logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हा पोलीस अधीक्षक आमोल तांबे यांच्या संकल्पनेतील पोलीस आपल्या सोसायटीमध्ये उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 'पोलीस आपल्या सोसायटीमध्ये, ४७ दिवसांत ३१४ भेटी, ९,४२० नागरिकांशी थेट संवाद. लातूर (प्रतिनिधी) "पोलीस आपल्या दारी, सुरक्षित समाजाची हमी" या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत लातूर जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या "पोलीस आपल्या सोसायटीमध्ये" या अभिनव उपक्रमाला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दि. १५ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या ४७ दिवसांच्या कालावधीत लातूर जिल्ह्यातील शहरी भागातील १० पोलीस ठाण्यांनी एकूण ३१४ सोसायट्या व वस्त्यांना भेटी देत तब्बल ९,४२० नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या संवादातून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या, अनेक तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले आणि कायदा-सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात व्यापक जनजागृती करण्यात आली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणे, प्रत्येक परिसरात पोलीसांची उपस्थिती वाढविणे आणि नागरिकांना पोलीस यंत्रणेशी थेट जोडणे हा होता. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सोसायट्या, वसाहती आणि निवासी भागात जाऊन नागरिकांशी मुक्त संवाद साधला. त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामध्ये अहमदपूर पोलीस ठाण्याने ४६ औसा पोलीस ठाण्याने ४१ गांधी चौक व चाकूर पोलीस ठाण्यांनी प्रत्येकी ३१, शिवाजीनगरने ३०, उदगीर शहर व उदगीर ग्रामीणने प्रत्येकी २७, एमआयडीसी व विवेकानंद चौकने प्रत्येकी २६, तर निलंगा पोलीस ठाण्याने २३ भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. संवादादरम्यान नवीन कायद्याबद्दल मार्गदर्शन, डायल ११२ आपत्कालीन सेवा, महिला सुरक्षा, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, घरफोडी प्रतिबंधक उपाययोजना, संशयित व्यक्तींची माहिती तात्काळ पोलीसांना देण्याचे महत्त्व, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज, क्यूआर कोड आधारित गस्त व्यवस्था, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, अल्पवयीन मुलांना वाहन न देणे, अमली पदार्थांविरोधातील जनजागृती, ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण आणि बीट अंमलदार व प्रभारी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या भेटींमध्ये अनेक नागरिकांनी त्यांच्या परिसरातील वाहतूक, सुरक्षाविषयक अडचणी, संशयास्पद हालचाली, सार्वजनिक ठिकाणांवरील समस्या तसेच स्थानिक कायदा-सुव्यवस्थेबाबत सूचना मांडल्या. अनेक प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली, तर उर्वरित बाबींच्या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाण्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास वाढला असून, बीट अंमलदार व प्रभारी अधिकारी यांच्याशी नागरिकांचा थेट संपर्क वाढल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत अशा भेटी नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. समाजाभिमुख पोलीसिंगची प्रभावी अंमलबजावणी करणारा "पोलीस आपल्या सोसायटीमध्ये" हा उपक्रम लातूर जिल्हा पोलीस दलाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा आदर्श ठरत असून, भविष्यातही नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित, सजग आणि गुन्हेमुक्त समाज निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

1 hr ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    1
    मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    1
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले.  या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    2
    ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न

मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. 
या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.
    1
    8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष!
रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी.
महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध!
8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष!
रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी.
महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध!
सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026.
लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले.
लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती.
तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला.
"गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." 
यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
    1
    लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    1
    महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    1
    पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! 
पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा!
#Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    2
    भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.