट्र योग क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरू शकेल.
    1
    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, २१ जून रोजी बल्लारपूर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी नागरिकांसोबत योगाभ्यास केला आणि योगाचे महत्त्व अधोरेखित केले. मुनगंटीवार यांनी सांगितले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी स्पष्ट केले की, योगाचा अधिक व्यापक प्रसार होण्यासाठी, तसेच त्याचा लाभ प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र योग आयोगाची स्थापना करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या मते, अशा आयोगामुळे महाराष्ट्र योग क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरू शकेल.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपूर क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तथ्ये समोर आली आहेत. खेळाडू, कोच आणि पालक वर्गाने एकत्र येत क्रीडा विभागातील या मनमानी प्रशासनाचे सत्य माध्यमांसमोर उघड केले आहे.
    1
    नागपूर क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तथ्ये समोर आली आहेत. खेळाडू, कोच आणि पालक वर्गाने एकत्र येत क्रीडा विभागातील या मनमानी प्रशासनाचे सत्य माध्यमांसमोर उघड केले आहे.
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ‘पितृ देवो भव’ या वचनानुसार, वडिलांना देवाचे रूप मानले जाते. एक वडील असे देव असतात, जे आपल्या कुटुंबासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावतात.
    1
    ‘पितृ देवो भव’ या वचनानुसार, वडिलांना देवाचे रूप मानले जाते. एक वडील असे देव असतात, जे आपल्या कुटुंबासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावतात.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • २१ जून रोजी बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी नागरिकांसमवेत योगाभ्यास करत योगाचे महत्त्व अधोरेखित केले. आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आज योग जागतिक स्तरावर पोहोचला आहे. योगाचा अधिक व्यापक प्रसार व्हावा, प्रत्येक पिढीपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा आणि महाराष्ट्र योग क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरावा यासाठी स्वतंत्र योग आयोगाची स्थापना ही काळाची गरज असल्याचे मत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
    1
    २१ जून रोजी बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी नागरिकांसमवेत योगाभ्यास करत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आज योग जागतिक स्तरावर पोहोचला आहे.

योगाचा अधिक व्यापक प्रसार व्हावा, प्रत्येक पिढीपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा आणि महाराष्ट्र योग क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरावा यासाठी स्वतंत्र योग आयोगाची स्थापना ही काळाची गरज असल्याचे मत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील प्रभाग क्रमांक १२ मध्ये नागरिकांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद वाचनालयाचे लोकार्पण २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीरभाऊ मेघे यांच्या शुभहस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी तत्कालीन नगर परिषद मुख्याधिकारी भारत नंदनवार, प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक नितीन काळे, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, तरुण आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. आमदार समीरभाऊ मेघे यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत वाचन संस्कृती ही समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचे म्हटले. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कमी झाले नसून, विद्यार्थी आणि तरुणांनी नियमित अभ्यास व वाचनाची सवय लावून ज्ञानसंपन्न व जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनालये केवळ पुस्तकांचे संग्रहालय नसून, ती व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जागृतीची केंद्रे असल्याचेही त्यांनी नमूद केले. वंदे भारतचे प्रतिनिधी सतीश भालेराव यांनी संपर्क साधल्यावर, तत्कालीन मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी नागरिकांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नगर परिषदेच्या प्रयत्नांची माहिती दिली. या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि विविध विषयांवरील संदर्भ साहित्याचा लाभ सहज मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक नितीन काळे यांनी हे वाचनालय म्हणजे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाल्याचे सांगितले. याच्या निर्मितीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत त्यांनी विद्यार्थी आणि नागरिकांना वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले. वाचनालयाचे ग्रंथपाल सूरज पाठे यांनी वाचनालयाची सविस्तर माहिती दिली. येथे विविध विषयांवरील पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भ साहित्य उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळावे यासाठी सर्व आवश्यक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वाचनालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे म्हटले. विशेषतः ग्रामीण आणि उपनगरीय भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास सुविधा मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एसएससी आणि नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुभाष गेडाम, राकेश राऊत आणि आकाश मेश्राम यांनीही वाचनालयाला विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरवले, ज्यामुळे त्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला नवी दिशा मिळेल. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद वाचनालय वानाडोंगरी परिसरात ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जागृतीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
    1
    नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील प्रभाग क्रमांक १२ मध्ये नागरिकांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद वाचनालयाचे लोकार्पण २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीरभाऊ मेघे यांच्या शुभहस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी तत्कालीन नगर परिषद मुख्याधिकारी भारत नंदनवार, प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक नितीन काळे, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, तरुण आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. आमदार समीरभाऊ मेघे यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत वाचन संस्कृती ही समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचे म्हटले. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कमी झाले नसून, विद्यार्थी आणि तरुणांनी नियमित अभ्यास व वाचनाची सवय लावून ज्ञानसंपन्न व जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनालये केवळ पुस्तकांचे संग्रहालय नसून, ती व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जागृतीची केंद्रे असल्याचेही त्यांनी नमूद केले. वंदे भारतचे प्रतिनिधी सतीश भालेराव यांनी संपर्क साधल्यावर, तत्कालीन मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी नागरिकांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नगर परिषदेच्या प्रयत्नांची माहिती दिली. या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि विविध विषयांवरील संदर्भ साहित्याचा लाभ सहज मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक नितीन काळे यांनी हे वाचनालय म्हणजे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाल्याचे सांगितले. याच्या निर्मितीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत त्यांनी विद्यार्थी आणि नागरिकांना वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले. वाचनालयाचे ग्रंथपाल सूरज पाठे यांनी वाचनालयाची सविस्तर माहिती दिली. येथे विविध विषयांवरील पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भ साहित्य उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळावे यासाठी सर्व आवश्यक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वाचनालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे म्हटले. विशेषतः ग्रामीण आणि उपनगरीय भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास सुविधा मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एसएससी आणि नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुभाष गेडाम, राकेश राऊत आणि आकाश मेश्राम यांनीही वाचनालयाला विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरवले, ज्यामुळे त्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला नवी दिशा मिळेल.

उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद वाचनालय वानाडोंगरी परिसरात ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जागृतीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • नागपूर येथे नुकतीच नीट परीक्षा पार पडली, ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेशी संबंधित असलेल्या प्रवेश एजन्सीयांचे कर्मचारी मात्र त्यांच्या जाहिरातींमध्येच पूर्णपणे गुंग असल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
    1
    नागपूर येथे नुकतीच नीट परीक्षा पार पडली, ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेशी संबंधित असलेल्या प्रवेश एजन्सीयांचे कर्मचारी मात्र त्यांच्या जाहिरातींमध्येच पूर्णपणे गुंग असल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सावली योग परिवाराच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यासाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. योग परिवार सावलीच्या टीमने हा एक नवीन उपक्रम अतिशय यशस्वीपणे राबवला, ज्यामुळे योगाभ्यासाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
    1
    सावली योग परिवाराच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यासाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. योग परिवार सावलीच्या टीमने हा एक नवीन उपक्रम अतिशय यशस्वीपणे राबवला, ज्यामुळे योगाभ्यासाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.