logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपूरात बागेश्वर बाबा विरुद्ध अंनिस आमने-सामने ! ज्यांना खाज असेल त्यांनी ‘दरबारात यावे !! —धीरेंद्र शास्त्रींचे खुले आव्हान... नागपूरात बागेश्वर बाबा विरुद्ध अंनिस आमने-सामने ! ज्यांना खाज असेल त्यांनी ‘दरबारात यावे !! —धीरेंद्र शास्त्रींचे खुले आव्हान... नागपूर : जिल्हा प्रतिनिधी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना थेट आणि उघड आव्हान दिले आहे. “प्रदेश तुमचा, मंचही तुमचाच; ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे,” असे म्हणत त्यांनी स्वतः कुठेही न जाण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूरात दोन दिवस ‘दरबार’ शास्त्री यांनी नागपूरात दोन दिवस दरबार भरवणार असल्याची घोषणा केली असून, याच ठिकाणी ते आपल्या कथित शक्तींचे सादरीकरण करणार असल्याचे सांगितले. ३० तारखेनंतर “बाबा पळून गेला” असा आरोप होऊ नये, म्हणून वेळमर्यादाही त्यांनी जाहीर केली आहे. अंनिसचा पलटवार; ८० लाखांचे बक्षीस जाहीर श्याम मानव यांनी शास्त्रींना ‘ढोंगी’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले. पत्रकारांसमोर १० अनोळखी व्यक्तींची अचूक माहिती, शेजारच्या खोलीतील वस्तू, मोबाईल नंबर आणि घरातील तपशील ओळखून दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले आहे. हे सिद्ध केल्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. ९० टक्के अचूकता सिद्ध झाली तर अंनिस बंद करण्याची तयारी मानव यांनी आणखी एक मोठी घोषणा करत म्हटले की, “जर बाबांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी ९० टक्के उत्तरे अचूक दिली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करून आम्ही त्यांचे भक्त बनू.” पूर्वीची तक्रार आणि पोलिसांची भूमिका तीन वर्षांपूर्वी श्याम मानव यांनी शास्त्री यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, नागपूर पोलिसांनी व्हिडिओत आक्षेपार्ह काही नसल्याचे सांगत कोणताही गुन्हा नोंदवला नव्हता. वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत दरम्यान, “चार मुले असावीत, त्यापैकी एक आरएसएसला द्या,” असे विधान शास्त्री यांनी अलीकडेच नागपूरातील कार्यक्रमात केले होते. या कार्यक्रमाला मोहन भागवत उपस्थित होते. या वक्तव्यामुळेही राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.

2 hrs ago
user_अरबाज शेख.सावरगाव कर
अरबाज शेख.सावरगाव कर
Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago
a725988b-8dad-424e-a32a-1840ba5a3d38

नागपूरात बागेश्वर बाबा विरुद्ध अंनिस आमने-सामने ! ज्यांना खाज असेल त्यांनी ‘दरबारात यावे !! —धीरेंद्र शास्त्रींचे खुले आव्हान... नागपूरात बागेश्वर बाबा विरुद्ध अंनिस आमने-सामने ! ज्यांना खाज असेल त्यांनी ‘दरबारात यावे !! —धीरेंद्र शास्त्रींचे खुले आव्हान... नागपूर : जिल्हा प्रतिनिधी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना थेट आणि उघड आव्हान दिले आहे. “प्रदेश तुमचा, मंचही तुमचाच; ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे,” असे म्हणत त्यांनी स्वतः कुठेही न जाण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूरात दोन दिवस ‘दरबार’ शास्त्री यांनी नागपूरात दोन दिवस दरबार भरवणार असल्याची घोषणा केली असून, याच ठिकाणी ते आपल्या कथित शक्तींचे सादरीकरण करणार असल्याचे सांगितले. ३० तारखेनंतर “बाबा पळून गेला” असा आरोप होऊ नये, म्हणून वेळमर्यादाही त्यांनी जाहीर केली आहे. अंनिसचा पलटवार; ८० लाखांचे बक्षीस जाहीर श्याम मानव यांनी शास्त्रींना ‘ढोंगी’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले. पत्रकारांसमोर १० अनोळखी व्यक्तींची अचूक माहिती, शेजारच्या खोलीतील वस्तू, मोबाईल नंबर आणि घरातील तपशील ओळखून दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले आहे. हे सिद्ध केल्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. ९० टक्के अचूकता सिद्ध झाली तर अंनिस बंद करण्याची तयारी मानव यांनी आणखी एक मोठी घोषणा करत म्हटले की, “जर बाबांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी ९० टक्के उत्तरे अचूक दिली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करून आम्ही त्यांचे भक्त बनू.” पूर्वीची तक्रार आणि पोलिसांची भूमिका तीन वर्षांपूर्वी श्याम मानव यांनी शास्त्री यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, नागपूर पोलिसांनी व्हिडिओत आक्षेपार्ह काही नसल्याचे सांगत कोणताही गुन्हा नोंदवला नव्हता. वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत दरम्यान, “चार मुले असावीत, त्यापैकी एक आरएसएसला द्या,” असे विधान शास्त्री यांनी अलीकडेच नागपूरातील कार्यक्रमात केले होते. या कार्यक्रमाला मोहन भागवत उपस्थित होते. या वक्तव्यामुळेही राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.

More news from उंबेरखेडा तांडा and nearby areas
  • मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    1
    मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    user_अरबाज शेख.सावरगाव कर
    अरबाज शेख.सावरगाव कर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    7 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात* *सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट* छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *जनगणनेत सहभागाचे आवाहन* देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *पुरस्कार वितरण* याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. ०००००
    1
    *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात*
*सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट*
छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. 
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. 
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली.
ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. 	त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.  सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.  आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री  शिरसाट यांनी केले. 
*जनगणनेत सहभागाचे आवाहन*
देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले.
*पुरस्कार वितरण*
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी   राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल  पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले.
सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी  कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. 
सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. 
०००००
    user_Global bharat
    Global bharat
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती
    1
    सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Anis qureshi sillod
    1
    Post by Anis qureshi sillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Electrician सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    2
    ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.