logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने राज्यातील मरणोत्तर अवयवदान वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'हब अँड स्पोक मॉडेल' अंतर्गत दिनांक १८ जून २०२६ रोजी अमरावती येथे अवयवदान व प्रत्यारोपण संदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती, उपसंचालक कार्यालय अकोला मंडळ, अकोला आणि झेड.टी.सी.सी. (ZTCC), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने यात उपस्थित होते. यावेळी मा. आरोग्यमंत्री, मुंबई यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी सांगितले की, ज्या रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण होत नाही, पण मृत्यू पश्चात अवयवदान शक्य आहे, अशा सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी NTORC मध्ये नोंदणी केल्यास अवयव मिळावे यासाठी प्रतीक्षा यादीत असणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदत होईल. या कार्यशाळेत विविध तज्ञांनी NTORC नोंदणी, ब्रेन स्टेम डेथ, मृत्यू पश्चात अवयवदान आणि यात 'हब अँड स्पोक' मॉडेल कसे कार्य करते, याबाबत माहिती दिली. तसेच, THOTA कायदा, अवयवदानासाठी रुग्णालयाची तयारी व परवानगी, रुग्णाच्या नातेवाईकांशी समुपदेशन कसे करावे, मेंदू मृत रुग्ण कसा ओळखावा व त्यासाठी कोणती टीम आवश्यक असते, याविषयी सविस्तर माहिती या एकदिवसीय कार्यशाळेत देण्यात आली. अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेतील विविध पैलू, अवयवदानाचे महत्त्व, समन्वय प्रक्रिया आणि 'हब अँड स्पोक मॉडेल'ची प्रभावी अंमलबजावणी यावरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास मा. आरोग्यमंत्री, मुंबई यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सचिन जाधव, डॉ. सुशील वाकचौरे (उपसंचालक, अकोला मंडळ, अकोला), डॉ. रंगतुषार वारे (ADHS अकोला), डॉ. विनोद पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती), डॉ. शैलेश गहूकर (जनरल सेक्रेटरी, ZTCC नागपूर), डॉ. अमोल बावणे (जॉइंट सेक्रेटरी, ZTCC नागपूर), दिनेश मंडपे (ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर ZTCC नागपूर), डॉ. अविनाश चौधरी (नेफरोलॉजिस्ट), डॉ. सिकंदर अडवाणी (न्यूरोलॉजिस्ट), श्रीमती शालिनी पाटील (ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, नागपूर), सरिता सिरसाट (PHN) आणि श्रीमती सोनाली देशमुख (राज्य अवयवदान समन्वयक) यांनी मार्गदर्शन केले. तसेच, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचे (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम) जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपस्थित राहून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. माधव ढोपरे, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. सोनाली चौधरी, मीनल कानसे, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यांनी मुंदाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शितल बोंडे व ऋषिकेश धस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांनी आभार प्रदर्शन केले. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी अजित कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक विजय गाडे, अधिसेविका चंदा खोडके, ऋषिकेश सुकळकर, अजिंक्य डवाळे, कल्याणी गाढवे आणि भूपेंद्र जेवढे यांचे विशेष सहकार्य लाभले. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनपर संदेशांनी उत्साहपूर्ण वातावरणात या कार्यशाळेचा समारोप झाला.

7 hrs ago
user_Pravin Zolekar Jounarlist...
Pravin Zolekar Jounarlist...
Local News Reporter अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
7 hrs ago
d9c7fa05-7ee7-44bb-ad4e-e7156c66b796

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत, गोल्डन किड्स हायस्कूल आणि अग्रेशन पेट्रोल पंप या दोन आस्थापनांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
    1
    महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत, गोल्डन किड्स हायस्कूल आणि अग्रेशन पेट्रोल पंप या दोन आस्थापनांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
    1
    आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वनोजा बाग येथे नाथ जोगी कुटुंबावर समाजाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना घडली आहे. कुटुंब बाहेरगावी गेले असताना, त्यांच्या घरावर जेसीबी फिरवून ती साहित्यासहित जमीनदोस्त करण्यात आली. भटक्या विमुक्त समाजातील या गरीब कुटुंबाची घरे पाडल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. आता पावसाळ्यात या गरीब कुटुंबासमोर निवाऱ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेवर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    1
    वनोजा बाग येथे नाथ जोगी कुटुंबावर समाजाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना घडली आहे. कुटुंब बाहेरगावी गेले असताना, त्यांच्या घरावर जेसीबी फिरवून ती साहित्यासहित जमीनदोस्त करण्यात आली.

भटक्या विमुक्त समाजातील या गरीब कुटुंबाची घरे पाडल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. आता पावसाळ्यात या गरीब कुटुंबासमोर निवाऱ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेवर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_Nagesh Jadhav
    Nagesh Jadhav
    अंजनगाव सुर्जी, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत. या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.
    2
    २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत.

या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.
    1
    अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
    1
    पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
    user_LokNazarNews (mukesh dhoke)
    LokNazarNews (mukesh dhoke)
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • महाराष्ट्रातील पातुर येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता, ज्यामुळे सभेला जनसागर उसळल्याचे चित्र होते.
    1
    महाराष्ट्रातील पातुर येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता, ज्यामुळे सभेला जनसागर उसळल्याचे चित्र होते.
    user_Irfan Shaikh
    Irfan Shaikh
    बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना 25 जूनपर्यंत आपले आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना 25 जूनपर्यंत आपले आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.