logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धरणगावात अखंड नामजप यज्ञ सप्ताह उत्साहात संपन्न. गुरुचरित्र पारायणात 300 सेवेकऱ्यांचा सहभाग येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दि. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण सप्ताहभर गुरुचरित्र पारायण, दैनंदिन आरती, नित्य स्वाहाकार, औदुंबर प्रदक्षिणा व दर्शनसेवा अशा विविध धार्मिक उपक्रमांत 10 हजारांहून अधिक भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या सप्ताह काळात अध्यात्मिक आणि समाजप्रबोधनाच्या विविध विषयांवर सेवेकऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. गर्भसंस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, वास्तुशास्त्र, कृषीशास्त्र, मराठी अस्मिता तसेच सेवा मार्गात कार्यरत असलेल्या 18 विभागांवर सविस्तर मार्गदर्शन झाले. सेवेकऱ्यांनी सेवेतून आलेले अनुभवही उपस्थितांसमोर मांडले. सप्ताहकाळात 300 सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला. या दरम्यान गणेश याग, गीताई याग, स्वामी याग, चंडी याग, मल्हारी याग व रुद्र याग अशा विविध यागांचे आयोजन करण्यात आले. दिवस-रात्र अखंडपणे वीणा वादन, स्वामी चरित्र वाचन व स्वामी समर्थ माळजप प्रहर पद्धतीने करण्यात आले. *तीन दिवसीय युवा प्रबोधन व करिअर मार्गदर्शन शिबिर* दत्तजयंती अखंड नामजप सप्ताहानिमित्त युवा वर्गासाठी तीन दिवसीय प्रबोधन व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये नाशिक विभाग आयकर आयुक्त श्री. विशाल मकवाने यांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी त्यांनी जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व स्पष्ट करताना सकारात्मक विचार निर्णयक्षमता, वर्तन आणि करिअरवर कसा परिणाम करतात यावर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, एकाग्रता वाढवण्याचे प्रभावी उपाय आणि नियोजनाचे तंत्र यांची माहिती दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी शिबिरात मॅनिफेस्टेशन या संकल्पनेचे टप्पे, तत्त्वे आणि जीवनातील उपयोग यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मॅनिफेस्टेशन म्हणजे मन, ऊर्जा आणि विश्वास यांना एकवटून ध्येय प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया असून, योग्य विचार आणि कृती यांचा संपूर्ण समन्वय साधल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो हे त्यांनी स्पष्ट केले. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित करताना मकवाने यांनी सांगितले की अध्यात्म हा जीवनाचा पाया आहे. अध्यात्माशिवाय संस्कार आणि मानसिक बळ जीवनात टिकून राहत नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. या तीन दिवसीय शिबिराला शहर आणि परिसरातील शेकडो युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सर्व सेवेकरी परिवारांनी मोलाचे योगदान दिले.

3 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Journalist Dharangaon, Jalgaon•
3 hrs ago
bf835686-f928-4f2c-b1a8-24e4e3f53ee1

धरणगावात अखंड नामजप यज्ञ सप्ताह उत्साहात संपन्न. गुरुचरित्र पारायणात 300 सेवेकऱ्यांचा सहभाग येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दि. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण सप्ताहभर गुरुचरित्र पारायण, दैनंदिन आरती, नित्य स्वाहाकार, औदुंबर प्रदक्षिणा व दर्शनसेवा अशा विविध धार्मिक उपक्रमांत 10 हजारांहून अधिक भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या सप्ताह काळात अध्यात्मिक आणि समाजप्रबोधनाच्या विविध विषयांवर सेवेकऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. गर्भसंस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, वास्तुशास्त्र, कृषीशास्त्र, मराठी अस्मिता तसेच सेवा मार्गात कार्यरत असलेल्या 18 विभागांवर सविस्तर मार्गदर्शन झाले. सेवेकऱ्यांनी सेवेतून आलेले अनुभवही उपस्थितांसमोर मांडले. सप्ताहकाळात 300 सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला. या दरम्यान गणेश याग,

39ffcb3d-a7b7-4d40-bbc3-3fab60854590

गीताई याग, स्वामी याग, चंडी याग, मल्हारी याग व रुद्र याग अशा विविध यागांचे आयोजन करण्यात आले. दिवस-रात्र अखंडपणे वीणा वादन, स्वामी चरित्र वाचन व स्वामी समर्थ माळजप प्रहर पद्धतीने करण्यात आले. *तीन दिवसीय युवा प्रबोधन व करिअर मार्गदर्शन शिबिर* दत्तजयंती अखंड नामजप सप्ताहानिमित्त युवा वर्गासाठी तीन दिवसीय प्रबोधन व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये नाशिक विभाग आयकर आयुक्त श्री. विशाल मकवाने यांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी त्यांनी जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व स्पष्ट करताना सकारात्मक विचार निर्णयक्षमता, वर्तन आणि करिअरवर कसा परिणाम करतात यावर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, एकाग्रता वाढवण्याचे प्रभावी उपाय आणि नियोजनाचे तंत्र यांची माहिती दिली. दुसऱ्या

328865f1-1de1-47fe-ab59-7fc8c6a6a188

आणि तिसऱ्या दिवशी शिबिरात मॅनिफेस्टेशन या संकल्पनेचे टप्पे, तत्त्वे आणि जीवनातील उपयोग यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मॅनिफेस्टेशन म्हणजे मन, ऊर्जा आणि विश्वास यांना एकवटून ध्येय प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया असून, योग्य विचार आणि कृती यांचा संपूर्ण समन्वय साधल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो हे त्यांनी स्पष्ट केले. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित करताना मकवाने यांनी सांगितले की अध्यात्म हा जीवनाचा पाया आहे. अध्यात्माशिवाय संस्कार आणि मानसिक बळ जीवनात टिकून राहत नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. या तीन दिवसीय शिबिराला शहर आणि परिसरातील शेकडो युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सर्व सेवेकरी परिवारांनी मोलाचे योगदान दिले.

