Shuru
Apke Nagar Ki App…
सांगली शहर पोलिसांनी अवैध कॅफे चालवल्याप्रकरणी रिसाला कॅफेचा मालक शैलेश विलासराव पवार (रा. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने शुक्रवारी शहरातील कॅफेवर धडक मारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संघटनेच्या धडक कारवाईनंतर पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कॅफेत गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोम पडलेले आढळले. हे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. तपासणीत, रिसाला कॅफेच्या मालकाने कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी जयवंत येसादे यांनी शहर पोलिस ठाण्यात शैलेश पवार यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
EXPRESS NEWS
सांगली शहर पोलिसांनी अवैध कॅफे चालवल्याप्रकरणी रिसाला कॅफेचा मालक शैलेश विलासराव पवार (रा. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने शुक्रवारी शहरातील कॅफेवर धडक मारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संघटनेच्या धडक कारवाईनंतर पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कॅफेत गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोम पडलेले आढळले. हे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. तपासणीत, रिसाला कॅफेच्या मालकाने कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी जयवंत येसादे यांनी शहर पोलिस ठाण्यात शैलेश पवार यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दारूच्या व्यसनापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दारूची विक्री करणारे लोक दिवसेंदिवस गडगंज श्रीमंत होत आहेत, तर दुसरीकडे दारू पिणारे व्यक्ती मात्र भिकारी बनत चालले आहेत. त्यामुळे दारूपासून दूर राहणे हेच हितावह असल्याचे यातून सूचित होते.1
- अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या गावामध्ये सध्या नागरिकांसाठी ना घरे उपलब्ध आहेत ना बोअरवेलची सोय. त्यामुळे येथील लोकांना मूलभूत सुविधांअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.1
- चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांनी सुप्रियाताईंचा मुका घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून आमदार रोहित पवार यांच्या मौनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, त्यांना विचारण्यात आले आहे की ते आता गप्प का आहेत?1
- सध्याच्या पावसामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर असेल – महानगरपालिकेवर की सरकारवर – असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या अपघातांसाठी कोण जबाबदार राहील, हे स्पष्टपणे सांगावे अशी मागणी केली जात आहे.1
- सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या परराज्यातील एका सराईत गुन्हेगार महिलेला अटक केली आहे. मोनीषा मणीगंडण (वय २८, रा. जोलार पेठ, बाबुनगर, जि. वेल्लोर, तामिळनाडू) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून १० लाख २८ हजार रुपये किमतीचे ६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.1
- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती मोहत्सव समिती-सांगली 2026-2027 च्या नूतन अध्यक्ष निवड बैठकीत आज सांगली गेस्ट हाऊस येथे सर्वानुमते अभिमन्यू भोसले यांची सांगली जिल्हा जयंती मोहत्सव समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांना सर्वांच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कुमार वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला, गत वर्षीचे अध्यक्ष स्व. उत्तम दादा मोहिते यांना सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहिली. गत वर्षीचे कार्याध्यक्ष मा. जितेंद्र हेगडे यांनी प्रास्ताविक करत गत वर्षीची समिती बरखास्त केली. यावेळी अनेक मातंग समाज बांधवांनी आपले मत व्यक्त केले आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. अध्यक्ष निवडीनंतर, सर्वांनी पुष्पराज चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. ही बैठक अत्यंत आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नूतन जयंती मोहत्सव समितीचे अध्यक्ष अभिमन्यू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उर्वरित समिती कार्यकारणीच्या निवडी लवकरच करण्यात येणार आहेत. या बैठकीला नगरसेवक अशोक मासाळे, कुमार वायदंडे, जितेंद्र हेगडे, अर्जुन कांबळे, अशोक रास्ते सर, मा. विकास आवळे, राजू मगदूम, श्रीकांत लोखंडे, मा. परमेश्वर गोडबोले, संजय लोखंडे, अक्षय कांबळे, मा. प्रशांत जायनावर, मा. प्रमोद मोरे, मा. प्रमोद पवार, अमोल सदामते, जयदीप सदामते, प्रकाश आवळे, सतीश बल्लाळ, पियुष भोरे, कृष्णा भोरे, अक्षय ऐवळे आदी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- कार्पोरेशनच्या कामावर तीव्र टीका करण्यात आली आहे. आरोपानुसार, हे सर्व काम कार्पोरेशनचे असूनही, त्यांच्या पथकाने केवळ पाईपलाईन आणून ठेवल्या आहेत. हे सर्व फक्त काम चालू असल्याचा दिखावा करण्यासाठी केले जात आहे, असे म्हटले जात आहे.1
- म्हाप्रळ-पंढरपूर महामार्गावरील इसाने कांबळे परिसरात सावित्री नदीपात्रातून काढण्यात येणाऱ्या गाळाची वाहतूक सुरू असून, या वाहतुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात वाळू आणि माती रस्त्यावर सांडत असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे. सावित्री पूल ते इसाने कांबळे या मार्गावर अनेक ठिकाणी वाळू-मातीचा खच पडल्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनला असून, कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नियमांनुसार, अशा प्रकारच्या वाहतुकीदरम्यान माल झाकून नेणे आणि रस्त्यावर पडलेला माल तात्काळ साफ करणे आवश्यक असते, मात्र प्रत्यक्षात या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गंभीर प्रकाराकडे वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने कारवाई करून महामार्गावरील सांडलेली वाळू-माती हटवावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.1