logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राज्यभरात गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यातून संशयित प्रशांत वाडीले याला अटक केली आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या आठ जणांच्या पथकाने धुळ्यातील वैभवनगर येथील घरातून वाडीलेला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पथकाने त्याच्या गोंदुर रोडवरील घराची झडती घेत त्याचा लॅपटॉप जप्त केला आहे. वाडीलेला धुळे न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी नाशिक येथे नेण्यात आले आहे. संशयित प्रशांत वाडीले याची रिपाइं (आठवले) शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तब्बल ८९४ शिक्षकांवर आणि तीन उपसंचालकांवर गुन्हे दाखल असून, काही संस्थाचालकही गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. धुळ्यातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याच्याशी संबंधित ६५ शाळांपैकी ६३ शाळा प्रत्यक्षात अस्तित्वातच नसून, फक्त शिंदखेडा आणि साक्री येथील दोन शाळा सध्या सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार पंकज साळुंखे यांनी केली आहे.

1 hr ago
user_Dadasaheb Gaikwad
Dadasaheb Gaikwad
Nashik, Maharashtra•
1 hr ago

राज्यभरात गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यातून संशयित प्रशांत वाडीले याला अटक केली आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या आठ जणांच्या पथकाने धुळ्यातील वैभवनगर येथील घरातून वाडीलेला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पथकाने त्याच्या गोंदुर रोडवरील घराची झडती घेत त्याचा लॅपटॉप जप्त केला आहे. वाडीलेला धुळे न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी नाशिक येथे नेण्यात आले आहे. संशयित प्रशांत वाडीले याची रिपाइं (आठवले) शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तब्बल ८९४ शिक्षकांवर आणि तीन उपसंचालकांवर गुन्हे दाखल असून, काही संस्थाचालकही गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. धुळ्यातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याच्याशी संबंधित ६५ शाळांपैकी ६३ शाळा प्रत्यक्षात अस्तित्वातच नसून, फक्त शिंदखेडा आणि साक्री येथील दोन शाळा सध्या सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार पंकज साळुंखे यांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने गेल्या दोन वर्षांपासून खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की, ७ डिसेंबर २०२३ रोजी लहवित येथील रेल्वे पोल क्रमांक १७४/१३१५ जवळ काम सुरू असताना, गुलाबसिंग आखाडे याने कोणतेही कारण नसताना एका मजुरावर लोखंडी पहारीने जीवघेणा हल्ला केला होता. या गंभीर हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होता. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी राहत असल्याचे शोधून काढले. पोलिसांच्या विशेष पथकाने दोन दिवस सलग शोधमोहीम राबवून ग्राम चोली (ता. माहेश्वर, जि. खरगोन) येथून आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे (वय ५०, रा. बेरछा, ता. भिकनगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
    3
    नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने गेल्या दोन वर्षांपासून खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की, ७ डिसेंबर २०२३ रोजी लहवित येथील रेल्वे पोल क्रमांक १७४/१३१५ जवळ काम सुरू असताना, गुलाबसिंग आखाडे याने कोणतेही कारण नसताना एका मजुरावर लोखंडी पहारीने जीवघेणा हल्ला केला होता. या गंभीर हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होता.

गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी राहत असल्याचे शोधून काढले. पोलिसांच्या विशेष पथकाने दोन दिवस सलग शोधमोहीम राबवून ग्राम चोली (ता. माहेश्वर, जि. खरगोन) येथून आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे (वय ५०, रा. बेरछा, ता. भिकनगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नाशिकच्या दत्तनगर भागात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे अखेर स्थानिकांचा संयम सुटला आहे. पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन नगरसेवक नितीन दातीर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. या वेळी नागरिकांनी तीव्र निदर्शने करत कार्यालयाला घेराव घातला आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली. प्रदर्शनकर्त्या नागरिकांच्या मते, या पाणीसमस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणत्याही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या या दुर्लक्षाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता या गंभीर जलसंकटावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    नाशिकच्या दत्तनगर भागात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे अखेर स्थानिकांचा संयम सुटला आहे. पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन नगरसेवक नितीन दातीर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. या वेळी नागरिकांनी तीव्र निदर्शने करत कार्यालयाला घेराव घातला आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली.

प्रदर्शनकर्त्या नागरिकांच्या मते, या पाणीसमस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणत्याही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या या दुर्लक्षाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता या गंभीर जलसंकटावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • विधानसभेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रस्तावांवर चर्चा करताना आमदार देवयानी फरांदे यांनी सखोल अभ्यासाच्या आधारे विविध महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी विद्यार्थ्यांचे हित, शिक्षणाचा दर्जा, गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि बदलत्या काळानुसार आवश्यक सुधारणांबाबत आपली ठोस भूमिका सभागृहात मांडली. यावेळी देवयानी फरांदे यांनी उच्च शिक्षण अधिक सक्षम, रोजगाराभिमुख आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थीकेंद्रित धोरणांवर विशेष भर दिला.
    1
    विधानसभेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रस्तावांवर चर्चा करताना आमदार देवयानी फरांदे यांनी सखोल अभ्यासाच्या आधारे विविध महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी विद्यार्थ्यांचे हित, शिक्षणाचा दर्जा, गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि बदलत्या काळानुसार आवश्यक सुधारणांबाबत आपली ठोस भूमिका सभागृहात मांडली.

यावेळी देवयानी फरांदे यांनी उच्च शिक्षण अधिक सक्षम, रोजगाराभिमुख आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थीकेंद्रित धोरणांवर विशेष भर दिला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नाशिकच्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड (वय ३७) यांना ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कारवाई थांबवून त्यांचे वाहन सोडण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    नाशिकच्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड (वय ३७) यांना ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कारवाई थांबवून त्यांचे वाहन सोडण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती.

तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    user_SANTOSH VIDHATE
    SANTOSH VIDHATE
    Mechanic दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
    1
    नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते.

यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील शिंदेवस्ती परिसरात आज सकाळी एका हृदयद्रावक दुर्घटनेत ५२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. दरेगाव येथील रहिवासी असलेल्या इंदुबाई संतोष देवरे या आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात माहेरी आल्या होत्या. नात शिक्षणासाठी तिथेच त्यांच्या भावाकडे राहत असून, वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इंदुबाई कालच राजदेरवाडीला पोहोचल्या होत्या. आज सकाळी इंदुबाई नेहमीच्या नित्यक्रमासाठी आणि प्रातःविधीसाठी घराबाहेर पडल्या असताना हा अनर्थ घडला. शिंदेवस्ती जवळील डोंगराचा भाग अचानक खचल्याने त्यावरून एक मोठा दगड थेट त्यांच्या अंगावर कोसळला. वजनी दगडाखाली दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कालपर्यंत आनंदाचे वातावरण असलेल्या घरात एका क्षणात शोककळा पसरली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे दरेगाव आणि राजदेरवाडी दोन्ही गावांवर शोकवदना पसरली असून परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवड पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
    2
    चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील शिंदेवस्ती परिसरात आज सकाळी एका हृदयद्रावक दुर्घटनेत ५२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. दरेगाव येथील रहिवासी असलेल्या इंदुबाई संतोष देवरे या आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात माहेरी आल्या होत्या. नात शिक्षणासाठी तिथेच त्यांच्या भावाकडे राहत असून, वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इंदुबाई कालच राजदेरवाडीला पोहोचल्या होत्या.

आज सकाळी इंदुबाई नेहमीच्या नित्यक्रमासाठी आणि प्रातःविधीसाठी घराबाहेर पडल्या असताना हा अनर्थ घडला. शिंदेवस्ती जवळील डोंगराचा भाग अचानक खचल्याने त्यावरून एक मोठा दगड थेट त्यांच्या अंगावर कोसळला. वजनी दगडाखाली दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कालपर्यंत आनंदाचे वातावरण असलेल्या घरात एका क्षणात शोककळा पसरली.

माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे दरेगाव आणि राजदेरवाडी दोन्ही गावांवर शोकवदना पसरली असून परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवड पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • इगतपुरी नगर परिषदेच्या हद्दीतील गिरणारे गावात पावसाचा जोर असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात होणारा पाणीपुरवठा आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि तोही अवघ्या २० ते ३० मिनिटांपुरताच मर्यादित असल्याने संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. पाणीपुरवठ्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या परिस्थितीबाबत स्थानिक महिलांनी नगरसेवक रोहिदास यांच्यासमोर आपली तीव्र नाराजी व्यक्त करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नगरसेवकांनी याबाबत नगरपरिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दीड तास उलटूनही घटनास्थळी कोणीही न फिरकल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखेर नागरिकांची गैरसोय पाहता, नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत टँकर मागवून पाण्याची तात्पुरती सोय केली. या घटनेमुळे इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडेही प्रशासन गांभीर्याने पाहत नसेल, तर सामान्य नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या तरी कुणाकडे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
    4
    इगतपुरी नगर परिषदेच्या हद्दीतील गिरणारे गावात पावसाचा जोर असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात होणारा पाणीपुरवठा आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि तोही अवघ्या २० ते ३० मिनिटांपुरताच मर्यादित असल्याने संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. पाणीपुरवठ्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

या परिस्थितीबाबत स्थानिक महिलांनी नगरसेवक रोहिदास यांच्यासमोर आपली तीव्र नाराजी व्यक्त करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नगरसेवकांनी याबाबत नगरपरिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दीड तास उलटूनही घटनास्थळी कोणीही न फिरकल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखेर नागरिकांची गैरसोय पाहता, नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत टँकर मागवून पाण्याची तात्पुरती सोय केली.

या घटनेमुळे इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडेही प्रशासन गांभीर्याने पाहत नसेल, तर सामान्य नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या तरी कुणाकडे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात ग्रामपंचायतीने माग गारुडी दलित समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत त्यांच्या घरावर बुलडोझर चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली असतानाही, केवळ एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर घोर अन्याय करण्यात आला आहे. सत्ताधारी आणि पुढारी वर्गाने रचलेल्या एका मोठ्या जातीयवादी कटाचा हा भाग असून, या कारवाईमुळे संपूर्ण समाजाला वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया किंवा शासन नियमावलीचे पालन न करता ही बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अन्यायकारक आणि जातीयवादी कारवाईविरोधात मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोलजी राखपसरे आणि समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तीव्र जाहीर निषेध नोंदवला आहे. संगमनेरचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व दोषी गावगुंडांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, या प्रकरणात स्थानिक पोलीस यंत्रणेकडूनही योग्य सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    4
    अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात ग्रामपंचायतीने माग गारुडी दलित समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत त्यांच्या घरावर बुलडोझर चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली असतानाही, केवळ एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर घोर अन्याय करण्यात आला आहे. सत्ताधारी आणि पुढारी वर्गाने रचलेल्या एका मोठ्या जातीयवादी कटाचा हा भाग असून, या कारवाईमुळे संपूर्ण समाजाला वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया किंवा शासन नियमावलीचे पालन न करता ही बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अन्यायकारक आणि जातीयवादी कारवाईविरोधात मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोलजी राखपसरे आणि समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तीव्र जाहीर निषेध नोंदवला आहे. संगमनेरचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व दोषी गावगुंडांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, या प्रकरणात स्थानिक पोलीस यंत्रणेकडूनही योग्य सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    user_Amol shelke 1711
    Amol shelke 1711
    Construction Worker संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.