मोक्का गुन्ह्यातील १ वर्षापासून पसार असलेला आरोपी बेंगळुरु येथून जेरबंद पुणे, १५ सप्टेंबर २०२६: पुणे शहर पोलीस दल आणि खराडी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कारवाई करत मोक्का (MCOCA) गुन्ह्याखाली मागील एक वर्षापासून फरारी असलेल्या मुख्य आरोपीला कर्नाटक राज्यातील बेंगळुरु येथून अटक केली आहे. आकाश उर्फ मुन्ना अनिल देवकर (वय २९ वर्षे, रा. येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काय आहे नेमकी घटना? दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी इवॉन खराडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या साईटवर काही इसमांनी मोटारसायकलवरून येऊन फौजदारी स्वरूपाचे अतिक्रमण केले होते. आरोपी राजु अस्वले व त्याच्या ९ साथीदारांनी कंपनीच्या परिसरात दहशत निर्माण करून कंपाऊंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागून कंपनीच्या मालकाला जीवे मारण्याची आणि कंपाऊंड उखडून टाकण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी खराडी पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. कलम १११(२ब), (४), ३०८, १८९, १९०, १९१, ३२९, ११५, ३५१, ३५२ तसेच क्रिमिनल लॉ अमेन्डमेंट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची तीव्रता पाहता यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका - MCOCA) १९९९ चे कलमीकरण करण्यात आले होते. या गुन्ह्यात यापूर्वी ८ आरोपींना अटक झाली होती, मात्र आकाश देवकर हा तेव्हापासून फरार होता. पोलिसांची धडक कारवाई व गिरफ्तारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीच्या आधारे दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ रोजी बेंगळुरु येथील हेगडे नगरमधून पसार आरोपी आकाश देवकर याला जाळ्यात अडकवून बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास खराडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त करत आहेत.

- "समाजाला न्याय मिळाला पाहिजे.., इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता..!"1
- मुखेड घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात नागरिक आक्रमक; BDO यांना निवेदन मुखेड, नांदेड : घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे मुखेड येथील नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी एकत्र येत मुखेड पंचायत समितीचे BDO यांना निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1
- मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना1
- हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan1
- मुंबई में रात 2बजे एक कॉल ने बचा ली पति पत्नी और 2 मासूम बच्चों की जान...1
- "...त्याचे पैसे मिळाले नाहीत आणि आता दुष्काळ जाहीर करत नाही..!"1
- ठेकेदारांच्या निकृष्ट कामाला लगाम घाला; पुण्यात मजबूत ड्रेनेज झाकणे बसवा — सचिन भोसले1
- देश भरात लाडक्या बाप्पाचे आगमन चिमुकली आपल्या बाप्पा ला घरी आणताना वायरल...1