केआयटी (KIT) विनयभंग प्रकरण: पीडित विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा! कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क केआयटी (KIT) कॉलेजमधील एका विभागप्रमुख प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, कॉलेजमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी 'हिंदू एकता आंदोलन'तर्फे करण्यात आली आहे. आज, मंगळवारी दुपारी १२:३० वाजता हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक सुरेशराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक (SP) योगेश कुमार यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. यावेळी बोलताना दिपक देसाई म्हणाले की, "या प्रकरणात पीडित मुलींनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही ६ मार्च रोजी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मात्र, संबंधित प्राध्यापकाची वर्तणूक पाहता पीडित मुलींची संख्या अधिक असू शकते. कॉलेज प्रशासनाने पीडितेची बाजू समजून घेण्याऐवजी तिलाच पुराव्यांची मागणी करून मानसिक त्रास दिला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच, या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन काही राजकीय कार्यकर्ते खंडणी गोळा करत असल्याचे समजत असून, याची शहानिशा करून अशा प्रवृत्तींवरही पोलिसांनी कठोर कारवाई करावी." पोलीस अधीक्षकांचे आश्वासन: निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेतल्या. त्यांनी या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून, पीडित मुलींना न्याय मिळावा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण राहील, या दृष्टीने पोलीस प्रशासन तातडीने पुढील पावले उचलले, असे स्पष्ट केले. याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने विलास मोहीते, बाबु साखळकर, प्रतिक डिसले, ऍड. आसावरी कुलकर्णी, ऐश्वर्या मुनिश्वर, ऍड. शुभांगी निंबाळकर, सुधाकर वडगांवकर, आनंदा कवडे, नागेश ऊगार, सुनिक ठाकुर, राहुल गोंदील, अंजली जाधव, ऍड. अनुप कुलकर्णी, राजेंद्र करंबे, शिवाजी चिले, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

- kondhwa budruk kya hal banaa Rakha hai4
- पुण्यातील बाबासाहेबांचे महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असलेले हे दुसरे घर... मावळ पुणे :- पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आपण पाहिलंय का..? सन १९४९ ते १९५६ च्या काळात ७ वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं जाणकार सांगतात. तळेगाव चाकण रोडवर असलेल्या हरणेश्र्वर टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली १६ हजार रुपयांना खरेदी केला होता. मावळचा निसर्गरम्य परिसर , सह्याद्री पर्वताच्या रांगा, कणखर कातळात कोरलेल्या कार्ले,भाजे आणि बेडसे च्या लेण्या यामुळं बाबासाहेबांना या जागेविषयी मोठं आकर्षण होत म्हणून त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. बाबासाहेब या बंगल्यात ये जाऊन राहत असतं. ज्या वेळी बाबासाहेब पुणे मुक्कामी असायचे तेव्हा ते या बंगल्यात ज्ञानसाधना करत,राजकीय ,सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत असत. या बंगल्याच्या परिसरात अनेक झाडे बाबासाहेबांनी लावली होती. ती आजही पाहायला मिळतात. १४ एप्रिल १९५१ रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसा दिवशी याच बंगल्यात शेड्युल कास्ट फेडरेशन ची बैठक पार पडली होती. या बंगल्यात डॉ. बाबासाहेबांनी वापरलेल्या टेबल ,खुर्ची, अनेक महत्वाच्या घडामोडींचे चित्रे या बंगल्यात लावण्यात आली आहेत. सध्या या बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनविण्यात आले आहे. या बंगल्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी प्रेरणा घेण्यासाठी आणि वाचनासाठी या बंगल्यात येत असतात. बाबासाहेब आंबेडरांचे हे घर म्हणजे विचारांची शाळा होते, अनेक मोठ्या व्यक्ती आणि विचारवंत यांचे चर्चा करण्याचे हे ठिकाण होते. यात आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, गाडगे महाराज, शाहीर पठ्ठे बापूराव , कवी राजानंद गडपायले अनेकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या..... : लिंबराज कांबळे - ग्रामस्थ #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #तळेगावदाभाडे #मावळपुणे #आंबेडकरस्मारक #इतिहासाचीसाक्ष #प्रेरणास्थळ #विचारांचीशाळा #सह्याद्री #कार्लेलेंणी #भाजेलेंणी #बेडसेलेणी #सामाजिकचळवळ #विद्यार्थीप्रेरणा #महाराष्ट्रइतिहास #DrBabasahebAmbedkar #TalegaonDabhade #MavalPune #AmbedkarMemorial #HistoricPlace #InspirationSpot #HouseOfIdeas #Sahyadri #KarleCaves #BhajeCaves #BedseCaves #SocialMovement #StudentInspiration #MaharashtraHistory1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by Durgeshbhau khade Sarkar1
- पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: संत तुकारामनगर तपास पथकाकडून दोन गावठी पिस्तूल जप्त, ३ आरोपींना बेड्या1
