नाशिक:आम आदमी पार्टी व संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे आम आदमी पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे विधानसभा गटनेते व माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, आमदार भाई जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, प्रदेश सरचिटणीस तसेच रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे, नाशिक शहर अध्यक्ष मा. अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करत, पक्षाच्या सर्वसमावेशक विचारसरणीवर भर दिला. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर देशभरातील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस वाढत असून, धर्मांध व विभाजनकारी शक्तींना तोंड देण्यासाठी काँग्रेसच सक्षम पर्याय आहे. संविधान, बहुजन हित, सामाजिक सलोखा आणि विश्वबंधुत्व या मूल्यांवर आधारित काँग्रेसचा विचार पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी भाजप सरकारवर टीका करताना सांगितले की, देशात सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आणि आर्थिक विषमता वाढवण्याचे काम सुरू आहे. शेतकरी, कामगार, गरीब व वंचित घटकांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. काँग्रेस हा जनतेशी एकरूप असलेला पक्ष असून, भविष्यातील पिढ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. नासिक येथील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी गिरीश उगले पाटील, संतोष राऊत, चंद्रशेखर महानुभाव, दीपक सरोदे, सुनील जाधव यांनी यावेळी पक्षप्रवेश केला या बैठकीदरम्यान संघटन विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या काळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, राज्यभरात रोजगार व स्वयं रोजगार विभाग अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

- Deepak sarodeनाशिक, नाशिक, महाराष्ट्रधन्यवाद3 hrs ago
- Post by Anand Gangurde4
- Post by Afsjcjryued1
- Post by सुनिलआण्णा सोनवणे1
- चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग2
- येवला: येथील मामलेदार गल्ली, जुने सिटी पोलीस स्टेशन जवळ असलेल्या श्री दत्त महाराज मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या मंगल सोहळ्याचे औचित्य साधून श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची शहरातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा प्रारंभ जुन्या पोलीस स्टेशनपासून करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक आणि पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विशेष आकर्षण म्हणजे, मिरवणुकीत महिलांनी सादर केलेले गर्भा नृत्य यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या सोहळ्यात कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, शिवसेना गट नेते व नगरसेवक गणेश शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे नगरसेविका पारू गुजराती, राजेश भांडगे, सनी पटणी, राजू पटेल, बालूशेठ परदेशी, यती भाई गुजराती, शैलेश देसाई यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पुढील कार्यक्रम बुधवार ते शुक्रवार (दि. ३ एप्रिल) या कालावधीत पार पडणार आहेत. शुक्रवारी होम दर्शन आणि सायंकाळी ६ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- राज्यसभेची जागा शरद पवार यांना दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात अंतर्गत वाद सुरू झाले असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत हा वाद उफाळून आला आहे1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- चांदवड तालुक्यात अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील गव्हाचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग शेतकरी राजा मात्र हवालदील2