विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पालकांनी देखील जागरूक रहावे - प्रा. रामदास बिरादार पीसीयू मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी व पालक सभा संपन्न पिंपरी १८ फेब्रुवारी २०२६ विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये त्यांचे करिअर घडवण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ व्यवस्थापन आणि प्राध्यापक वर्ग शंभर टक्के योगदान देईल.परंतु पालकांनी देखील जागरूक रहावे असे आवाहन पीसीयू चे प्रा. रामदास बिरादार यांनी केले. विद्यार्थ्यांचे वार्षिक गुणपत्रक,त्यांची प्रगती,प्रत्येक सत्रातील सरासरी गुण या विषयी पालकांनी पीसीयू मध्ये प्राध्यापकांशी संवाद साधला पाहिजे. पालकांनी पीसीयू वर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असेही प्रा.बिरादार यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे अभियांत्रिकी प्रथम वर्ष विद्यार्थी व पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीयूचे प्रा. मनोहर कलगुंडे, प्रा. डॉ.उमेश कुटे,पालक प्रतिनिधी नीलम बेंडाळे, विद्यार्थी आणि पालक आदी उपस्थित होते. या पालक सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये शिवार्थ देव सिंह,चिन्मय पिंगळे,श्रेया बेंडाळे,शशांक अग्रवाल,अक्षिता कोठारी यांचा समावेश होता. सूत्रसंचालन सायली मालकर,मोहीत पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र - कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी सहभागी पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पालकांनी देखील जागरूक रहावे - प्रा. रामदास बिरादार पीसीयू मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी व पालक सभा संपन्न पिंपरी १८ फेब्रुवारी २०२६ विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये त्यांचे करिअर घडवण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ व्यवस्थापन आणि प्राध्यापक वर्ग शंभर टक्के योगदान देईल.परंतु पालकांनी देखील जागरूक रहावे असे आवाहन पीसीयू चे प्रा. रामदास बिरादार यांनी केले. विद्यार्थ्यांचे वार्षिक गुणपत्रक,त्यांची प्रगती,प्रत्येक सत्रातील सरासरी गुण या विषयी पालकांनी पीसीयू मध्ये प्राध्यापकांशी संवाद साधला
पाहिजे. पालकांनी पीसीयू वर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असेही प्रा.बिरादार यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे अभियांत्रिकी प्रथम वर्ष विद्यार्थी व पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीयूचे प्रा. मनोहर कलगुंडे, प्रा. डॉ.उमेश कुटे,पालक प्रतिनिधी नीलम बेंडाळे, विद्यार्थी आणि पालक आदी उपस्थित होते. या पालक सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये शिवार्थ
देव सिंह,चिन्मय पिंगळे,श्रेया बेंडाळे,शशांक अग्रवाल,अक्षिता कोठारी यांचा समावेश होता. सूत्रसंचालन सायली मालकर,मोहीत पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र - कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी सहभागी पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
- पुण्यातील बिगवन परिसरातील1
- २२ महिलांची सुटका... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पुणे : मोहम्मदवाडी परिसरातील तीन गुंठा जागेच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. गणेश थोरात यांनी सदर जागेचे खरेदीखत बंद असतानाही विसर पावतीद्वारे व्यवहार सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधित जागेवर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात येत असून, मूळ मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्तींचे वर्चस्व सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सिव्हिल प्रकारे त्रास दिला जात असल्याचे सांगत अनेक तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी पुणे पोलीस आयुक्त अमितजी कुमार यांच्याकडे धाव घेतली असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरण गंभीर असून प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.1
- Post by Prasad Panchal1
- साडीतील नृत्याने सोशल मीडियावर धूम अरुणिमा देवांसीस ठरल्या वायरल डान्स टीचर1
- रोहित पवार यांच्या जीविताला धोका? Z+ सुरक्षा देण्याची मागणी... NCP (SP) प्रदेश सरचिटणीस - सुनील माने यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1