चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी नियम मोडल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास व 1 लाख रुपये दंड चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी नियम मोडल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास व 1 लाख रुपये दंड परभणी | प्रतिनिधी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरत असल्याची शक्यता लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यात चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दोन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार, चहासाठी वापरले जाणारे कागदी कप तयार करताना ‘बीपीए’ (BPA) सारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. गरम चहा ओतल्यानंतर कपाच्या आतील बाजूस असलेले प्लास्टिकचे सूक्ष्म कण वितळून पेयामध्ये मिसळण्याची शक्यता असते. हे कण शरीरात गेल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय सय्यद रफीक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दिलेल्या निवेदनाच्या आधारे घेण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कागदी कपांचा वापर होत असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तातडीने बंदी आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. हॉटेल चालक, टपरीधारक आणि चहा विक्रेत्यांनी तत्काळ पर्यायी सुरक्षित साधनांचा वापर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे चहा विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी पर्यायांचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी नियम मोडल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास व 1 लाख रुपये दंड चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी नियम मोडल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास व 1 लाख रुपये दंड परभणी | प्रतिनिधी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरत असल्याची शक्यता लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यात चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दोन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार, चहासाठी वापरले जाणारे कागदी कप तयार करताना ‘बीपीए’ (BPA) सारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. गरम चहा ओतल्यानंतर कपाच्या आतील बाजूस असलेले प्लास्टिकचे सूक्ष्म कण वितळून पेयामध्ये मिसळण्याची शक्यता
असते. हे कण शरीरात गेल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय सय्यद रफीक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दिलेल्या निवेदनाच्या आधारे घेण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कागदी कपांचा वापर होत असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तातडीने बंदी आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. हॉटेल चालक, टपरीधारक आणि चहा विक्रेत्यांनी तत्काळ पर्यायी सुरक्षित साधनांचा वापर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे चहा विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी पर्यायांचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
- Post by Deepak Sagar1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- शस्त्राचा धाक दाखवून मोटार सायकल चोरी, जबरी चोरी तसेच घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या जाळ्यात1
- विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.1
- Post by AMINIYA COURIER1
- पुणे अहिल्यानगर महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.1
- BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1