logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

'खरा कायदा' ची निर्भीड लेखणी;शेख खय्युम पटेल यांच्या सामाजिक पत्रकारितेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान प्रतिष्ठेचा 'डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम मानवता पुरस्कार' प्रदान पत्रकारिता हे केवळ माहीती देण्याचे साधन नसुन समाज परीवर्तनाचे,अन्यायाविरुध्द लढ्याचे आणि शोषीतांना न्याय मिळवुन देण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.हाच वसा आणि वारसा हिंगोली जिल्ह्यातील 'साप्ताहीक खरा कायदा'चे संस्थापक संपादक शेख खय्युम पटेल यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अविरतपणे चालवला आहे.त्यांच्या या खडतर,प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकारितेची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.उत्तराखंड येथील प्रसिध्द 'भारत गौरव प्रतिष्ठाण'च्या वतीने शेख खय्युम पटेल यांना सन २०२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा 'डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रेरणादायी मानवता पुरस्कार' देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.या पुरस्कारामुळे हिंगोली जिल्ह्याच्या वैभवात आणि पत्रकारिता क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला.

13 hrs ago
user_Ganesh Sutar
Ganesh Sutar
सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
13 hrs ago
4b070c40-706f-495f-98dd-c81146692868

'खरा कायदा' ची निर्भीड लेखणी;शेख खय्युम पटेल यांच्या सामाजिक पत्रकारितेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान प्रतिष्ठेचा 'डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम मानवता पुरस्कार' प्रदान पत्रकारिता हे केवळ माहीती देण्याचे साधन नसुन समाज परीवर्तनाचे,अन्यायाविरुध्द लढ्याचे आणि शोषीतांना न्याय मिळवुन देण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.हाच वसा आणि वारसा हिंगोली जिल्ह्यातील 'साप्ताहीक खरा कायदा'चे संस्थापक संपादक शेख खय्युम पटेल यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अविरतपणे चालवला आहे.त्यांच्या या खडतर,प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकारितेची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.उत्तराखंड येथील प्रसिध्द 'भारत गौरव प्रतिष्ठाण'च्या वतीने शेख खय्युम पटेल यांना सन २०२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा 'डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रेरणादायी मानवता पुरस्कार' देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.या पुरस्कारामुळे हिंगोली जिल्ह्याच्या वैभवात आणि पत्रकारिता क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज
    1
    लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • उमरखेड तालुक्यात चिल्ली: मंजूर परवान्यापेक्षा अनेकपटीने गौण खनिज उत्खननाचा संशय; उच्चस्तरीय चौकशीची मागणी, ATS मोजणीसह फौजदारी कारवाईची मागणी मौजे चिल्ली, ता. उमरखेड येथील सर्वे क्र. 340/2 (क्षेत्र 0.81 हे.आर.) व लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 (क्षेत्र 0.40 हे.आर.) मध्ये मंजूर परवानगीपेक्षा अनेकपटीने गौण खनिज (मुरूम/डबर) उत्खनन झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते तथा 'पा. उमरखेड वार्ता'चे मुख्य संपादक शेख इरफान यांनी आज 31 जुलै 2026 रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह विविध विभागांना सविस्तर कायदेशीर तक्रार सादर केली. ही तक्रार लेखी तसेच ई-मेलद्वारे संबंधित सर्व कार्यालयांना पाठविण्यात आली आहे. तक्रारीत संबंधित जमिनीसाठी मर्यादित प्रमाणात उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात मंजूर मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाची दिशाभूल, महसुली नुकसान, पर्यावरणीय नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि संगनमताने बेकायदेशीर लाभ मिळाल्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत विशेषतः लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 मधील नकाशे, सीमांकन अभिलेख आणि प्रत्यक्ष उत्खननाची तुलना करून ATS (Advanced Total Station) द्वारे वैज्ञानिक मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महसूल, खनिकर्म, वन, भूमापन आणि आवश्यक असल्यास पर्यावरण विभागाच्या संयुक्त समितीमार्फत पंचनामा करून वस्तुस्थिती निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत वनपरिक्षेत्रालगत असल्याने वन विभागाची पूर्वपरवानगी, पर्यावरणीय मंजुरी आणि इतर सर्व वैधानिक परवानग्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंजूर ब्रास आणि प्रत्यक्ष उत्खनन यांची वैज्ञानिक तुलना करून शासनाचे झालेले महसुली नुकसान निश्चित करावे तसेच रॉयल्टी, दंड आणि पर्यावरणीय नुकसानभरपाईची वसुली करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जमिनीवरील लेआउट, एन.ए., बांधकाम अथवा इतर कोणत्याही विकासकामास परवानगी देऊ नये, तसेच तपासात बेकायदेशीर उत्खनन, शासनाची दिशाभूल, खोटी माहिती, महसुली फसवणूक किंवा बनावट अभिलेखांचा वापर आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित यंत्रसामग्री, वाहने आणि गौण खनिज जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये आणखी एक महत्त्वाची मागणी करण्यात आली असून, या प्रकरणावर प्रत्येक विभागाने केलेली सर्व कार्यवाही, नोटिसा, पंचनामे, ATS मोजणी अहवाल, संयुक्त तपासणी अहवाल, वन विभाग, खनिकर्म विभाग, महसूल विभाग, भूमापन विभाग यांचे अहवाल, अंतिम आदेश तसेच विभागांदरम्यान झालेला संपूर्ण पत्रव्यवहार अर्जदारास लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती प्रधान मुख्य वनसंरक्षक, नगर रचना विभाग यवतमाळ, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी, उपभूमी अभिलेख कार्यालय उमरखेड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, जिल्हा सर्वेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी आणि गटविकास अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या असून, त्यांच्या स्तरावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यवाहीच्या प्रमाणित प्रती अर्जदारास देण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित विभाग आता कोणती भूमिका घेतात आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    4
    उमरखेड तालुक्यात चिल्ली: मंजूर परवान्यापेक्षा अनेकपटीने गौण खनिज उत्खननाचा संशय; उच्चस्तरीय चौकशीची मागणी, ATS मोजणीसह फौजदारी कारवाईची मागणी

