येवला पालिकेवर महायुतीचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी राजेंद्र लोणारी यांचा विक्रमी विजय... प्रतिनिधी सचिन वखारे येवला. येवला नगरपालिका निवडणुकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास दर्शवत मतदारांनी महायुतीला निर्भेळ यश दिले आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या नियोजनाखाली महायुतीने नगराध्यक्ष पदासह १४ जागांवर विजय मिळवला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लोणारी यांनी ११६५ मतांच्या विक्रमी फरकाने दणदणीत विजय संपादन केला. नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ आणि भाजपचे ३ असे एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ यांनी आखलेली रणनीती आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे बोलले जात असून, समीर भुजबळ पुन्हा एकदा 'किंगमेकर' ठरले आहेत. या विजयानंतर बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "येवलेकरांनी विकासावर शिक्कामोर्तब केले असून आगामी काळात शहराला 'रोड मॉडेल' बनवण्यास आमचे प्राधान्य असेल." आमदार पंकज भुजबळ यांनीही या यशाचे श्रेय भुजबळ साहेबांच्या विकासकामांना आणि मतदारांच्या विश्वासाला दिले. या विजयामुळे शहरभर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

- पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील चास ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या आदर्श ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रम राबविले1
- इटलीत बॅन असणारी कंपनी महाराष्ट्रात रत्नागिरी येथे.. या कंपुनीमुळे वाढला नागरिकांच्या जीवाला धोका... बघा सविस्तर माहिती..1
- सुभाष चंद्र बोस च्या गर्लफ्रेंड ची हत्या2
- भोरला १ नंबरवर २ नंबर ठरला भारी ;भोरला नगराध्यक्षापदाचे राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे विजयी भोर दि.२१ भोर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या संजय जगताप यांचा १७० मतांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामचंद्र आवारे यांनी विजयश्री खेचून आणली .भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणूकीत अखेर आमदार मांडेकर यांनी विधानसभेचे पुनरावृत्ती करत भाजपच्या संग्राम थोपटे यांचा धोबीपछाड केला.मात्र नगराध्यक्षपद राखणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक पदावरील केवळ ४ उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपाचे १६ उमेदवार निवडून आणण्यात माजी आमदार संग्राम थोपटे यांना यश आले आहे.प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाच्या उमेदवार अँड जयश्री शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आशू ढवळे यांना समान मते मिळाल्याने चिट्ठी काढून शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे भाजपासाठी गड आला पण सिंह गेला अशी काहीशी स्थिती झाली आहे.मतमोजणीच्या पहिल्या तीन फेऱ्यांपर्यंत आघाडीवर राहिलेल्या भाजपाच्या संजय जगताप यांना आवारे यांनी पुढील दोन फेऱ्यात मागे टाकत अखेर विजय मिळविला.त्यामुळे एक नंबरवर दोन नंबर भारी ठरल्याची चर्चा निकालानंतर रंगू लागली.निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे रामचंद्र श्रीपती आवारे- नगराध्यक्ष,मळेकर सुरेखा बाळकृष्ण , भेलके अनिल रविकांत, धुमाळ कुणाल कुमार, देशपांडे केदार शशिकांत (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस) अँड.जयश्री राजकुमार शिंदे ,बदक रेणुका रवींद्र,किरवे जगदीश वासुदेव, सागळे अमित ज्ञानोबा , सुपेकर तृप्ती अमर, गायकवाड मयुरी देविदास ,शेटे जयवंत ज्ञानोबा ,पलंगे कुणाल चंद्रकांत,पवार मनीषा गणेश ,मोहिते गणेश बाळू ,घोडेकर स्नेहल तुषार ,सागळे पल्लवी समीर,तारू सचिन रामचंद्र,भेलके मनीषा संजय ,पवार स्नेहा शांताराम ,शेटे सुमंत सुभाष (सर्वजण भारतीय जनता पार्टी)निवडणूक निकालानंतर आमदार शंकर मांडेकर यांचे सह विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.2
- भोकरदन नगरपरिषद वर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जनतेने दिले भरभरून यश1
- Post by Laxman Kalyankar1
- पोलिसांची महिलेला मारहाण2
- *काय म्हणतंय अहमदपूर?... रेणापूर?...आता ध्येय एकच, लातूर महानगरपालिका... आमदार संभाजीपाटील निलंगेकर* https://youtube.com/shorts/RrrKBds_8g0?feature=share1
- काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांची प्रतिक्रिया 👇 नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना शेख रफिक शेख महेबूब म्हणाले,“हिमायतनगरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन. ही निवडणूक विजय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या पाठिंब्याचा आहे. सर्वांना सोबत घेऊन हिमायतनगरला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा माझा संकल्प आहे.” #CongressVictory #SheikhRafik #नगराध्यक्ष #Himayatnagar #जनतेचाविश्वास शहरविकास TeamCongress https://www.instagram.com/reel/DShhQBUEigH/?igsh=MTljY3Fvd3Jzc3g3Yg==1