पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद झालेल्या एकूण ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदी प्रलंबित आहेत. या सर्व नोंदी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालींधर पांगारे, कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, नामदेव परीट यांच्यासह तालुका कृषी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि सहायक निबंधक ऑनलाइन स्वरूपात उपस्थित होते. कोणताही कृषिविषयक लाभ यापुढे ॲग्रीस्टॅक नोंदीशिवाय मिळणार नाही. तसेच आता कर्जमाफी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभ देताना ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याबाबत गावस्तरावर सरपंच, स्थानिक पदाधिकारी तसेच सोसायट्यांचे सचिव यांना सोबत घेऊन मोहीम स्वरूपात उर्वरित सर्व नोंदी पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. तालुकानिहाय आढावा घेताना त्यांनी मयत शेतकऱ्यांच्या आणि संपर्क होत नसलेल्या शेतकऱ्यांबाबतही विशेष सूचना दिल्या. मयतांच्या वारसांच्या नोंदी घेऊन आणि ज्यांच्याशी संपर्क होत नाही त्यांच्या बांधावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावाचे कृषी सहायकांमार्फत वाटप करून दैनंदिन आढावा घ्यावा. दररोज नवीन नोंदी करून येत्या पंधरा दिवसांत सर्व काम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद झालेल्या एकूण ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदी प्रलंबित आहेत. या सर्व नोंदी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालींधर पांगारे, कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, नामदेव परीट यांच्यासह तालुका कृषी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि सहायक निबंधक ऑनलाइन स्वरूपात उपस्थित होते. कोणताही कृषिविषयक लाभ यापुढे ॲग्रीस्टॅक
नोंदीशिवाय मिळणार नाही. तसेच आता कर्जमाफी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभ देताना ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याबाबत गावस्तरावर सरपंच, स्थानिक पदाधिकारी तसेच सोसायट्यांचे सचिव यांना सोबत घेऊन मोहीम स्वरूपात उर्वरित सर्व नोंदी पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. तालुकानिहाय आढावा घेताना त्यांनी मयत शेतकऱ्यांच्या आणि संपर्क होत नसलेल्या शेतकऱ्यांबाबतही विशेष सूचना दिल्या. मयतांच्या वारसांच्या नोंदी घेऊन आणि ज्यांच्याशी संपर्क होत नाही त्यांच्या बांधावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावाचे कृषी सहायकांमार्फत वाटप करून दैनंदिन आढावा घ्यावा. दररोज नवीन नोंदी करून येत्या पंधरा दिवसांत सर्व काम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- कोल्हापूर : रविराज कांबळे अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटताना दिसत आहेत. शहरातील विविध गॅस एजन्सींच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संभाव्य गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सींकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसून पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.1
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.2
- मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न कोल्हापूर / प्रतिनिधी मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले. मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.1
- Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज1
- सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड झाली आहे. पणदरे गटातून निवडून आलेल्या किरण तावरे यांच्यावर संघटन कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या जोरावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडीनंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण विकास, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.1
- कोल्हापूर ता.11 :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी विशाल किरण शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित चंद्रकांत जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर इस्माईल बागवान, तर उप-सभापतीपदी सौ.दिपा अजित ठाणेकर यांची निवड आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. स्थायी समिती सभापतीपदासाठी नगरसेवक विशाल शिराळे व अमर प्रणव समर्थ यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर स्थायी समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये किरण शिराळे यांना 9 मते तर अमर समर्थ 7 मते पडली. किरण शिराळे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन स्थायी समिती सभापती हे प्रभाग क्र.7-अ या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. परिवहन समिती सभापतीपदासाठी नगरसेवक सत्यजित चंद्रकात जाधव व दुर्वास परशुराम कदम यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर परिवहन समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सत्यजित जाधव यांना 8 मते तर दुर्वास कदम यांना 5 मते पडली. सत्यजित जाधव यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची परिवहन समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन परिवहन समिती सभापती हे प्रभाग क्र.11 -क या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.कौसर इस्माइल बागवान व सौ.जयश्री धनाजी कांबळे यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ.कौसर बागवान यांना 5 मते तर सौ.जयश्री कांबळे यांना 4 मते पडली. सौ.कौसर बागवान यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन महिला व बालकल्याण समिती सभापती हे प्रभाग क्र.18-ब या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. महिला व बालकल्याण समिती उप-सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.दिपा अजित ठाणेकर व सौ.अरुणा विशाल गवळी यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ.दिपा ठाणेकर यांना 5 मते तर सौ.अरुणा गवळी यांना 4 मते पडली. सौ.दिपा ठाणेकर यांना सर्वाधिक 5 मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन महिला व बालकल्याण समिती उपसभापती हे प्रभाग क्र.7-ब या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी आयुक्त के.मंजूलक्ष्मी, पीठासन अधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अधिकारी, नगरसेवक/नगरसेविका यांनी नुतन स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, परवाना अधिक्षक अशोक यादव, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी उपस्थित होते. 000000000000002