मौजे चिल्ली, ता. उमरखेड येथील सर्वे क्र. 340/2 (क्षेत्र 0.81 हे.आर.) व लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 (क्षेत्र 0.40 हे.आर.) मध्ये मंजूर परवानगीपेक्षा अनेकपटीने गौण खनिज (मुरूम/डबर) उत्खनन झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते तथा 'पा. उमरखेड वार्ता'चे मुख्य संपादक शेख इरफान  यांनी आज 31 जुलै 2026 रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह विविध विभागांना सविस्तर कायदेशीर तक्रार सादर केली. ही तक्रार लेखी तसेच ई-मेलद्वारे संबंधित सर्व कार्यालयांना पाठविण्यात आली आहे.
तक्रारीत संबंधित जमिनीसाठी मर्यादित प्रमाणात उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात मंजूर मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाची दिशाभूल, महसुली नुकसान, पर्यावरणीय नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि संगनमताने बेकायदेशीर लाभ मिळाल्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत विशेषतः लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 मधील नकाशे, सीमांकन अभिलेख आणि प्रत्यक्ष उत्खननाची तुलना करून ATS (Advanced Total Station) द्वारे वैज्ञानिक मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महसूल, खनिकर्म, वन, भूमापन आणि आवश्यक असल्यास पर्यावरण विभागाच्या संयुक्त समितीमार्फत पंचनामा करून वस्तुस्थिती निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत वनपरिक्षेत्रालगत असल्याने वन विभागाची पूर्वपरवानगी, पर्यावरणीय मंजुरी आणि इतर सर्व वैधानिक परवानग्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंजूर ब्रास आणि प्रत्यक्ष उत्खनन यांची वैज्ञानिक तुलना करून शासनाचे झालेले महसुली नुकसान निश्चित करावे तसेच रॉयल्टी, दंड आणि पर्यावरणीय नुकसानभरपाईची वसुली करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जमिनीवरील लेआउट, एन.ए., बांधकाम अथवा इतर कोणत्याही विकासकामास परवानगी देऊ नये, तसेच तपासात बेकायदेशीर उत्खनन, शासनाची दिशाभूल, खोटी माहिती, महसुली फसवणूक किंवा बनावट अभिलेखांचा वापर आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित यंत्रसामग्री, वाहने आणि गौण खनिज जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीमध्ये आणखी एक महत्त्वाची मागणी करण्यात आली असून, या प्रकरणावर प्रत्येक विभागाने केलेली सर्व कार्यवाही, नोटिसा, पंचनामे, ATS मोजणी अहवाल, संयुक्त तपासणी अहवाल, वन विभाग, खनिकर्म विभाग, महसूल विभाग, भूमापन विभाग यांचे अहवाल, अंतिम आदेश तसेच विभागांदरम्यान झालेला संपूर्ण पत्रव्यवहार अर्जदारास लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीच्या प्रती प्रधान मुख्य वनसंरक्षक, नगर रचना विभाग यवतमाळ, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी, उपभूमी अभिलेख कार्यालय उमरखेड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, जिल्हा सर्वेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी आणि गटविकास अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या असून, त्यांच्या स्तरावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यवाहीच्या प्रमाणित प्रती अर्जदारास देण्याची विनंती करण्यात आली आहे.
या प्रकरणात संबंधित विभाग आता कोणती भूमिका घेतात आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.
    1
    भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा
नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे समाधान शिबिर; दिवंगत नेते अजितदादा पवार यांना अभिवादन लोहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त लोहा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच स्थानिक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनीही आपल्या समस्या मांडून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे समाधान शिबिर; दिवंगत नेते अजितदादा पवार यांना अभिवादन
लोहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त लोहा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच स्थानिक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनीही आपल्या समस्या मांडून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! फसवणूक डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! 📞 जर कोणी स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला "डिजिटल अटक" झाल्याचे सांगत असेल, तर तो नक्कीच सायबर फसवणुकीचा प्रयत्न आहे. ⚠️ लक्षात ठेवा: ✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही. ✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कधीही शेअर करू नका. ✅ घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका. ✅ संशयास्पद कॉल त्वरित बंद करा. ✅ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा वर तक्रार नोंदवा. 🛡️ सतर्क नागरिकच सायबर गुन्हेगारांवर सर्वात मोठे शस्त्र आहेत. माहितीपूर्ण राहा, सुरक्षित राहा! #DigitalArrest #CyberFraud #CyberCrime #CyberSafety #NandedPolice #MaharashtraPolice #StopCyberFraud #OnlineSafety #CyberAwareness #Dial1930 #CyberCrimeHelpline #ThinkBeforeYouTrust #StayAlert #SafeDigitalIndia #ALMBharat #NNLMarathi
    1
    डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! फसवणूक 
डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! 
📞 जर कोणी स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला "डिजिटल अटक" झाल्याचे सांगत असेल, तर तो नक्कीच सायबर फसवणुकीचा प्रयत्न आहे.
⚠️ लक्षात ठेवा: ✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही. ✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कधीही शेअर करू नका. ✅ घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका. ✅ संशयास्पद कॉल त्वरित बंद करा. ✅ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा  वर तक्रार नोंदवा.
🛡️ सतर्क नागरिकच सायबर गुन्हेगारांवर सर्वात मोठे शस्त्र आहेत. माहितीपूर्ण राहा, सुरक्षित राहा!
#DigitalArrest #CyberFraud #CyberCrime #CyberSafety #NandedPolice #MaharashtraPolice #StopCyberFraud #OnlineSafety #CyberAwareness #Dial1930 #CyberCrimeHelpline #ThinkBeforeYouTrust #StayAlert #SafeDigitalIndia #ALMBharat #NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • कळमनुरी तालुक्यात मुसळधार पाऊस,कयाधू नदीला पूर,पुरामुळे बोल्डा ते उमरा फाटा मार्ग बंद हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात दि.30 जुलै रोजी मुसळधार पाऊस सुरु असून रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर्व परिस्थिती निर्माण झाली, नदी दुथडी भरून वाहत असल्याने बोल्डा ते उमरा फाटा रस्ता हा पुरामुळे बंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे . कळमनुरी तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू असून या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे .30 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे नदी नाल्या वाहिले असून कयाधू नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आज दिनांक 31 जुलै रोजी सकाळी तालुक्यातील सोडेगाव नजिक पुलावर पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरा फाटा ते बोल्डा हा रस्ता वाहतुकीकरता पूर्णपणे बंद झाला आहे .
    1
    कळमनुरी तालुक्यात मुसळधार पाऊस,कयाधू नदीला पूर,पुरामुळे बोल्डा ते उमरा फाटा मार्ग बंद

हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात दि.30 जुलै रोजी मुसळधार पाऊस सुरु असून रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर्व परिस्थिती निर्माण झाली, नदी दुथडी भरून वाहत असल्याने बोल्डा ते उमरा फाटा रस्ता हा पुरामुळे बंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
कळमनुरी तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू असून या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे .30 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे नदी नाल्या वाहिले असून कयाधू नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आज दिनांक 31 जुलै रोजी सकाळी तालुक्यातील सोडेगाव नजिक पुलावर पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरा फाटा ते बोल्डा हा रस्ता वाहतुकीकरता पूर्णपणे बंद झाला आहे .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.