*उडान पुलावर काटेरी झाडाझुडपांचा विळखा; प्रशासनाचे दुर्लक्ष”* *उडान पुलावर काटेरी झाडाझुडपांचा विळखा; प्रशासनाचे दुर्लक्ष”* पादचाऱ्यांना पायी चालने झाले कठीण सामान्य नागरिकांना पडला प्रश्न?गंगाखेडच्या रेल्वे उड्डाणपुलावर काटेरी झाडे झुडपांची वाढ देखभालीची निमेदारी कोणाची शहरातील नांदेड-पुणे राष्ट्रीय मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावरील फुटपाथावर सध्या धूळ,माती आणि वाढलेल्या काटेरी झाडे-झुडपांमुळे पादचाऱ्यांना पायी चालले कठीण झाले आहे,या समस्या विषयी सार्वजनिक बांधकाम उपविभागाशी विचारणा केली असता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे देखभालीची जिम्मेदारी असल्याची सांगितले तर राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे देखभालीची जिम्मेदारी असल्याचे म्हटले, आता सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे नेमकी देखरेखीची जिम्मेदारी कोणाची? या पुलाची नियमित स्वच्छता व देखभाल होणे गरजेचे असून,पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना काटेरी झाडेझुडपांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तसेच सामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गंगाखेड बसस्थानक ते दत्त मंदिर दरम्यानच्या या मार्गावरील रेल्वे पुलाच्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात माती,धूळ व कचरा साचला आहे.अनेक ठिकाणी तण आणि वेड्या बाभळी वाढून तीन ते चार फुटांपर्यंत पोहोचल्या आहेत.त्यामुळे पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथची जागाही कमी झाली आहे.नागरिकांनी रोडवरून चालावे तर वाहनांची भीती,आधीच राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षापासून सुरू असल्याने नागरिकांना नाहक धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.किमान पुलावर वाढलेले झाडे-झुडपे,मातीचे थर काढून स्वच्छता करावी या समस्या एका दिवसात निर्माण झालेल्या नाहीत.त्यामुळे संबंधित विभागाने एकमेकावर ढकलून न देता नियमित पाहणी व देखभाल करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रात्रीच्या वेळी वाहनधारक आपली वाहने सुसाट पळवतात पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुलावर फूटपाताची व्यवस्था आहे परंतु त्यावर काटेरी झुडपे वाढल्याने पादचार्यांनी पायी चालायचे कुठून असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळे उड्डाणपुलाची तातडीने पाहणी करून फुटपाथवरील माती व धूळ हटवावी,वाढलेली झाडे-झुडपे व बाभळी तोडाव्यात,तसेच पुलाची नियमित स्वच्छता व देखभाल करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.उड्डाणपूल उभारणे जितके महत्त्वाचे,तितकीच त्याची नियमित निगा राखणेही प्रशासनाची जबाबदारी आहे.आता तरी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने केवळ कागदोपत्री नव्हे,तर प्रत्यक्ष कृतीतून पुलाच्या देखभालीची जबाबदारी पार पाडावी,पादचार्यांना तसेच सामान्य नागरिकांना या त्रासातून मुक्तता द्यावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

- सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.2
- kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal1
- अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत. धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ1
- जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.1
- साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. ##साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. सोमेश मुळे जळगाव: साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या वाढत्या साखर भाववाढीच्या विरोधात आज जळगाव महानगरपालिकेजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. माजी महापौरांच्या नेतृत्वात घोषणाबाजी या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा महापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी केले. 'साखर भाव कमी झालेच पाहिजेत', 'केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो' अशा तीव्र घोषणा देत उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे जगणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आंदोलनानंतर उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. साखरेचे दर नियंत्रित आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन, आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....1
- नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा1
- बिहारमध्ये सरकारचा राजीनामा मागितला म्हणून पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षाच्या चिमुकल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं..1