More news from Maharashtra and nearby areas
  • भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन
    2
    भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Nashik, Maharashtra•
    3 hrs ago
  • जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते कंधार तालुक्यातील शिरशी खुर्द - पेटवडज येथे जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ
    1
    जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते कंधार तालुक्यातील शिरशी खुर्द - पेटवडज येथे जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded, Maharashtra•
    28 min ago
  • *💥 लहुजी शक्ती सेनेचे विष्णू भाऊ कसबे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा* *💥 धामणगांव रेल्वे ,जुना धामणगांव ,शहापूर ,व अंजनसिंगी ,चांदुर रेल्वे येथे समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात पदयात्रेचे केले स्वागत* *💥 मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अनुसूचित जाती वर्गीकरण अ ब क ड ला तत्काळ लागू करावे च्या मागणी करिता* *💥 १२ डिसेंबरला नागपूर यशवंत स्टेडियम येथे हजर राहण्याचे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांचे समाजाला आवाहन* *✍️ बघा सिटी न्यूज बुलेटीन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे 7350846789 WhatsApp 8421078244*
    1
    *💥 लहुजी शक्ती सेनेचे विष्णू भाऊ कसबे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा* 
*💥 धामणगांव रेल्वे ,जुना धामणगांव ,शहापूर ,व अंजनसिंगी ,चांदुर रेल्वे येथे समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात पदयात्रेचे केले स्वागत* 
*💥 मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अनुसूचित जाती वर्गीकरण अ ब क ड ला तत्काळ लागू करावे च्या मागणी करिता* 
*💥 १२ डिसेंबरला नागपूर यशवंत स्टेडियम येथे हजर राहण्याचे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांचे समाजाला आवाहन* 
*✍️ बघा सिटी न्यूज बुलेटीन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे 7350846789 WhatsApp  8421078244*
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    7 hrs ago
  • हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा…🙏✨ भजन, कीर्तनाच्या गजरात बारा वाजून पंधरा मिनिटांनी झालेला प्रभू दत्तात्रेयांचा जन्म सोहळा भाविकांसाठी आजीवन स्मरणात राहणारा ठरला. पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चारांत पार पडलेला हा भक्तिमय क्षण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला–पुरुष भाविक उपस्थित होते. दत्त जयंतीचा उत्साह, भक्ती आणि संस्कारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला! 🙏 #DattJayanti #DattJanmostav #Himayatnagar #SouthMUKHIHanumanMandir #Dattatreya #Bhakti #FestivalVibes #CulturalTradition #DevotionalMoments #NNLDigitalMedia #HinduFestival #SpiritualVibes https://www.instagram.com/reel/DR2YNt7EhEH/?igsh=NzV4cTN2Zno5ZDRx
    1
    हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा…🙏✨
भजन, कीर्तनाच्या गजरात बारा वाजून पंधरा मिनिटांनी झालेला प्रभू दत्तात्रेयांचा जन्म सोहळा भाविकांसाठी आजीवन स्मरणात राहणारा ठरला.
पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चारांत पार पडलेला हा भक्तिमय क्षण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.
यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला–पुरुष भाविक उपस्थित होते. दत्त जयंतीचा उत्साह, भक्ती आणि संस्कारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला! 🙏
#DattJayanti #DattJanmostav #Himayatnagar #SouthMUKHIHanumanMandir
#Dattatreya #Bhakti #FestivalVibes #CulturalTradition
#DevotionalMoments #NNLDigitalMedia #HinduFestival #SpiritualVibes
https://www.instagram.com/reel/DR2YNt7EhEH/?igsh=NzV4cTN2Zno5ZDRx
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
  • शेतात वाळत ठेवलेला १ कोटींचा गांजा जप्त जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात कारवाई दहशतवाद विरोधी पथक व अंबड पोलिसांची कारवाई
    1
    शेतात वाळत ठेवलेला १ कोटींचा गांजा जप्त
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील 
कौचलवाडी शिवारात कारवाई दहशतवाद 
विरोधी पथक व अंबड पोलिसांची कारवाई
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pimpri Chanchwad, Pune•
    15 hrs ago
  • *लातूर शहर काँग्रेस कमिटीच्या मागणीला यश! जन्म-मृत्यू नोंदणी विकेंद्रीकरणाला आरोग्य विभागाची मंजुरी* https://youtube.com/shorts/-QbxlZ7W2Mk?feature=share
    1
    *लातूर शहर काँग्रेस कमिटीच्या मागणीला यश! जन्म-मृत्यू नोंदणी विकेंद्रीकरणाला आरोग्य विभागाची मंजुरी*
https://youtube.com/shorts/-QbxlZ7W2Mk?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • भीषण आग नवजात बालकांना काच फोडून बाहेर काढण्यात आले
    2
    भीषण आग नवजात बालकांना काच फोडून बाहेर काढण्यात आले
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    18 hrs ago
  • भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन
    2
    भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Nashik, Maharashtra•
    3 hrs ago
  • अंजलीताई आंबेडकर यांनी ताटे पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन आचलला दिला धीर
    1
    अंजलीताई आंबेडकर यांनी ताटे पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन आचलला दिला धीर
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded, Maharashtra•
    32 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.