- 🛑 *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आयुष्यभर आचरणात आणण्याचे आवाहन केले. “डॉ. बाबासाहेबांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता जन्मापासून शेवटपर्यंत आचरणात आणले पाहिजेत. संविधान जपण्याचा संकल्प करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे,” असे त्या म्हणाल्या. खासदार प्रणिती शिंदे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले असून सत्ताधारी भाजपकडून त्याचा वारंवार अपमान होत आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही; मात्र आता देशासाठी लढण्याची वेळ आली आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी जात-पात, धर्म बाजूला ठेवून संघटित संघर्ष करणे आवश्यक आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, संसद व विधिमंडळात ३३ टक्के महिला आरक्षणाची तरतूद असलेले महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाले आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारने ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण लागू केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, महिला आरक्षण विधेयक काँग्रेसच्या पाठिंब्याने २०२३ मध्येच मंजूर झाले असताना सत्ताधाऱ्यांना ३० महिन्यांनंतर जाग आली असून, पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात येत आहे. तसेच, महिला आरक्षणाची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचना (डी-लिमिटेशन) शी जोडण्यावर त्यांनी आक्षेप घेतला. मतदारसंघ पुनर्रचना करण्यापूर्वी जनगणना होणे आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकार असंवैधानिक पद्धतीने निर्णय घेत आहे. हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप वारंवार लोकशाही आणि संविधानाचा अपमान करतात. महत्त्वाच्या विधेयकांपूर्वी देशभर चर्चा व्हायला हवी. संवाद हीच लोकशाहीची खरी ताकद आहे; मात्र सध्याचे सरकार एकतर्फी निर्णय घेत आहे. संवादाची परंपरा नष्ट होत असून हे लोकशाही संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत आणि ते जपणारे लोक व काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे, तोपर्यंत लोकशाही व संविधानावर कुठलाही आघात होऊ देणार नाही, असा निर्धार खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, माजी महापौर सुशिलाताई अबुटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक प्रवीण दादा निकाळजे, शिवा बाटलीवाला, प्रा. भोजराज पवार, प्रदेश सचिव श्रीशैल रणधिरे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, हनुमंतू सायबोळु, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, बाबुराव म्हेत्रे, दक्षिण तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड. मयूर खरात, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, रामसिंग आंबेवाले, बसवराज म्हेत्रे, राजन कामत, सिद्राम सलवदे सर, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, रुस्तुम कंपली, लखन गायकवाड, सागर उबाळे, अँड. शुभम माने, अयाज आळंद, भीमराव शिंदे, नूरअहमद नलवार, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, अँड करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, संध्या काळे, मुमताज तांबोळी, कोंडणताई काकडे, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, सलिमा शेख, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, चंद्रकला निजमल्लू, अनिता भालेराव, द्रोपदी शिवशरण, सचिन पवार, महेंद्र शिंदे, यल्लाप्पा बुगले, नारायण पावटे, राजेश झंपले, गंगाधर शिंदे, शंकर म्यागेरी, मोहसीन फुलारी, दशरथ सामल, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे, आमिर पाटील, अभेज दर्जी, दत्तात्रय गजभार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- मावळ पुणे :- बोरघाटातील खंडाळा परिसरात माणुसकीचं हृदयस्पर्शी चित्र समोर आलं आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी भटकणाऱ्या मुक्या प्राण्यांची व्यथा पाहून भाजपचे नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे हाजी अराफत शेख यांनी पुणे मुंबई प्रवासा दरम्यान माकडांना थंडगार पाणी पाजत बिस्किटे खाऊ घातली. या प्रसंगाने “मानसातली माणुसकी” अजून जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक आणि वन विभागाला भावनिक साद घालत, बोरघाट-खंडाळा परिसरात या मुक्या प्राण्यांसाठी कायमस्वरूपी पाण्याची टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, परवानगी मिळाल्यास स्वतःच्या खर्चातून पाण्याची टाकी उभारण्याची तयारीही संबंधितांकडून दर्शवण्यात आली आहे. माणुसकी आणि दयाभाव जपत, आवाज नसलेल्या जीवांसाठी पुढे येणं हाच खरा मानवधर्म असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे... #मावळ #पुणे #बोरघाट #खंडाळा #माणुसकी #मुक्याप्राणी #प्राणीसंवर्धन #वनविभाग #पाणीटंचाई #उन्हाळा #सामाजिककार्य #दयाभाव #हाजीअराफतशेख #भाजप #पर्यावरण #Maval #Pune #BorGhat #Khandala #Humanity #AnimalCare #StrayAnimals #WildlifeCare #ForestDepartment #WaterScarcity #SummerHeat #SocialWork #Compassion #HajiArafatSheikh #BJP #Environment1
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आकर्षण गोल्डन रथ दुर्गामाता रथ निगडी1
- पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०७ यांचेकडुन १० सराईत गुन्हेगारांवर दीर्घ कालावधीसाठी हद्दपार कारवाई व १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसाकरीता हद्दपार कारवाई1